हुवेई कंपनी विरोधात? सायबर हल्ल्याची भीतीने ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत आणीबाणी

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषीत केली आहे. परकीय शत्रूंपासून अमेरिकेच्या कॉम्प्युटर नेटवर्क्सना वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी हे तडकाफडकी पाऊल उचललं आहे. यामुळे अमेरिकेच्या स्थानिक कंपन्यांना राष्ट्रीय सुरक्षेत अडचणी आणणाऱ्या परदेशी टेलिकॉम कंपन्यांची सेवा वापरने शक्य होणार नाही. ट्रम्प यांनी याबद्दलच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याची अधिकृत माहिती व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी दिली.
व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या अधिकृत आदेशात कोणत्याही कंपनीचं नाव नमूद करण्यात आलेलं नाही. परंतु हुवेई कंपनीला लक्ष्य करण्यासाठी ट्रम्प यांनी आणबाणी घोषित करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे. अमेरिकेत आणीबाणी लागू होताच हुवेईनं प्रतिक्रिया दिली. यामुळे केवळ अमेरिकन कंपन्यांचं आणि नागरिकांचं मोठं नुकसान होईल, असं हुवेईनं म्हटलं. हुवेईच्या उत्पादनांचा वापर चीनकडून नजर ठेवण्यासाठी आणि हेरगिरीसाठी केला जात असल्याची चिंता अमेरिकेच्या कंपन्यांनी यापूर्वी अनेकवेळा व्यक्त केली होती.
हुवेईचं अमेरिकेतलं अस्तित्व कमी करण्यासाठी अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयानं आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. वाणिज्य मंत्रालयानं हुवेईचा समावेश ‘एन्टीटी यादी’त केला. यामुळे अमेरिकन कंपन्यांमधलं तंत्रज्ञान ताब्यात घेताना हुवेईला अमेरिकन सरकारची परवानगी घ्यावी लागेल. यामुळे अमेरिका आणि चीनचे संबंध आणखी स्फोटक होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये आधीच व्यापार युद्ध सुरू आहे. त्यात आता यामुळे भर पडणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं