महत्वाच्या बातम्या
-
मालिका विजयासाठी भारत-ऑस्ट्रेलिया आज भिडणार
भारत-ऑस्ट्रेलिया या संघांमधील मालिकेचा अखेरचा आणि निर्णायक सामना आज बुधवारी राजधानी दिल्लीतील फिरोजशाह कोटला क्रिकेट मैदानात रंगणार असून आजचा सामना जिंकणारा संघ ही एकदिवसीय मालिका आपल्या नावावर करणार असल्याने दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणार आहेत. त्यामुळे नवी दिल्लीतील फिरोज शाह कोटला येथे होणार्या पाचव्या एकदिवसीय सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
ब्रेग्झिटचा प्रस्ताव पुन्हा फेटाळला; थेरेसा मे यांना पुन्हा जोरदार धक्का
ब्रिटीश संसदेने अंमलबजावणीच्या फक्त १७ दिवसआधी ब्रेक्झिटचा प्रस्ताव फेटाळल्याने ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा धक्का बसला आहे. युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा प्रस्ताव दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. ब्रिटनच्या संसदेने ब्रेक्झिट करारावरील प्रस्तावित बदलांना २४२ विरुद्ध ३४१ अशा मोठ्या फरकाने संख्येने नाकारलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
इथिओपियातील विमान दुर्घटनेत १५७ प्रवाशांचा मृत्यू, ४ भारतीयांचा समावेश
इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून नैरोबीला निघालेले इथिओपियन एअरलाइन्सचे विमान अपघातग्रस्त झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. या विमानातून एकूण १४९ प्रवासी आणि ८ कर्मचारी प्रवास करत होते. विमान कोसळून तब्बल १५७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ भारतीय प्रवाशांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: नीरव मोदी लंडनच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरतो
पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा चुना लावून फरार झालेला नीरव मोदी सध्या इग्लंडची राजधानी लंडनमध्ये राहत असल्याचे समजते आहे. द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने मोदीचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यात तो लंडनच्या रस्त्यांवर मोकळेपणाने फिरताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेजगाम जिल्ह्यामधून भारतीय लष्कराच्या एका जवानाचं अपहरण
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. तसेच बेजगाम जिल्ह्यामधून एका भारतीय लष्कराच्या जवानाचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागात प्रचंड भीतीदायक वातावरण पसरले आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाची काही वेळात पत्रकार परिषद
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. तसेच बेजगाम जिल्ह्यामधून एका भारतीय लष्कराचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागात प्रचंड भीतीदायक वातावरण पसरले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारतासमोर ३१४ धावांचे आव्हान
विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत आज तिसर्या सामन्यात विजय मिळवून मालिका विजय मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हा झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जात आहे. ५ सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत भारताने पहिले २ सामने जिंकून मालिकेत आघा़डी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने भारतीय संघ खेळेल. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३०० पार गेली असून भारतासमोर विजयासाठी ३१४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शांतीवार्ता! १८२ मदरसे ताब्यात, १०० दहशतवादी अटकेत: पाकिस्तान गृह मंत्रालय
पाकिस्तानने इस्लामिक दहशतवाद्यांविरूद्ध मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यादरम्यान पाकिस्तानी सरकारने एकूण १८२ मदरसे स्वतःच्या नियंत्रणात घेत, पाकिस्तानने बंदी घातलेल्या संघटनांशी संबधित असलेल्या शंभर दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई आम्ही योग्य नियोजन करून अमलात आणल्याचे पाकिस्तानच्या सरकारकडून सांगण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: अमेरिकन प्लॅनेट लॅब्जने बालाकोट मदरसा संकुलाचे सॅटेलाईट व्हिडिओ प्रसिद्ध केले, भारतीय माध्यमं तोंडघशी?
पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याचे आणि अनेक दहशतवाद्यांना मारल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते खुलेआम दावे करत आहेत. भारतीय वायुदलाने कोण आणि किती जण मृत्युमुखी पडले ते आमचं काम नाही असा अप्रत्यक्ष संदेश दिला होता. तर दुसरीकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य सचिव विजय गोखले यांनी ती ‘बिगर लष्करी कारवाई’ तसेच ‘प्रतिबंधात्मक कारवाई’ असा शब्दप्रयोग करून सामान्यांना बरंच काही सांगितलं होतं. परंतु. भारतीय प्रसार माध्यमांनी विषय वेगळ्या पद्धतीने चिघळवुन सत्ताधाऱ्यांसाठी लोकसभेच्या अनुषंगाने हवानिर्मिती करण्यास मदत केल्याचं पाहायला मिळालं.
6 वर्षांपूर्वी -
भारत-पाकिस्तानमध्ये ‘समझोता एक्सप्रेस’ ३ मार्चपासून सुरळीत
पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफ’च्या जवानांवरील भ्याड दहशदवादी हल्ला आणि त्यानंतर एअर स्ट्राईकनंतर भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली समझोता एक्सप्रेसची सेवा ३ मार्चपासून सुरळीत सुरु झाली आहे. दोन्ही देशांनी मिळून रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील रविवारी दिल्लीमधून पाकिस्तानसाठी समझोता एक्सप्रेस पुन्हा निघाली होती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही तशी अधिकृत माहिती दिली प्रसिद्ध केली होती.
