महत्वाच्या बातम्या
-
कडवी झुंज; परंतु पी व्ही सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले
चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने २१-१९, २१-१० असे पराभूत केले आहे. त्याआधी स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिनेच भारताच्याच सायना नेहवाल हिला पराभूत केले होते. परंतु पी व्ही सिंधूने सुद्धा कडवी झुंज दिली होती.
7 वर्षांपूर्वी -
तुमच्या अँड्रॉईड मोबाईल'मधील तो ‘UIDAI’चा नंबर येणे ही गुगलची चूक
भारतातील करोडो अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये काल अचानक ऑटोमेटेड पद्धतीने ‘UIDAI’चा टोल फ्री क्रमांक सेव झाला होता. त्यामुळे वायरस किंवा मोबाईल हॅक सारख्या अफवा पसरल्या होत्या. तसेच अनेकांनी त्यासाठी UIDAI’ खात्याला जवाबदार धरले होते, ज्यावर नंतर ‘आधार’ कडून अधिकृत प्रतिक्रिया सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
एक ट्रिलियन डॉलर बाजारभांडवल असणारी ‘अॅपल’ जगातील पहिली कंपनी बनली आहे
आयफोन बनविणारी कंपनी ‘अॅपल’ एक ट्रिलियन डॉलर बाजारभांडवल असणारी जगातील पहिली कंपनी बनली आहे. शेअरमध्ये तेजी आल्याने कंपनीने हा जागतिक दर्जाचा मान प्राप्त केला आहे. अॅपल’नंतर बाजार भांडवलाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो तो अॅमेझॉनचा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे गुगलची ‘अल्फाबेट’ कंपनी आणि या तिन्ही कंपन्या अमेरिकन आहेत.
7 वर्षांपूर्वी -
व्हॉट्सअॅप ग्रुप कॉलची सुविधा राजकारण्यांसाठी निवडणुकीत 'डिजिटल चावडी सभा' होण्याची शक्यता?
आजच व्हॉट्सअॅपने ग्रुप कॉलची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे व्हॉइस व व्हिडीओ कॉल या दोन्ही पर्यायांमध्ये या ग्रुप कॉलची सुविधा देण्यात आली आहे. परंतु त्यात एकाच वेळी कमाल ४ जणांना एकाचवेळी एकमेकांशी संवाद साधता येईल. अँड्रॉइड तसेच आयओएस या दोन्ही प्रणालींवर ही नवी सुविधा उपलब्ध असेल असं कंपनीने म्हंटल आहे. जगभरातील जवळपास दीड अब्ज युजर्स या ग्रुप कॉलिंग सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
7 वर्षांपूर्वी -
विजय मल्ल्या; प्रत्यार्पणाबाबत आज लंडन कोर्टात अखेरची सुनावणी
भारतीय बँकांना तब्बल ९ हजार कोटींचा चुना लावून देशाबाहेर पलायन करणारा आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या उद्योजक विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज लंडन कोर्टात अखेरची सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारताकडून सुद्धा विशेष काळजी घेण्यात येत असून सीबीआय व इडीचे पथक लंडनला रवाना करण्यात आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
अमेरिकेतील पत्रकार देशद्रोही, त्यामुळेच माध्यमांची विश्वासार्हता खालावली आहे: डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत अमेरिकेतील पत्रकारांवर चांगलच तोंडसुख घेतलं आहे. अमेरिकेतील देशाप्रती होणाऱ्या नकारात्मक पत्रकारितेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चांगलेच संतापल्याचे त्यांच्या ट्विट वरून स्पष्ट जाणवते आहे.
7 वर्षांपूर्वी -
हॅकर'च थेट पंतप्रधानांना आधार चॅलेंज, तुम्ही तुमचा आधार नंबर सार्वजनिक करू शकता?
फ्रेंच हॅकर इलियट अल्डरसन यांने काल भारताच्या आधार कार्ड’च्या सुरक्षेचे अक्षरशः धिंडवडे काढले आणि थेट ट्राय’च्या अध्यक्षांची आधार कार्ड’ला लिंक असणारी सर्व गोपनीय माहिती उघड केली होती आणि एकच खळबळ माजली होती. परंतु हा फ्रेंच हॅकर अल्डरसन इथेच थांबलेला नाही.
7 वर्षांपूर्वी -
‘ट्राय’ अध्यक्षांना ‘नको ती ट्राय’ भोवली, हॅकरने आधार डेटा हॅक करून दाखवला!
ट्राय’चे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी आधार कार्डची माहिती किती सुरक्षित आहे हे देशाला दाखवण्यासाठी थेट आधार क्रमांक हॅक करुन दाखवा असं चॅलेंजच दिलं होतं. त्यासाठी त्यांनी आपला आधार क्रमांक ट्विटरवरुन शेअर केला.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या RCEP करारामुळे २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील? राष्ट्रीय किसान महासंघ
थायलंड येथे २१ जुलै रोजी RCEP अर्थात क्रॉप्रेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट अंतर्गत ट्रेड करारावर भारताकडून स्वाक्षऱ्या करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने पियुष गोयल हे लवकरच थायलंडला रवाना होणार आहेत. परंतु या करारामुळे देशातील २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक के. व्ही. बिजू यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
फ्रान्स फिफा वर्ल्डकप २०१८चा विश्वविजेता
फिफा वर्ल्डकप २०१८ च्या अंतिम सामन्यात पूर्वार्धातच फ्रान्स आणि क्रोएशियाकडून तुंबळ अॅक्शन पाहायला मिळाली. सामान्यांच्या १८व्या मिनिटाला फ्रान्सच्या टीमला मिळालेल्या फ्री-किकचा बचाव करताना क्रोएशियाच्या मॅन्झुकिचने आत्मघातकी ओन गोल केला आणि फ्रान्सला एका गोलाने आघाडी मिळाली.
7 वर्षांपूर्वी -
‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ धोरणामुळे अनेक भारतीयांना अमेरिका सोडावी लागेल?
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणानुसार नव्या प्रस्तावावर विचार सुरू केलेला. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय नोकरदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या धोरणामुळे अनेक भारतीयांवर अमेरिका सोडण्याची वेळ येऊ शकते.
7 वर्षांपूर्वी -
गुजरात निवडणुकीवेळी जपान'चे पंतप्रधान, आता २०१९च लक्ष? डोनाल्ड ट्रम्प यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण
आगामी लोकसभा निवडणुका भाजपसाठी प्रचंड महत्वाच्या आहेत. त्यामुळे हवा निर्मितीसाठी सर्व प्रयत्नं केले जातील अशीच शक्यता आहे. त्याचाच भाग असा की येत की पुढील वर्षी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन भारत सरकारसाठी विशेष करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
इंग्लंडला नमवलं; आता क्रोएशिया जगज्जेतेपदासाठी फ्रान्स'ला टक्कर देणार
फिफा विश्वचषक २०१८ स्पर्धेमध्ये पहिल्या सेमिफायनलमध्ये फ्रान्सने बेल्जिअमवर मात करून अंतिम फेरी गाठली तर दुसरीकडे क्रोएशियाने इंग्लंडला २-१ असं नमवून पहिल्यांदाच थेट विश्वचषकाची फायनल गाठली आहे. आता विश्वचषक विजेतेपदासाठी क्रोएशिया आणि फ्रान्स मध्ये लढत होणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
फिफा फुटबॉल विश्वचषक २०१८, बलाढ्य ब्राझीलचा बेल्जियमकडून पराभव
यंदाचा फुटबॉल विश्वचषक जिंकण्याच ब्राझीलच स्वप्न भंग झाले आहे. काल झालेल्या सामन्यात बलाढ्य ब्राझीलचा बेल्जियमकडून २-१ असा पराभव झाला आहे. त्यामुळे ब्राझील फिफा फुटबॉल विश्वचषक २०१८ स्पर्धेतून बाद झाला असून बेल्जियमने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्विस बँकेतील काळा पैसा बाहेर काढणं दूरच, उलट ५० टक्क्यांनी भारतीयांचा पैसा वाढला
देश विदेशातील काळ्या पैशावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणल्याच्या मोदी सरकारच्या दाव्याला स्विस नॅशनल बॅंकेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालामुळे मोठा धक्का बसला आहे. कारण त्या अहवालानुसार स्विस बॅंकेत असणारे भारतीयांच्या पैशावर ५० टक्क्यांनी वाढ होऊन ही रक्कम जवळपास ७००० हजार कोटीच्या घरात गेली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारताची रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीनावर मात
हॉकी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने सलग दुसरा विजय संपादन केला आहे. पहिल्या सामन्यात कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तानला ४-० अशी मात दिल्यानंतर आता थेट रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीनाला २-१ असा धक्का दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मेक्सिकोत ३५व्या मिनिटाला लाथ पडताच कृत्रिम भूकंप
फिफा विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात मेक्सिकोने डिफेन्डिंग चॅम्पियन जर्मनी विरुद्ध ३५व्या मिनिटाला मेक्सिकोचा स्टार फुटबॉलर हिरविंग लोजानोने जोरदार किक मारत गोल करताच मेक्सिकोत चाहते नाचायला लागले आणि भूकंपमापक यंत्रावर हादरे जाणवले.
7 वर्षांपूर्वी -
फ्रेंच ओपन २०१८: रोमानियाच्या सिमोना हालेपनंच पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद
फ्रेंच ओपन २०१८ च्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या स्लोन स्टिव्हन्सचा ३-६, ६-४, ६-१ असा पराभव करत रोमानियाची सिमोना हालेपनं ठरली यंदाची फ्रेंच ओपन २०१८ ची विजेती. याआधी सिमोना हालेपनं तब्बल तीनवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून सुद्धा तिला वारंवार विजेते पदाने हुलकावणी दिली होती.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान जेव्हा कॉफी सांडलेली लादी स्वत:च स्वच्छ करतात तेव्हा...
संसदेतून बाहेर जात असताना मार्क रूट यांच्या हातातील कॉफीचा कप खाली पडला आणि कॉफी लादीवर सांडली. यावेळी त्यांनी लगेच कॉफीचा कप उचलला आणि स्वत: लादी साफ केली.
7 वर्षांपूर्वी -
'वॉलमार्ट' एक लाख कोटींना ‘फ्लिपकार्ट’ला विकत घेणार?
भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी ‘फ्लिपकार्ट ऑनलाइन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ आपले ७५ टक्के समभाग महाकाय कंपनी ‘वॉलमार्ट’ला विकण्याची शक्यता आहे आणि तशी फ्लिपकार्टने तयारी दर्शविली आहे.
7 वर्षांपूर्वी