महत्वाच्या बातम्या
-
मोदी है तो मुमकिन है? | मोदींच्या नव्या भारतातील लोकांपेक्षा बांगलादेशातील लोकांचं प्रती माणसी उत्पन्न वाढलं
मागील काही काळापासून मोदी है तो मुमकिन है अशी टिमकी मिरवणाऱ्या केंद्र सरकारवर जागतिक स्तरावर नामुष्की ओढवली आहे. गेल्या वर्षी देशाच्या जीडीपी’ने ऐतिहासिक निच्चांक गाठला होता. एकाबाजूला देश कोरोना आपत्तीने कोलमडलेला असताना दुसऱ्या बाजूला बेरोजगारी, महागाई आणि ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्वांचा बळी ठरत आहे तो सामान्य माणूस यात शंका नाही. मागील अनेक वर्षांपासून खंबीर असणारा देश सर्वच बाजूने खचताना दिसतोय.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत जगात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण?, मोदी ९० टक्के मतं मिळवत टॉपवर
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रीपल-टी म्हणजेच टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रेकिंगवर जोर दिला जात आहे. या अंतर्गत बुधवारी विक्रमी 20 लाख 55 हजार 10 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. हे केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगात एका दिवसात केल्या जाणाऱ्या चाचण्यांचा सर्वात मोठा आकडा आहे.
4 वर्षांपूर्वी -
WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे
करोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं वादळ देशावर अजूनही घोंगावत असल्याचं चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत दोन लाख ८१ हजार ३८६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, तीन लाख ७८ हजार ७४१ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ३९० वर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हे वर्ष अधिक जीवघेणं असेल | महामारीच्या या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील - WHO
कोरोना महामारी येऊन एक वर्षा लोटले आहे. या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे, पण यातील अनेकांच्या मृत्यूची सरकारी आकडेवारीत नोंदच झालेली नाही. असे यामुळे, कारण अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीच्या हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इंस्टीट्यूटच्या विश्लेषणात करण्यात आला आहे. यात सांगितल्यानुसार, रशियात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी सरकारी आकडेवारीपेक्षा 5 पट जास्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण
कोरोना महामारी येऊन एक वर्षा लोटले आहे. या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे, पण यातील अनेकांच्या मृत्यूची सरकारी आकडेवारीत नोंदच झालेली नाही. असे यामुळे, कारण अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीच्या हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इंस्टीट्यूटच्या विश्लेषणात करण्यात आला आहे. यात सांगितल्यानुसार, रशियात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची आकडेवारी सरकारी आकडेवारीपेक्षा 5 पट जास्त आहे. तसेच, भारत आणि मेक्सिकोमध्येही सरकारी आकडेवारीपेक्षा 2 पट जास्त मृत्यू झाले आहेत. तर संपूर्ण, जगात सरकारी आकडेवारीपेक्षा 113% जास्त मृत्यू झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भारतातील उत्परिवर्तनाचा जगाला धोका | हा विषाणू १९ देशांत पसरला - WHO
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला असून दोन लाख लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतात पसरणाऱ्या स्ट्रेनला WHO ने नवीन व्हेरिएंट ऑफ कंसर्न घोषित केले | पण लस त्याविरोधात प्रभावी
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
चीन कोरोना व्हायरसवर 2015 पासून करत आहे संशोधन | जैविक शस्त्र म्हणून वापर करायचा होता
कोरोना व्हायरस 2020 मध्ये अचानकपणे आला नसून चीन त्याची 2015 पासून तयारी करत असल्याचा दावा ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अवहालानुसार, चीनी सैन्य 6 वर्षांपूर्वी कोविड-19 व्हायरसला जैविक शस्त्र म्हणून वापरण्याचा कट रचत होता. या अहवालात चीनमधील एका शोधनिबंधाचा आधार घेतला असून त्यामध्ये चीन सार्स व्हायरसच्या मदतीने जैविक शस्त्र बनवत असल्याचे नमूद केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकन संस्थेच्या इशाऱ्यानुसार भारतात ऑगस्टपर्यंत १० लाख मृत्यू झाल्यास त्याला मोदी सरकारचं जबाबदार असेल - द लॅन्सेट संपादकीय
भारतात गर्दीच्या कार्यक्रमांमुळे कोरोनाचा धोका अधिक तीव्र होऊ शकतो, असा इशारा देण्यात आलेला असताना देखील मोदी सरकारने देशातील कोट्यवधी लोकांना आकर्षित करणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना परवानग्या दिल्या. राजकीय प्रचारसभा घेण्यात आल्या, असं म्हणत वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध नियतकालीक असलेल्या द लॅन्सेटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘द लॅन्सेट’ने संपादकीयमधून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे..
4 वर्षांपूर्वी -
कोरोना हवेतून पसरतोय, WHO ची कबुली | व्हायरस एरोसोलच्या माध्यमातून दूरपर्यंत पसरतोय
जगात कोरोना महामारी येऊन जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला गेला आहे. विविध तज्ञ कोरोना महामारी कशी आली याचा अभ्यास करत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस हवेतून पसरु शकत असल्याचा दावा केला आहे. कारण आतापर्यंत यावर वेगवेगळे दावे करण्यात आले असून कोणीही याबाबत ठोस पुरावा दिला नव्हता.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत चीनचा मोठा निर्णय | भारतासहित जगभरात फटका बसणार
देशात सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर 3 हजार 915 रुग्णांना प्राण गमवावे लागले. आधीच्या दिवशी भारतात एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींची ( 3 हजार 980) नोंद झाली होती. आजचा आकडा कमी असला, तरी त्याच्या जवळ जाणारा आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतातील सर्वात शक्तिशाली राजकीय व्यक्तींकडून मला सत्य बोलल्यास शीर कापण्याची धमकी - अदर पुनावाला
भारताची प्रमुख लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता इतर देशांमध्ये लस उत्पादन घेण्याचा विचार करत आहे. लशीच्या पुरवठ्याबाबतच्या वेळेचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यानं ‘सीरम’ हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली आहे. सध्या सीरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेले आहेत. परंतु, ‘द टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पहिली लाट ओसरताच प्रचंड सभा, गर्दीचे सोहळे आणि मंदगतीने होणाऱ्या लसीकरणामुळे परिस्थिती हाताबाहेर - WHO
कालच्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे ३२९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी करोनावर मात केली आहे. मात्र देशात कोरोना वेगाने पसरतोय आणि देशाची चिंता वाढताना दिसतेय.
4 वर्षांपूर्वी -
भारतात कोरोनाची त्सुनामी | देश भयानक वळणावर येताच अखेर अमेरिका भारताच्या मदतीसाठी तयार
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.
4 वर्षांपूर्वी -
भारताची परिस्थिती दयनीय, जगाने मदत केली पाहिजे - ग्रेटा थनबर्ग
गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाख 48 हजार 979 रुग्ण आढळून आले आहे. हा आकडा कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनचा सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, यामध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे सक्रीय रुग्णांसोबत कोरोनापासून मुक्त होणार्यांचे प्रमाणदेखील वाढतच आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतात रोज ५ हजार मृत्यूचा अंदाज | जुलै अखेरपर्यंत ६ लाख ६५ हजार मृत्यू होऊ शकतात - वॉशिंग्टन विद्यापीठ संशोधन
देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
लशीच्या कच्च्या मालावर अमेरिकेकडून निर्यात बंदी | प्रथम अमेरिकेन लोकं | भारताच्या लस मोहिमेची कोंडी
कोरोना साथ सुरू झाल्यापासून विविध देशांना लस निर्यात करणारा भारत आता कोविड १९ प्रतिबंधक लस आयात करणारा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा मोठा देश ठरला आहे. आतापर्यंत या महिन्यात भारताने १.२ दशलक्ष लस मात्रा निर्यात केल्या आहेत. जानेवारी ते मार्च दरम्यान भारताने ६४ दशलक्ष मात्रा परदेशात पाठवल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | दररोजच्या मृतांच्या आकड्यामध्ये भारत पुन्हा एकदा जगात टॉपवर
सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी 2.50 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. खरेतर चांगली गोष्ट म्हणजे रविवारच्या तुलनेत यामध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात 2 लाख 56 हजार 828 लोक संक्रमित झाले आहेत. रविवारी 1.75 लाखपेक्षा जास्त लोक पॉजिटिव्ह आढळले होते. पहिल्यांदाच विक्रमी 1 लाख 54 हजार 234 लोकही बरे झाले. यापूर्वी एका दिवसात सर्वात जास्त 18 एप्रिलला 1.43 लाख लोक रिकव्हर झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल
कोरोच्या दुसऱ्या लाटेतील स्थिती अधिक गंभीर आहे. विशेष म्हणजे ब्राझिलमधील या संसर्गाच्या स्फोटाला रोखण्यात अपयश आलं तर संपूर्ण जगात कोरोना स्फोट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ब्राझिलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत आहे. दिवस-रात्र कबरी खोदण्याचं काम सुरु आहे. जेणेकरुन मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांकडून अधिक संसर्ग न होता त्यांच्यावर लगेचच अंत्यसंस्कार करता येतील. ब्राझिल कोरोना मृत्यूंच्या यादीत सर्वात पुढे आहे. रविवारी ब्राझिलमध्ये 37,017 नवे कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळले.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना जगात दिर्घकाळ राहणार | 78 कोटी लोकांच्या लसीकरणानंतरही वाढता प्रभाव - WHO
कोरोना महामारीचा संसर्ग जगामध्ये झपाट्याने वाढत चाललेला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस ॲडनोम गॅबियिसस यांनी कोरोनाचा संसर्ग जगात दिर्घकाळ टिकून राहण्याचा इशारा दिला आहे. टेड्रोस यांनी जगातील आशिया आणि मध्य पूर्व देशांमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणावर चिंता व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, जगात आजघडीला 78 कोटी लोकांचे लसीकरण झाले असून तरीदेखील कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही आहे.
4 वर्षांपूर्वी