6 वर्षांपूर्वी -
कर्तारपूर कॉरिडॉर संदर्भात पाकचे अधिकारी भारत भेटीवर येणार: पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालय
पुलवामा भ्याड हल्ला आणि एअर स्ट्राईकनंतर भारत पाकिस्तानमधील परिस्थिती नाजूक झालेली असताना आता शांतीवार्ता सुरु होण्याचे अनेक प्रकार पुढे येऊ लागले आहेत आणि तणाव कमी करण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळेच कर्तारपूर कॉरिडॉर हा एक भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर करण्याचा महत्वाचा मार्ग ठरण्याची शक्यता आहे. कारण विषयाला अनुसरून चर्चेसाठी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच भारत भेटीवर येणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा मोदी सरकारला झटका; 'व्यापार संधी' तोडली
अमेरिकेने भारत आणि तुर्कस्तानशी असलेली व्यापार संधी (GSP) तोडली असून विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा काढून घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सिनेटमध्ये ही अधिकृत माहिती दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा मोठा परिणाम भारतावर जाणवणार असून अधिसूचना जारी झाल्यानंतर २ महिन्यांनी हा बदल लागू होणार आहे. GSP अंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारत नव्हती.
6 वर्षांपूर्वी -
राफेल काय साध्य करेल ते भविष्य, पण बोफोर्स तोफांनी कारगिल युद्धात काय साध्य केलं ते पहिलं मोदींनी समजून घ्यावं: नेटिझन्स
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानखरेदीचे समर्थन करताना, ‘आज आपल्याकडे राफेल विमाने असतात, तर आणखी बरेच काही साध्य करता आले असते’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले. सातत्याने टीका होत असताना या राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराचे समर्थन करत नरेंद्र मोदींनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
6 वर्षांपूर्वी -
हल्ल्यानंतर किती ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दलाचे नाही, ते सरकारचे काम
भारतीय वायुदलाने बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेली कारवाई कितपत परिणामकारक ठरली यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यावर वायुदल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी ध्येयावर थेट प्रहार केल्यानंतर त्यात किती जण मारले गेले ते मोजण्याचे काम वायुदल करत नाही. ते काम सरकारचे असते त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
6 वर्षांपूर्वी -
२६ फेब्रुवारीला ब्रेकिंगन्यूजमध्ये मारलेल्या मसूदच्या भावांचे आवाज ३ मार्चला कसे ऐकू येत आहेत?
भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारी मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रशिक्षण तळ आणि शस्त्रास्त्रांचा अगणित साठा पूर्णपणे बेचिराख झाल्याच्या ब्रेकिंग न्यूज झळकताना दिसल्या. त्यानंतर काही वेळाने, एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख नेते मारले गेले आहेत. त्यात अफगाणिस्तान व काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मौलाना अम्मर, मौलाना मसूद अजहरचा भाऊ मौलाना तल्हा सैफ, काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मुफ्ती अझर खान आणि आयसी-८१४ विमानाच्या अपहरणात सहभागी असलेला मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर हे देखील मारले गेल्याच्या बातम्या झळकत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मसूद अझहर जिवंत, पाकिस्तानी माध्यमं
पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर हा भारतीय हवाईदलाने चढविलेल्या हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्ताने रविवारी खळबळ माजली. मात्र, आता पाकिस्तानी माध्यमांनी मसूदच्या नातेवाईकांचा हवाला देत मसूद जिवंत असल्याचा दावा केला आहे. तसेच जैश ए मोहम्मदने देखिल हे वृत्त फेटाळले आहे.
6 वर्षांपूर्वी -
डिजिटल देशभक्तांचे राज ठाकरे ते वीर पत्नींच्या विरोधात विकृत अभियान: सविस्तर पुरावे
पुलवामामधील भ्याड हल्ल्यादरम्यान सीआरपीएफचे तब्बल ४४ जवान शहीद झाले . त्यानंतर भारतीय वायुदलाने दहशदवाद्यांच्या विरोधात केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशातील आणि आंतरराष्ट्रीय वातावरण ढवळून निघालं आहे. वायुदल, लष्कर किंवा नौदल असो त्यांच्या शौर्यावर कोणत्याही भारतीयाला शंका नाही. परंतु, विषय येतो आहे तो सत्ताधाऱ्यांच्या विकृत समर्थकांनी राबवलेल्या विकृत अभियानाचा आणि काही ठराविक लोकांविरोधात ठरवून आणि तयारीनिशी राबविलेल्या अभियानाचा.
6 वर्षांपूर्वी -
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया; भारतापुढे विजयासाठी २३७ धावांचे आव्हान
आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया संघात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यास भारतीय संघ उत्सुक असेल. उभय संघात ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे मालिकेत भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. त्याच विजयाची पुनरावृत्ती करण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, ३ नागरिक ठार
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री भारतात परतले. मात्र, सीमेवर भारत-पाकिस्तान दरम्यान अद्याप तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे.
6 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्यूज - उद्या होणार भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका
पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान यांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती आणि कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.
6 वर्षांपूर्वी