महत्वाच्या बातम्या
-
मोदींचा चमत्कारी विजय ही भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत चिंतेची बाब: द वॉशिंग्टन पोस्ट
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात मोदी लाट नसताना देखील प्रत्यक्षात मोदी त्सुनामी आली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मोदींच्या या यशानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तसेच लोकांमध्ये सुद्धा आता २-३ दिवसानंतर वेगळीच चर्चा चौकाचौकात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने या संदर्भात एक लेख प्रसिद्ध केला आहे. भारतासारख्या विशाल लोकशाहीत मोदींचा आश्चर्यकारक विजय अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताने पुरवलेल्या ‘EVM’वर बोत्स्वाना देशात संशय; थेट निवडणूक आयोगाला कोर्टात हजेरीचे आदेश होते
देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि देशभरात मोदी त्सुनामी आल्याचे दिसले. त्यात अनेकांनी या निकालावर आश्चर्य व्यक्त करत वेगळीच शंका व्यक्त केली होती. दरम्यान अनेकांनी देशात मोदी लाट नक्कीच नव्हती असं जाहीर पणे म्हटलं आणि अनेक भाजप नेत्यांनी देखील ते पडद्याआड मान्य केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बहुबल भागात देखील भाजपच्या उमेदवारांना भरभरून मतं पडल्याने त्यात शंका अधिक दुणावल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
ऑस्ट्रेलियात संसदीय निवडणुकीत प्रत्यक्ष निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध लागले
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर रविवारी सर्वच टीव्ही वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजांनी काँग्रेससहित सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळाली. देशभरातील जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच सत्तेत विराजमान होणार असे संकेत देण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत ग्रीन कार्ड ऐवजी बिल्ड अमेरिका व्हिसा
अमेरिकेत मागील अनेक वर्ष विदेशी नागरिकांच्या अमेरिकेतील कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड दिले जात होते. मात्र आता ती पद्धत बंद करण्यात येणार असून त्याऐवजी ‘बिल्ड अमेरिका व्हिसा’ पद्धत लागू करण्याचे तेथील ट्रम्प प्रशासनाने निश्चित केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, जगातील कोणत्याही माणसाला अमेरिकेत येण्यास बंदी नसेल. तुम्ही कोणत्याही देशात जन्मलेले असा तुमच्याशी कसलाही भेदभाव न करता तुम्हाला अमेरिकेत कायम स्वरूपी राहण्यासाठी ही नवीन व्हिसा पद्धत सुरू केली जाणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
वर्ल्ड कपचं थीम सॉंग ऐकलंत?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या ३० मेपासून सुरू होत आहे. त्यामुळे सध्या जगभरात क्रिकेटची जादू दिसत आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंप्रमाणेच चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC)ने शुक्रवारी समाज माध्यमांवरून वर्ल्ड कपचं थीम सॉंग शेअर केलं आहे. ‘Stand By’ असे या गाण्याचे बोल असून Rudimental या बँडने हे गाणं गायलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
हुवेई कंपनी विरोधात? सायबर हल्ल्याची भीतीने ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत आणीबाणी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषीत केली आहे. परकीय शत्रूंपासून अमेरिकेच्या कॉम्प्युटर नेटवर्क्सना वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी हे तडकाफडकी पाऊल उचललं आहे. यामुळे अमेरिकेच्या स्थानिक कंपन्यांना राष्ट्रीय सुरक्षेत अडचणी आणणाऱ्या परदेशी टेलिकॉम कंपन्यांची सेवा वापरने शक्य होणार नाही. ट्रम्प यांनी याबद्दलच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची अधिकृत माहिती व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत चीनी वस्तूंवर तब्बल २५% कर आकारला जाणार
अमेरिकेशी चीनची चर्चा फिस्कटली असून अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध आता अधिकच विकोपाला जाण्याची शक्यता आहे. व्यापार व्यवहार वाचविण्यासाठी झालेल्या अंतिम बैठकीदरम्यान अमेरिकेने २०० अब्ज डॉलरच्या चीनी उत्पादनांवरील आयात कर १० टक्क्यांनी वाढवून तो तब्बल २५ टक्के इतका वाढवला आहे. त्यामुळे आता चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के आयातकर आकारला जाणार आहे. मात्र चीननेदेखील यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी थेट धमकी ट्रम्प प्रशासनाला दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सिरीयल बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत उसळली दंगल; समाज माध्यमांवर बंदी
श्रीलंकेमध्ये २१ एप्रिलला चर्च आणि हॉटेलांबाहेर झालेल्या ८ साखळी बॉम्बस्फोटांचे पडसाद आता उमटू लागले आहेत. तेथील नेगोंबोमध्ये स्थानिक सिंहली आणि मुस्लिमांदरम्यान दंगल भडकली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून श्रीलंकन सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर सुमित अटापट्टू यांनी सांगितले की, परिस्थिती सध्या नियंत्रणात आणण्यासाठी कर्फ्यु लावण्यात आला आहे. काल सदर घटना घडली. अफवांना रोखण्यासाठी समाज माध्यमांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
'फिंच' या दुर्मिळ पक्षांसाठी ऑस्ट्रेलियात अदाणींच्या खाण उद्योगाला स्थगिती, पण भारतात?
परदेशात नागरिक निसर्गाप्रती तसेच पशुपक्षांप्रती किती जागृत आहेत यांचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. कारण भारतातील मोठे उद्योगपती तसेच मोदींचे मित्र गौतम अदानी यांना ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड सरकारने चांगलाच झटका दिला आहे. क्वीन्सलँडच्या स्थानिक सरकारने देशातील दुर्मिळ सफेद गळ्याच्या फिंच पक्षांच्या संरक्षणासाठी अदाणींच्या अब्जावदीच्या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. तसेच तेथील स्थानिक नागरिक देखील अडणींच्या या खाण प्रकल्पाविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत आणि त्यामुळे सरकारवर देखील प्रचंड दबाव वाढला होता.
6 वर्षांपूर्वी -
लँडिंग दरम्यान बोइंग ७३७ विमान फ्लोरिडाच्या नदीत कोसळलं, कोणतीही जीवितहानी नाही
फ्लोरिडामधील जॅक्सनविलेच्या सेंट जॉन नदीत शुक्रवारी बोइंग ७३७ प्रवासी विमान कोसळलं. नेव्हल एअर स्टेशन जेक्सनविलेच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की, विमान लँडिंग करत असताना ही दुर्घटना घडली आहे. विमान नदीत कोसळलं, त्यादरम्यान विमानातून १३६ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
6 वर्षांपूर्वी -
अमरिकेचे परराष्ट्र सेक्रेटरी पॉम्पीओ यांच्या मसूद अझहर विषयक ट्विटने मोदी तोंडघशी
अमेरिकेचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी अध्यक्ष माईक पॉम्पीओ यांनी मसूद अझहर विषयक एक ट्विट केल्याने नरेंद्र मोदी तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे. भारतात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि विशेष करून मोदी ‘जैश ए मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहर याला आमच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने आंतरराष्ट्रीय दहशदवादी घोषित केल्याच्या बाता मारून, प्रचारात स्वतःची पाट थोपटून घेत असल्याचे काल पासून पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कराचा दावा नेपाळ सैन्यानं फेटाळला, ती पावलं हिममानवाची नव्हे, तर जंगली अस्वलाची
लोक कथांमधील ‘येती’ या रहस्यमय हिममानवाच्या पाऊलखुणा नेपाळमधील मकालु बेसकॅम्पच्या परिसरात आढळल्याचा दावा भारतीय लष्कराने केला, त्यानंतर आता नेपाळ सैन्याच्या प्रवक्त्यानं भारतीय लष्कराचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. तसेच ती पावलं येतीची नव्हे, तर जंगली अस्वलाची असल्याचा खुलासा नेपाळच्या सैन्यानं केला आहे. लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालकांनी सोमवारी रात्री हा दावा करणारे ट्विट केले आणि त्यासोबत बर्फात उमटलेल्या ‘येती’च्या पाऊलखुणांची काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली.
6 वर्षांपूर्वी -
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
भारतातील अनेक महत्वाच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तसेच कुख्यात दहशदवादी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कुटनितीला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) बुधवारी (दि.१) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
श्रीलंकेतील कोलंबोमध्ये ८ बॉम्बस्फोट, २०७ जणांचा मृत्यू
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये तब्बल ८ ठिकाणी एकामागे एक साखळी बॉम्बस्फोट झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील ३ बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली होती. परंतु, त्यानंतर आता आणखी २ बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. ७व्या बॉम्बस्फोटात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८व्या बॉम्बस्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी ७ जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
पॅरिस: ‘नोट्रे-डेम-कॅथेड्रल’ चर्चला भीषण आग
पॅरीसमधील सर्वात प्राचीन आणि नेपोलिअन बोनापार्टचा राज्याभिषेक झालेल्या ८५० वर्षांच्या ऐतिहासिक नॉट्र डॅम कॅथेड्रल चर्चला भीषण आग लागली आहे. बाराव्या शतकातील ऐतिहासिक चर्च सोमवारी आगीच्या भक्षस्थानी पडले असून या चर्चच्या छताचा भाग जळून खाक झाला आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे स्थानिक अग्निशामक दलाने सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींकडून १० एप्रिल २०१५ ला राफेल कराराची घोषणा, मग ६ महिन्यांत अंबानींच्या कंपनीला करमाफी
फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल लढाऊ विमाने घेण्याचा सौदा भारत व फ्रान्स यांच्यात होत असतानाच दुसऱ्या बाजूला अनिल अंबानी यांच्या फ्रान्समध्ये व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीस तेथील सरकारने सुमारे १,२६० कोटी रुपयांचा (१४३ दशलक्ष युरो) कर माफ केल्याचे वृत्त ‘ल मॉन्द’ या अग्रगण्य फ्रेंच वृत्तपत्राने दिल्यानंतर भारतात आधीपासून सुरु असलेल्या राफेल वादास शनिवारी नवी उकळी फुटली.
6 वर्षांपूर्वी -
आम्हाला मोदींचे दोन चेहरे पाहायला मिळणार, एक निवडणुकीपूर्वीचा व एक निवडणुकीनंतरचा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सध्या विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास पुन्हा चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने भारतातील काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असं इम्रान खान यांनी मत व्यक्त केलं आहे. गुरुवारपासून भारतात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. लोकसभेच्या ९१ जागांसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानचं F-16 पडलंच नाही? अमेरिकन मासिक 'फॉरेन पॉलिसी'
पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यातील सर्व एफ-16 हे अमेरिकन लढाऊ विमानं सुरक्षित असल्याचा दावा अमेरिकेच्याच एका प्रसिद्ध मासिकानं केल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचं एफ-16 पाडल्याचा भारताचा दावा चुकीचा असू शकतो, असं ‘फॉरेन पॉलिसी’ या मासिकानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं मासिकानं हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या २ उच्च अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन वृत्त दिल्याचं मासिकानं स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
दक्षिण कोरिया जगातील पहिली 5G सेवा देणारा देश
तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे असलेल्या अमेरिका, चीन, रशियाला देखील मागे टाकत दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशाने जगात पहिल्यांदा 5G सेवा देण्याचा पराक्रम केला आहे. काल म्हणजे बुधवारी रात्री अकरा वाजता देशवासियांसाठी 5G सेवा अधिकृतपणे लाँच करण्यात आली. दक्षिण कोरियाने यापूर्वी ५ एप्रिल ही देशात 5जी सेवा सुरु करण्यासाठी तारिख निश्चित केली होती. परंतु, अमेरिकी कंपन्यांना हरवण्यासाठी २ दिवस आधीच ही सेवा सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे 4Gच्या तुलनेत 5G तब्बल २० पटींनी वेगवान असणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
फेसबुकने काँग्रेस संबंधित तब्बल ६८७ पेज, अकाऊंट्स डिलीट केले
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेसबुकने कॉंग्रेस पक्षाला जोरदार डिजिटल धक्का दिला आहे. फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेली तब्बल ६८७ पेज आणि अकाऊंट्स डिलीट केली आहेत. त्यांच्या माहितीनुसार आक्षेपार्ह भाषेचा वापर असलेल्या तसेच निलंबित करण्यात आलेली सुमारे ६८७ फेसबूक पेजेस आणि अकाऊंट्स फेसबूकने हटवली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी