व्यापारी संबंधांच्या विषयात भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिली नाही: डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन डीसी: डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची मुदत या वर्षाअखेर संपुष्टात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी हा करार होऊ शकणार नाही, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशंसा केली आहे. ते माझे आवडते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत दौऱ्याबद्दल आपण खूप उत्सुक आहोत, असेही त्यांनी सांगितले.
मात्र व्यापारी संबंधांच्या विषयात भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिलेली नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारताकडून आम्हाला चांगली वागणूक मिळालेले नाही’ असे ट्रम्प अँड्रूयूज येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ट्रम्प यांनी भारतावर टीका केली असली तरी, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. भारत दौऱ्यावर जाण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘मला पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर आवडतात’ असे ट्रम्प म्हणाले.
तसेच परदेश दौऱ्यादरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी फिरण्यासाठी दी बिस्ट ही अभेद्य लिमोझिन वापरली जाते. त्यांना अन्य कोणत्याही कारचा वापर करण्याची परवानगी नाही. यामुळे सीआयए अन्य कोणत्याही वाहनातून ट्रम्प यांना ताज महाल पाहण्यासाठी नेणार नाही. तर सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार इंधनावर चालणारी कोणतीही कार किंवा वाहन ताज महालच्या 500 मीटरच्या परिसरात नेण्यास बंदी आहे.
Web Title: Story US Business is not treated well by India says US President Donald Trump.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं