महत्वाच्या बातम्या
-
भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरमागे तब्बल ७३ ची पातळी ओलांडली
अमेरिकी डॉलरपुढे भारतीय रुपयाचे विनिमय मूल्य रोज नवे नीचांक गाठताना दिसत आहे. सर्व प्रमुख आशियाई देशांच्या चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य खूप वेगाने घसरत आहे. आज बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया ३४ पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर ७३.३४ असा विक्रमी निच्चांकी तळ रुपयाने गाठला आहे, परिणामी महागाईमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारला आयात शुल्कावरून 'टेरिफ किंग' असं संबोधलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावरून मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत निशाणा साधला आहे. आता भारत सरकार अमेरिकेला खूश करण्यासाठीच व्यापार करार करू इच्छितो आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस व्हिडिओ - राफेल करार: फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदी सरकारच खोटं असं बाहेर काढलं
काँग्रेस व्हिडिओ – राफेल करार: फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदी सरकारच खोटं असं बाहेर काढलं
7 वर्षांपूर्वी -
नेपाळींना भाषण देऊन व देशांतर्गत करार न करताच मोदींनी सुरु केलेली जनकपूर-अयोध्या बससेवा बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मे महिन्याच्या ११ तारखेला नेपाळ मध्ये हिरवा झेंडा दाखवत सुरु केलेली जनकपूर ते अयोध्या बससेवा अखेर मार्केटिंगचा दिखावा ठरल्याचे समोर आलं आहे. मोदींच्या अनेक योजना या कालांतराने केवळ प्रोमोशनच माध्यम असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे. त्यात अजून एका योजनेची भर पडली आहे. जनकपूर ते अयोध्या प्रवासात वापरायच्या बसेस काठमांडूमध्ये धुळ खात पडल्या आहे.
7 वर्षांपूर्वी -
त्सुनामी व्हिडिओ: इंडोनेशियात त्सुनामीने हाहाकार, ३८४ नागरिकांचा मृत्यू
इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटावर शुक्रवारी ७.५ रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसल्याने अनेक भागांना त्सुनामीचा मोठा फटका बसला आहे. भूकंपाचं प्रमाण मोठ असल्याने त्सुनामीमुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणावर समुद्राचं पाणी शिरलं आहे. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू होऊन लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पासवर्ड बदला! फेसबुकवर तब्बल ५ कोटी अकाऊंट हॅक, सर्वाधिक भारतीय अकाउंट
फेसबुकवरील तब्बल पाच कोटी अकाऊंट हॅक झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये सर्वाधिक भारतीय अकाऊंटचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे. हॅकर्सनी फेसबुकच्या “View As” या सुविधेच्या सुरक्षेतील उणीवांचा नेमका फायदा उचलत फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती स्वतः कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी प्रसिद्ध केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
त्या व्हिडिओ ने खळबळ: डेसॉल्टचे अध्यक्ष बोलले, राफेलसाठी एचएएल'सोबत करार जवळपास झाला होता
२५ मार्च २०१५ म्हणजे नरेंद्र मोदींच्या फ्रान्स भेटीच्या (१० एप्रिल २०१५) केवळ १५ दिवस आधी फ्रान्समध्ये मिराज-२००० या लढाऊ विमानांच्या हस्तांतराचा कार्यक्रम फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आला होता. डेसॉल्ट एव्हिएशन आयोजित या कार्यक्रमात म्हणजे मोदींनी राफेल बाबत नवीन करार अंमलात आणण्यापूर्वी जे घडलं होत, त्याचे अनेक खुलासे आणि वास्तव समोर आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा व्हिडिओ डेसॉल्ट एव्हिएशनच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल’वरीलच आहे. दरम्यान या कार्यक्रमात मिराज-२००० लढाऊ विमानांच्या हस्तांतरानंतर भारत सरकार आणि भारतीय वायू दल पुढच्या नव्या पिढीतील लढाऊ विमानांच्या बांधणीत म्हणजे राफेलच्या करारात उतरणार होत. त्यात एचएएल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच नाव जवळपास निश्चित झालं होत, असं या व्हिडिओमधून समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
NSG सदस्यत्व; ब्रिटनचा भारताला बिनशर्त पाठिंबा, पण चीनचा विरोध का ते चीननं स्पष्ट करावं
भारत एनएसजीचा सदस्य होण्यास पात्र असून त्यासाठी ब्रिटनचा बिनशर्त पाठिंबा आहे. परंतु भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला विरोध करण्याचं नेमकं कारण काय आहे ते स्वतः चीननं स्पष्ट करावं, असं मत सुद्धा ब्रिटनकडून नोंदवण्यात आलं आहे. एनएसजीच्या सदस्यत्वामुळे अनेक फायदे असल्यानं ब्रिटननं घेतलेली सकारात्मक भूमिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे.
7 वर्षांपूर्वी -
राफेल करार: तेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो, फ्रान्सच्या विद्यमान अध्यक्षांनी हात झटकले
फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी राफेल करारावरुन हात झटकले आहेत. कारण अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन राफेल करारासंबंधित विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तर देण्यापेक्षा ते प्रश्नांना टाळणं पसंत करत आहेत. भारत आणि फ्रान्सदरम्यान ३६ राफेल लढाऊ विमानांच्या लाखो डॉलर्सचा करार झाला तेव्हा आम्ही सत्तेत नव्हतो, असं इमॅन्युएल मॅक्रोन यांनी राजकीय अनुषंगाने उत्तर दिल आहे. ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पत्रकारांशी बोलत होते तेव्हा त्यांनी हे उत्तर दिल.
7 वर्षांपूर्वी -
२४ डिसेंबर २०१५: अनिल अंबानी मोदींसोबत रशियाच्या दौऱ्यावर सुद्धा होते
२४ डिसेंबर २०१५: अनिल अंबानी मोदींसोबत रशियाच्या दौऱ्यावर सुद्धा होते
7 वर्षांपूर्वी -
१० एप्रिल २०१५ - पंतप्रधान मोदी आणि फ्रान्स्वा ओलांद पत्रकार परिषद - पॅरिस
१० एप्रिल २०१५ – पंतप्रधान मोदी आणि फ्रान्स्वा ओलांद पत्रकार परिषद – पॅरिस
7 वर्षांपूर्वी -
भारतीय लष्कर प्रमुखांच्या विधानानंतर पाकिस्तानच्या लष्कराकडून थेट युद्धाची भाषा
पाकिस्तान एक अण्वस्त्र संपन्न देश असून आमचं लष्कर कायम युद्धासाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी दिली आहे. आमचं लष्कर युद्धासाठी नेहमीच सज्ज असतं असं विधान करत, भारताच्या उत्तरावर प्रतिक्रिया दिली आहे. कालच भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केल होत.
7 वर्षांपूर्वी -
राफेल विमान करार: अनिल अंबानींच्या कंपनीचं फ्रान्समधूनच गुपित उघड, मोदी सरकार अडचणीत
फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी राफेल विमान करारासंबंधित धक्कादायक खुलासा केला आहे. त्यात अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स डिफेन्स’ या कंपनीचं नाव भारत सरकारनेच सुचवलं होत असा खुलासा केल्याने मोदी सरकारला धक्का बसला आहे. या व्यवहारासंबंधित नेमके हेच आरोप काँग्रेसने केले होते.
7 वर्षांपूर्वी -
हाँगकाँग - धोनी शून्यावर बाद झाला - छोटा फॅन संतापला
हाँगकाँग – धोनी शून्यावर बाद झाला – छोटा फॅन संतापला
7 वर्षांपूर्वी -
दुबई - पाकिस्तानी मॅच हरले आणि चाहत्यांचा राग अनावर
दुबई – पाकिस्तानी मॅच हरले आणि चाहत्यांचा राग अनावर
7 वर्षांपूर्वी -
व्हिडीओ: मल्ल्याचा गौप्यस्फोट, भारत सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतली होती
भारतीय बँकांना करोडो रुपयांचा चुना लावून भारतातून पलायन करणारा आणि सध्या लंडनमध्ये स्थायिक झालेल्या विजय मल्ल्याने धक्कादायक खुलासा केला आहे. मोदी सरकार अडचणीत येणार विधान त्याने केलं असून मल्ल्या लंडनमधील प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाला की, ‘त्याने भारत सोडण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती’.
7 वर्षांपूर्वी -
गुगल पेमेंट सेवांशी संबंधित डेटा भारतात स्टोर करणार, डिसेंबरपर्यंत वेळ मागितला
जागतिक स्तरावरील आणि इंटरनेट क्षेत्रातील महाकाय कंपनी गुगलने त्यांच्या पेमेंट सेवांशी संबंधित डेटा स्थानिक स्तरावर स्टोर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या नियमांना सहमती दर्शविली आहे. गुगलला त्यासाठी भारतात सर्व्हर बसवावे लागतील. परंतु, गुगलने त्यासाठी केंद्र सरकारकडून येत्या डिसेंबरपर्यंत वेळ मागितला आहे.
7 वर्षांपूर्वी -
जगातील बलाढ्य उद्योगपती जॅक मा निवृत्त, पण काय संदेश दिला उद्योग जगाला?
चीनमधील जगप्रसिद्ध इ-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे संस्थापक आणि चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतःच्या कंपनीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. उद्या म्हणजे सोमवारी १० ऑगस्ट रोजी आणि वयाच्या ५४व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी स्वतःच्या कंपनीतून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला.
7 वर्षांपूर्वी -
जपानची नाओमी ओसाका 'यूएस ओपन २०१८' ची महिला विजेती
चोविसाव्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या विजेतेपदाची आशा असलेल्या सेरेना विल्यम्सला अंतिम फेरीमध्ये पराभवाचा जबरदस्त मोठा धक्का बसला आहे. कारण जपानच्या नाओमी ओसाकाने धक्कादायक खेळी करून कारकिर्दीतील पहिले ग्रॅंड स्लॅम टायटल म्हणजे ‘यूएस ओपन २०१८’च महिला एकेरी विजेतेपद पटकावले आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारत इंग्लंड पाचवी टेस्ट: पहिल्या दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८
भारत इंग्लंड मधील पाचव्या टेस्टमध्ये सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत इंग्लंडला ७ बाद १९८ अशा कात्रीत पकडले आहे. पहिल्या दोन सत्रात इंग्लंडने सामन्यावर चांगली पकड मिळवली होती. परंतु, चहापानानंतर मात्र भारताने तब्बल ६ बळी टिपत इंग्लंडला संकटात टाकले असून भारत सुस्थितीत गेला आहे.
7 वर्षांपूर्वी