इथियोपियाच्या पंतप्रधानांना शांततेचा नोबेल जाहीर

स्टॉकहोमः इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना २०१९ च्या शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. शत्रू देश असलेल्या इरिट्रिया यांच्यासोबत शांतता प्रस्तापित केल्याने अबी अहमद यांना शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आल्याची माहिती पारितोषिक निवड समितीने दिली आहे.
२०१९चा शांततेचा नोबेल जाहीर करताना नोबेल समितीने म्हटले की, “शांतता प्रस्थापित केल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी तसेच शेजारील देश इरिट्रियासोबत असलेला सीमावाद सोडवण्यासाठी घेतलेल्या निर्णायक पुढाकारासाठी अबिय यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.”
2019 Peace Laureate Abiy Ahmed Ali is the first Ethiopian to be awarded a #NobelPrize. This year’s prize is also the 100th #NobelPeacePrize. @PMEthiopia#NobelFacts pic.twitter.com/ZmGULRQHUQ
— The Nobel Prize (@NobelPrize) October 11, 2019
“२०१९ चा नोबेल शांती पुरस्कार हा इथियोपियासह पूर्व आणि ईशान्य आफ्रिकी प्रदेशात शांतता आणि सलोखासाठी काम करणार्या सर्व व्यक्तींची ओळख बनला आहे. इरिट्रियाचे राष्ट्राध्यक्ष इसाईअस अफवेरकी यांनी यासाठी दिलेल्या बहुमुल्य सहकार्यामुळे अबिय अहमद यांना कमी वेळेत शांतता करारावर काम करता आले,” असेही नोबेल समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
तो वाद सोडवण्यासाठी अहमद अली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यासाठीच त्यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. इथियोपियाकडून पूर्व आणि उत्तर पूर्व आफ्रिकी क्षेत्रात शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. अहमद अलींनी देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि राजकीय सुधारणा केल्या आहेत. एरिट्रियाचे राष्ट्रपती इसाइआस अफवेरकीबरोबर अहमद अली यांनी शांती करारासाठी वेगानं काम केलं, त्यामुळेच दोन्ही देशांतला हा वाद संपुष्टात आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं