Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
त्यांचे राष्ट्राध्यक्ष सुरक्षा वस्त्र घालून डॉक्टर-रुग्णांच्या भेटीला इस्पितळात; भारतात फेसबुक-ट्विटवर | त्यांचे राष्ट्राध्यक्ष सुरक्षा वस्त्र घालून डॉक्टर-रुग्णांच्या भेटीला इस्पितळात; भारतात फेसबुक-ट्विटवर | महाराष्ट्रनामा – मराठी
2 May 2025 9:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

त्यांचे राष्ट्राध्यक्ष सुरक्षा वस्त्र घालून डॉक्टर-रुग्णांच्या भेटीला इस्पितळात; भारतात फेसबुक-ट्विटवर

Covid19, Corona Crisis

मॉस्को, ६ एप्रिल: सध्या जगभरात करोनामुळे मृत्यूंचे तांडव सुरु आहे. अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटेन आणि फ्रांस सारखे प्रगत देश देखी होरपळून निघाले आहेत. जगातील सर्वोत्तम आरोग्ययंत्रणा असताना देखील हे देश हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेत तर लाखाच्या घरात मृत्यू होण्याचा अंदाज सरकारी पातळीवरच व्यक्त केला आहे.

मात्र या प्रगत देशातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी अगदी राष्ट्राध्यक्षांनी देखील या लढतीत प्रत्यक्ष सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं. प्रशासकीय पातळीवर बाधित नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत की नाही याची देखील काळजी घेताना दिसत आहेत. प्रगत देशात मोठी हानी होताना दिसत असली तरी भारतात त्यातुलनेत कमी हानी असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र त्यामागील कारणं हीच आहेत की भारतातील लोकांना इथल्या जुन्या आणि विद्यमान राजकीय स्थितीने अत्यंत प्रदूषित वातावरण जगण्याची सवय करून ठेवली आहे. जन्माला आल्यापासून शेकडो डोस आणि भेसळयुक्त खाण्यापिण्याने भारतीयांच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती कणखर आहे आणि तीच सध्या त्यांना तारत आहे, पण किती दिवस हा देखील प्रश्न आहे.

त्यातुलनेत शुद्ध वातावरणाची आणि दर्जेदार आयुष्य जगणाऱ्या अमेरिकन आणि युरोपियन देशातील नागरिकांना अचानक कोरोना आपत्तीने घेरल्याने त्यांना जीव वाचवणं कठीण झालं आहे. मात्र यामध्ये त्यांचे राष्ट्रध्यक्ष फेसबुक किंवा ट्विटरवर जनेतला टास्क देऊन वेळ वाया घालवत नाहीत. मी देशाच्या नागरिकांचा प्रतिनिधी म्हणजे मीच पुढे असणं गरजेचं आहे याचं त्यांना भान आहे. जमिनीवर राहून सध्या काय करणं गरजेचं आहे, यामध्ये या देशातील नैतृत्व गुंतलेली दिसतात. इंग्लंड सहित काही देशांच्या प्रमुख नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे आणि यावरून त्यांच्या जमिनीवरील धावपळीचा आणि इतरांशी झालेल्या संपर्काचा अंदाज येतो.

अमेरिकेचा प्रतिस्पर्धी झालेल्या रशियाचे पुतीन तर सुरक्षा वस्त्र परिधान करून थेट इस्पितळांमध्ये रुग्णांची भेट घेऊन वास्तव आणि यंत्रणेची खात्री करताना दिसले. रशियामध्ये मॉस्को लॉकडाउनवर असताना, बुधवारी एका दिवसात रशियाच्या कोरोनाव्हायरसच्या घटनांमध्ये ४४० रुग्णांची वाढ झाली असून ती २,७७७ वर पोचली आहे, ही वाढ पूर्वी ५०१ इतकी होती.

स्वतः राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. मॉस्कोतील रुग्णालयात स्वतः पुतीन यांनी पिवळ्या रंगाचा चमकदार फुल-बॉडी प्रोटेक्टिव सूट आणि श्वसन यंत्र घालून रुग्णांच्या अडचणी समजून घेताना दिसले आणि मी तुमच्यासोबत आहे असा संदेश देशवासियांना दिला. त्यांनी भारतातील सर्वोच्च नेत्यांप्रमाणे जमिनीवरील वास्तवांकडे दुर्लक्ष करत फेसबुक आणि ट्विटरवरून देशाला टास्क देऊन भ्रमित केलं नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष इस्पितळात जाऊन डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवताना दिसले.

दुसरीकडे भारतातील सर्वोच्च नेते समाज माध्यमांवरून एकतेचे धडे देताना दिसत आहेत. जमिनीवर येऊन इस्पितळात डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस यंत्रणांच्या काय अडचणी आहेत ते समजून घेण्यात त्यांना अजिबात रस असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच समाज माध्यमांवर टाळ्या-थाळ्या असे लोकांना टास्क देऊन नकोत राज्य सरकारच्या यंत्रणेचे व्याप वाढतील असे प्रकार सुरु आहेत. देशासोबत म्हणजे नेमकं काय याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्या नेत्यांनी पुतीन यांचा अभ्यास करायला हवा, अन्यथा एक क्षण असा येईल कि लोकांचा संताप देखील रस्त्यावर पाहायला मिळेल.

 

News English Summary: Russian President Putin himself said the situation was in control. At the hospital in Moscow, Putin wore a bright yellow full-body protective suit and a respiratory device to understand patients’ problems and conveyed the message that I am with you. He, like the top leaders of India, did not mislead the country by tossing the country through Facebook and Twitter, ignoring the ground realities. The President of Russia went to the hospital to see the doctors and medical staff increased confidence.

 

News English Title: Story Corona crisis in Russia President Vladimir Putin donned a full body hazmat suit and respirator Covid19 News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

x