महत्वाच्या बातम्या
-
CAA: भारतातील सध्याची परिस्थिती वाईट: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला
भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) दररोज आंदोलने होत असताना आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही याविषयी मत व्यक्त केले आहे. भारतात या कायद्यावरून सुरु असलेल्या आंदोलनावरून त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
युक्रेनचे प्रवासी विमान चुकून पाडल्याची इराणी सैन्याची कबुली
युक्रेनचं प्रवासी विमान क्षेपणास्त्र हल्ल्यात पाडल्याची कबुली इराणने दिली आहे. इराणच्या लष्कराने ही मानवी चूक असल्याचं म्हटलंय. इराणच्या हल्ल्यात विमानातील १७६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ‘युक्रेनच्या विमानाचा तेहरानजवळील अपघात क्षेपणास्त्राच्या माऱ्यामुळे झाला नव्हता, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे,’ असा दावा इराणचे नागरी हवाई उड्डाणप्रमुख अली आबेदजाहेद यांनी शुक्रवारी केला होता.
5 वर्षांपूर्वी -
इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला
इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर २२ क्षेपणास्त्रे डागल्याने इराण आणि अमेरिकेतील संघर्ष तीव्र झाला असतानाच बुधवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा इराकची राजधानी बगदादमधील सुरक्षेची तटबंधी असलेल्या ग्रीन झोनमध्ये दोन कत्युशा क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. या हल्ल्यात कोणतीही हानी झालेली नाही असा दावा, इराकी सैन्याने केला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या दूतावासापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर यातील एक क्षेपणास्त्र कोसळले. दरम्यान, या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले; बदला घेण्यास सुरुवात
इराकमधील अमेरिकी लष्कराच्या हवाईतळावर इराणने मोठा हल्ला चढवला आहे. किमान १२ क्षेपणास्त्रे इराकमधील अमेरिकेच्या लष्कराच्या ताब्यातील अल असद हवाईतळावर डागण्यात आली आहेत. पेंटागॉनने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिका विरुद्ध इराण युद्धाचे ढग आणखीच गडद झाले आहेत. या हल्ल्यात ३० अमेरिकेचे सैनिक मारले गेल्याचं इराणच्या माध्यमांकडून सांगण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
इराणची ५२ ठिकाणे आमच्या निशाण्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा धमकी
इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने ड्रोनद्वारे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणी लष्करातील परदेशात काम करणाऱ्या अल्-कुद्स दलाचा शक्तिशाली कमांडर जनरल कासीम सुलेमानी मारला गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी रात्री उशिरा इराणने प्रतिहल्ला चढवत बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र तसेच मोर्टार डागल्याने युद्धाचे ढग दाटू लागले असून इराणमधील ५२ प्रमुख ठिकाणांवर हल्ला करण्याची थेट धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेचा इराकवर पुन्हा एअरस्ट्राईक; ६ जणांचा मृत्यू; युद्ध भडकण्याची शक्यता
अमेरिकेने इराकच्या बगदादमध्ये शनिवारी पुन्हा एक हवाई हल्ला केला. उत्तरी बगदादमध्ये शनिवारी सकाळी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी याच्यासह ८ जणांचा मृत्यू झाला होता.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर कासेम सुलेमानी ठार
अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले आहेत. कासिम सुलेमानी यांचा ताफा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून हाशेद-अल-शबिबी फोर्सचे उपप्रमुख अबू मेहदी अल मुहांदिसही ठार झाल्याची माहिती आहे. इराकच्या सरकारी वृत्तवाहिनीने, कासिम सुलेमानी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं
कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अल्माटी विमानतळावर टेक ऑफ घेताना जवळ असलेल्या दोन मजली इमारतीवर हे विमान आदळलं. यावेळी विमानात १०० प्रवासी प्रवास करत होते. यापैकी काही प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर; ट्रम्प यांना झटका
सत्तेचा दुरुपयोग केल्याच्या आरोपावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात कनिष्ठ सभागृह असलेले हाउस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह मध्ये झालेल्या ऐतिहासिक मतदानाद्वारे महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला. आता ट्रम्प यांना सत्तेवरून हटवण्यासाठी उच्च सभागृह असलेल्या सेनेटमध्ये महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करप्रमुख मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात विशेष कोर्टाने आज मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मुशर्रफ सध्या पाकिस्तानात नाहीत. त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोग्याबाबत माहिती दिली होती. मी कोणत्या परिस्थितीत आहे हे चौकशी आयोगानं येऊन पाहावं, असं ते म्हणाले होते.
5 वर्षांपूर्वी -
CAB २०१९: नागरिकत्व नसलेल्या भारतासहित पाकिस्तान-बांगलादेशी हिंदूंची नाचगाणी
राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. त्याअगोदर ते लोकसभेतही मंजूर झाले होते. या विधेयकाला दोन्ही सभागृहात विरोधकांनी विरोध केला होता. शिवसेनेने लोकसभेत फारसा विरोध केला नाही. परंतु, राज्यसभेत शिवसेनेने विरोध केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सभागृहात या विधेयकावर स्पष्ट मत मांडले. या विधेयकाच्या माध्यमातून मतांचे राजकारण व्हायला नको, असे राऊत म्हणाले. एवढेच काय तर या विधेयकाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने सभात्याग केला. परंतु, तरीही राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकन आयोगाची भारताचे गृहमंत्री अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी
आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन आयोगाने केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हे चुकीच्या दिशेने जाणारे धोकादायक वळण आहे असे अमेरिकन आयोगाने म्हटले आहे. हे विधेयक भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत अशी मागणी आयोगाने केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मेट्रो डान्स द जंगल! स्पॅनिश मीडियाकडून 'आरे बचाव आंदोलनाची' दखल
मागील काही महिन्यांपासून #SaveAarey अभियानाने मुंबईमध्ये निसर्गाप्रती मोठी जनजागृती आणि उठाव होताना दिसला. त्यात सामान्य मुंबईकर, पर्यावरण तज्ज्ञ आणि संस्था तसेच अनेक राजकीय पक्षांनी सहभाग घेतल्याने तत्कालीन सत्ताधाऱ्यांची निवडणुकीच्या तोंडावर झोप उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. हट्टाला पेटलेले निसर्गविरोधी सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी मात्र प्रसार माध्यमांच्या प्रश्नांनी मोठ्या गर्तेत अडकल्याचे पाहायला मिळत होतं. त्यात याच अभियानात हिंदी आणि मराठी चित्रपट श्रुष्टीतील लोकांनी समर्थनार्थ आणि काहींनी विरोधात सहभाग नोंदवल्याने प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोठ्या प्रमाणावर आरे कॉलनीकडे वर्ग झाले होते. मात्र खरी खिंडार लढवली मुंबई आणि आसपासच्या शहरातील सुशिक्षित तरुणांनी आणि स्थानिक आदिवासी समाजाने हे नाकारता येणार नाही.
5 वर्षांपूर्वी -
सुदानमध्ये कारखान्यातील स्फोटात १८ भारतीय कामगारांचा मृत्यू
सुदानमधील सिरॅमिक कारखान्यात झालेल्या एलपीजी टँकरच्या शक्तीशाली स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १८ भारतीय आहेत. या स्फोटामध्ये १३० जण जखमी झाले आहेत. सुदानमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली आहे. सध्या ७ भारतीय कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर या स्फोटात बचावलेल्या ३४ भारतीय कामगारांना सलुमी सिरामिक फॅक्ट्री रेसिडेन्समध्ये ठेवण्यात आले आहे. स्फोटानंतर फॅक्ट्रीतील १६ भारतीय कामगार बेपत्ता असल्याचंही सांगण्यात येतं. त्यामुळे या कामगारांचं काय झालं? हे कामगार सुद्धा आगीत होरपळले का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसला भीषण आग; ६२ प्रवाशांचा मृत्यू
पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला लागलेल्या भीषण आगीत ६२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३० हून अधिक प्रवासी गंभीररित्या भाजले आहेत. स्फोट झाल्यानं एक्स्प्रेसला आग लागल्याचं सांगितलं जातंय. स्फोटानंतर एक्स्प्रेसचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
समुद्रातील पाण्याच्या वाढत्या स्तरामुळं मुंबई शहर नष्ट होऊ शकते: शास्त्रज्ञांचा इशारा
समुद्रातील पाण्याचा स्तर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं जगभरातील बरेच देश संकटात आहेत. हा पाण्याचा स्तर सतत वाढत असल्यामुळं २०५० पर्यंत जगभरातील अनेक शहरांवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. दरम्यान नुकत्याच एका रिचर्समध्ये याबाबत अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, पाण्याचा स्तर वाढल्यामुळं जगभरातील १५ कोटी लोकांना याचा फटका बसणार आहे. या १५ कोटी लोकांकडे राहण्याची सोयही नसणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
आयसिसचा म्होरक्या बगदादीचा खात्मा: डोनाल्ड ट्रम्प
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISISचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याच्याविरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत बगदादीचा खात्मा झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. यापूर्वी त्यांनी आज सकाळी “काही तरी खूप मोठं घडलंय” अशा आशयाचं ट्विट केलं होतं. त्यामुळे बगदादीच्या खात्याच्या शक्यतेबाबत जगभरात चर्चा सुरु होती. मात्र, आता याला खुद्द ट्रम्प यांनीच पुष्टी दिली आहे. सिरियामध्ये अमेरिकेच्या सैन्याने ही कारवाई केली.
6 वर्षांपूर्वी -
माध्यमांची मुस्कटदाबी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन सरकारविरोधात प्रसार माध्यमांचा ‘ब्लॅक आऊट’
भारतात एकाबाजूला पत्रकारिता सरकारच्या दावणीला बांधली गेल्याची चर्चा जोर पकडत असताना इतर देशात मात्र प्रसार माध्यमं सरकारविरोधात न धजावता बंड पुकारत आहेत. भारतात काही ठराविक प्रसार माध्यमं सोडल्यास जवळपास सर्व प्रसार माध्यमं सरकार सांगेल तशी कृती करून सामान्य लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम करत आहेत. दिवसभर राष्ट्रवादाच्या चर्चा घडवून देशातील इतर गंभीर समस्या सामान्य माणसापासून लपवत असून, देशाचं खोटं चित्र निर्माण करण्यात व्यस्त असल्याचं जाणवतं.
6 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर मेक्सिकोने ३११ भारतीयांना माघारी पाठवलं
मेक्सिकोने ३११ भारतीयांना अवैधरित्या देशात प्रवेश आणि वास्तव्य केल्याबद्दल माघारी पाठवलं आहे. मेक्सिकोनं सर्व भारतीयांना दिल्लीला पाठवलं असून शुक्रवारी सकाळी बोइंग ७४७-४०० चार्टर विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले. मेक्सिकोच्या नॅशनल मायग्रेशन इन्स्टिटूजने याबाबतची माहिती दिली आहे. भारतात परत पाठवलेल्या लोकांकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या नव्या भारतात उपासमारीची स्थिती पाकिस्तानपेक्षाही भीषण: ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट
भारतात उपासमारीची समस्या अधिक गंभीर झाल्याचं ग्लोबल हंगर इंडेक्समधून (जीएचआय) समोर आलंय. जीएचआयमध्ये भारताची घसरण झालीय. ११७ देशांच्या यादीत भारत १०२व्या क्रमांकावर फेकला गेलाय. दक्षिण आशियाई देशांमधील हा सर्वांत खालचा क्रमांक आहे. दक्षिण आशियातील इतर देश हे ६६ ते ९४ व्या स्थानावर आहेत. भारत या यादीत ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्याही मागे आहे. तर पाकिस्तान या यादीत ९४व्या क्रमांकावर आहे.
6 वर्षांपूर्वी