महत्वाच्या बातम्या
-
केवळ एका दिवसात २ लाख १८ हजार कोटींची विक्रमी कमाई
चायनामधील महाकाय कंपनी ‘अलीबाबा’ या ऑनलाइन विक्री करणाऱ्या पोर्टलने रविवारी ११ नोव्हेंबरला तब्बल २ लाख १८ हजार कोटींची कमाई करण्याचा विक्रम केला आहे. दरम्यान, केवळ एकाच दिवसात इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात विक्री करणारी अलीबाबा ही जगातील पहिली चिनी वेबसाइट ठरली आहे. चीनमध्ये प्रतिवर्षी ११ नोव्हेंबरला “सिंगल्स डे” साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून या दिवशी दरवर्षी अलिबाबा ग्राहकांना आकर्षक सूट देते.
7 वर्षांपूर्वी -
पुतळ्यासाठी पैसे आहेत, मग नक्कीच भारताला आपण पैसे द्यायला नको: पीटर बोन
गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८५ मीटर उंचीच्या भव्य पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्यावर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, जगातला सर्वांत उंच पुतळा बांधल्याबद्दल एकीकडे मोदी सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, तर विरोधक या पुतळ्यावर ३ हजार कोटी खर्च केल्याबद्दल मोदी सरकारवर सडकून टीका करत आहेत. परंतु, आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा या स्मारकावर टीका होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: असा झाला डोनाल्ड ट्रम्प यांचा CNN च्या पत्रकारासोबत वाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना CNN चा पत्रकाराचा प्रश्न झोंबल्याने त्यांचा त्या पत्रकारासोबत वाद झाला. विशेष म्हणजे या वादानंतर पत्रकाराचे थेट ओळखपत्र सुद्धा काढून घेण्यात आले. जिम अकोस्टा असे या संबंधित पत्रकाराचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने डोनाल्ड ट्रम्प यांना थेट विस्थापितांबाबतचा प्रश्न विचारला असता ही घटना घडली.
7 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; डेमॉक्रेटीक पक्षाची बहुमताकडे घोडदौड
सध्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकी सिनेटमध्ये वर्चस्व राखण्यात यश प्राप्त केले आहे. परंतु, अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये डेमॉक्रेटीक पक्षाने पुन्हा जोरदार मुसंडी मारल्याने तो डोनाल्ड ट्रम्प यांना राजकीय धक्का असल्याचे राजकीय जाणकारांना वाटतं आहे.
7 वर्षांपूर्वी -
RBI आणि केंद्र सरकारच्या वादावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची नजर
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बँंकेच्या स्वातंत्र्याबाबत तडजोडीस तीव्र विरोध दर्शविला असून, जगातील कोणत्याही केंद्रीय बँकेच्या स्वातंत्र्याबाबत आडकाठी आणण्याच्या हालचालींवर एएमएफ’ची नजर असल्याचं मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केलं आहे. तसेच जगातील कुठल्याही केंद्रीय बँकेच्या स्वातंत्र्याबाबत तडजोड करण्याच्या हालचालींना एएमएफ’चा तीव्र विरोध असल्याचे सुद्धा म्हटले आहे. सध्या भारतात RBI आणि मोदी सरकारमध्ये वाद पेटल्याच्या विषयाला अनुसरून IMF ने मत व्यक्त केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
लायन एअरवेजचं विमान समुद्रात कोसळलं, विमानात १८८ प्रवासी होते
इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये आज सकाळी मोठी दुर्घटना घडली असून जकार्ताहून उड्डाण केलेले लायन एअरवेजचे प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या अपघातग्रस्त प्रवासी विमानात एकूण १८८ प्रवासी होते अशी माहिती पुढे येत आहे. लायन एअरवेजचं जेटी ६१० हे प्रवासी विमान समुद्रात कोसळले असून उड्डाणाच्या अवघ्या १३ मिनिटांनंतर ही दुर्घटना घडली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानात भारतीय चित्रपट व मालिकांवर कायदेशीर बंदी
पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करणाऱ्या भारतीय समर्थकांना आज चांगलाच धडा मिळाला आहे. कारण पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने शनिवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान भारतीय चित्रपट आणि मालिकांवर बंदीचा घालण्याचे आदेश दिले आहेत. याआधी २०१७ मध्ये लाहोर हायकोर्टाने भारतीय मालिका आणि चित्रपटांवरील बंदी हटवली होती. परंतु, या आदेशामुळे बॉलिवूडला सुद्धा मोठा धक्का बसला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदींच्या इच्छेला नकार, प्रजासत्ताक दिनी ट्रम्प यांचा भारतात येण्यास नकार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची मोदींच्या विनंतीला सपशेल नकार दिल्याने पंतप्रधान मोदींना राजकीय धक्का बसला आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःला आंतरराष्ट्रीय नैतृत्व म्हणून प्रदर्शन करण्याचा त्यांचा अप्रत्यक्ष हेतू सुद्धा धुळीस मिळाल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
लैंगिक शोषणाच्या आरोपावरून; गुगलकडून ४८ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली असली तरी, न्यूयॉर्क टाइम्सच्या या बातमीत गुगलने लैंगिक गैतवर्तवणुकीचा आरोप असलेल्या आपल्या तीन वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम देत वाचवलं असल्याचा दावा करण्याता आला होता. सुंदर पिचाई यांनी त्यांच्या ई-मेलमध्ये ज्या ४८ कर्मचाऱ्यांवर लैंगिक गैरवर्तवणूक प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे, त्यातील १३ कर्मचारी हे सीनिअर मॅनेजर किंवा सीनिअर पोस्टवरील कर्मचारी होते अशी माहिती प्रसिद्ध केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
विराट कोहली १०,००० धावांचा पल्ला गाठणाऱ्या विक्रमवीरांच्या यादीत
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताय टीमचा कर्णधार विराट कोहलीने १०,००० धावांचा पल्ला गाठला आहे. १०,००० धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये त्याने आज दिमाखात प्रवेश केला आहे. विराटने १०,००० धावांचा टप्पा केवळ २०५ डावांमध्ये ओलांडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
चीनने तिबेटमार्गे भारतात येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी रोखले
चीनने आता भारताला डिवचण्यासाठी नव्या कुरापती काढण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. तिबेटमार्गे भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अडविल्यात आल्याचे समजते. चीनच्या या निर्णयामुळे चीनच्या सीमेवर लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशातील अनेक भागात दुष्काळाचं मोठं सावट असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याबाबत केंद्र सरकार कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन
बिल गेट्स यांचे मित्र आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे ६५ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. मागील अनेक वर्ष ते कर्करोगाने त्रस्त होते. अॅलन यांनी त्यांचे लहापणीचे मित्र बिल गेट्स यांच्यासोबत जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. अॅलन यांची कंपनी व्हल्कन इंकने याबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
एस-४०० करार : भारताला लवकरच CAATSA निर्बंधांबाबतचा कळेल : डोनाल्ड ट्रम्प
काऊंटरिंक अमेरिकाज एडवर्ड्सरीज थ्रू सेक्शन्स अॅक्ट अर्थात CAATSA अंतर्गत अमेरिकेकडून घालण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत भारत सरकारला लवकरच माहिती कळेल, असे स्पष्ट संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यामुळे कालांतराने भारताच्या आर्थिक अडचणी वाढल्यास आश्चर्य वाटायला नको.
7 वर्षांपूर्वी -
राफेल करारासाठी दसॉल्टला रिलायन्ससोबत व्यवहाराची अट घालण्यात आली होती? मीडियापार्टचा गौप्यस्फोट
भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल या लढाऊ विमान खरेदी करारावरून फ्रान्सच्या प्रसार माध्यमांकडूनच नवे खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. राफेल विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा फ्रान्समधील मीडियापार्ट या नामांकित डिजिटल न्युजने केला होता. दरम्यान, दसॉल्ट एव्हिएशनने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून, आम्ही केवळ स्वायत्तमपणे भागीदार म्हणून रिलायन्सची निवड केल्याचे स्पष्ट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या जेरेमीने पटकावले पहिले सुवर्ण
भारताचा युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरीनुंगाने यंदाच्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला आहे. ६४ किलो वजनी गटात त्याने एकूण २७४ किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले.
7 वर्षांपूर्वी -
रशियाकडून एस-४०० खरेदी केल्यास अमेरिका भारतीय उत्पादनांवर कर लादणार?
भारताने रशियासोबत महत्वाकांक्षी असा एस-४०० वायु संरक्षण प्रणाली खरेदी करार केल्यास अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन भारतातील उत्पादनांवर मोठे कर लादण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजून आर्थिक संकटात जाईल अशी शक्यता आहे. भारतीय लष्कराला हवाई सुरक्षेसाठी रशियाकडून मिळणारी एस-४०० वायु संरक्षण प्रणाली सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. त्यात आधीच अमेरिका आणि रशिया यांच्यात पूर्वीपासून तणावाचे संबंध राहिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भारत मोठ्या आर्थिक संकटात: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
जागतिक बाजारपेठेत तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक संकटात असल्याचं वक्तव्यं खुद्द केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया घसरत असून देशात महागाई प्रचंड वाढत असल्याची माहिती सुद्धा त्यांनी या मुलाखतीदरम्यान दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
आज भारतीय रुपया आशियातील सर्वात कमजोर चलन; बघा मोदी २०१२ मध्ये काय बोलले होते?
गेल्या अनेक दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सुरू झालेली घसरण अजूनही सुरूच आहे. आज सुद्धा डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळाली. सलग चौथ्या दिवशी भारतीय रुपयाच्या तुलनेत एका डॉलरची किंमत तब्बल ७३.६० रुपये इतकी झाली आहे. तर दुसरीकडे शेअर बाजारात नकारात्मक परिणाम उमटत आहेत. सेन्सेक्समध्ये तब्बल ५८० अंकांनी घसरण झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पृथ्वी शॉचा विक्रम, कसोटी सामन्यात पदार्पणातच शतक
राजकोट येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात पदार्पणातच पृथ्वी शॉने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. कारकिर्दीत स्थानिक क्रिकेटमध्येच तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी करत भारताला सुस्थितीत उभं केलं आहे. पृथ्वीने ९९ चेंडूत १०१ धावा पूर्ण केल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
अनिल अंबानींना देश सोडून जाऊ देऊ नका, स्वीडिश कंपनी इरिक्सनची सर्वोच्च न्यायालयात धाव
स्वीडिश टेलिकॉम कंपनी इरिक्सनने भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांच्या आरकॉम कंपनी विरुद्ध कायदेशीर लढाई तीव्र केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही अनिल अंबानी यांच्या कंपनीने अजून ५५० कोटी रुपयांची भरपाई इरिक्सनला दिलेली नाही. त्यामुळेच अखेर अनिल अंबानीसह रिलायन्सच्या इतर २ बड्या अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका इरिक्सनने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
7 वर्षांपूर्वी