VIDEO: फक्त मोदींना? तसे 'छत्री' सन्मान ७०-८०च्या दशकात सुद्धा भारताच्या पंतप्रधानांना मिळत होते

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीसाठी किरगिझस्तान येथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाटयाला एक सन्मान आला. राजधानी बिश्केक येथे पोहोचल्यानंतर किरगिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष सूरॉनबे जीनबीकोव्ह यांनी समारंभपूर्वक मोदींचे स्वागत केले. त्याचवेळी तिथे पाऊस सुरु झाला. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष सूरॉनबे जीनबीकोव्ह यांनी मोदींच्या डोक्यावर छत्री धरली होती.
मागच्या आठवडयात श्रीलंकेमध्ये सुद्धा हेच दृश्य पाहायला मिळाले. कोलंबोमध्ये श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी समारंभपूर्वक मोदींचे स्वागत केले. त्यानंतर सिरीसेना यांनी मोदींच्या डोक्यावर छत्री धरली होती. दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या या कृती मोदींच्या मनाला स्पर्शून गेल्या असे प्रसार माध्यमांमध्ये मथळे छापले जात आहेत. दरम्यान, एकूणच भारताच्या पंतप्रधानांना असे सन्मान २०१४ नंतरच प्राप्त झाल्यासारखा देखावा अनेक प्रसार माध्यमांकडून चिरंतर सुरु राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वास्तविक भारताच्या पंतप्रधानांना असे मानसन्मान ७०-८०च्या दशकातच मिळत होते आणि तसे सन्मान भारताच्या पंतप्रधानांना थेट अमेरिकेच्या पंतप्रधानांकडून मिळत होते. अगदी तसेच सन्मान जसे मोदींच्या दौऱ्यात घडत आहे. अगदी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना, अमेरिकेतील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी दरम्यान पाऊस आला होता आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिगन्स यांनी स्वतः छत्री हातात धरून राजीव गांधी यांना त्यांच्या वाहनात सन्मानाने बसवलं होतं. असेच सन्मानाचे क्षण भारताच्या अनेक माजी पंतप्रधानांच्या वाट्याला आले होते. मात्र २०१४ नंतर असे क्षण म्हणजे भारताच्या सन्मानापेक्षा ‘राजकीय प्रोपोगेंडा’ अधिक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि भारताच्या वाट्याला जगभरात केवळ मोदींमुळे सन्मान आला अन्यथा तो कधीच भारताच्या नशिबी नव्हता असा अप्रत्यक्ष प्रयत्न २०१४ पासून चिरंतर सुरु आहे.
VIDEO : कसे होते ते नेमके सन्मानाचे किस्से जे अमेरिकेत देखील प्राप्त झाले होते?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं