Patron Exim IPO | सुवर्ण संधी! नवीन IPO लाँच होतोय, सबक्राइब करण्यापूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या

Patron Exim IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आली आहे. आज 21 फेब्रुवारी 2023 पासून पॅट्रॉम् एक्झिम कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पॅट्रॉम् एक्झिम कंपनीचा IPO 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत खुला राहील. कंपनीने आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर 27 रुपये किंमत निश्चित केली आली आहे. या कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी BSE SME निर्देशांकावर होणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Patron Exim Share Price | Patron Exim Stock Price | Patron Exim IPO)
Patrom Exim IPO तपशील :
‘पॅट्रॉम् एक्झिम’ कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 16.69 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. कंपनीने आपल्या IPO साठी किंमत बँड 27 रुपये निश्चित केली आहे. कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअर आहे. ही कंपनी आपल्या IPO मधून उभारलेली रक्कम खेळते भांडवल, सामान्य उद्दिष्टे आणि दैनंदिन खर्चासाठी खर्च करणार आहे. एसएमई प्लॅटफॉर्मवर लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्या सूचीबद्ध होतात. IPO शेअर्सचे वाटप 1 मार्च 2023 रोजी होणार केले जातील. आणि कंपनीने ‘BigShare Services Private Limited’ या फर्मला रजिस्ट्रार म्हणून नियुक्त केले आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘पॅट्रॉम् एक्झिम’ ही अहमदाबाद स्थित कंपनी एक्झिम व्यवसायात गुंतलेल्या मोठ्या उद्योग समूहाचा एक भाग आहे. या समूहातील गसेडॅक मेडिकॉर्प इव्होक रेमेडीज, इअरम फार्मास्युटिकल्स, ऑक्सिलिया फार्मास्युटिकल्स, मॅड्रिड डायमंड्स, अटलांटिस एक्झिम एनजी ओव्हरसीज यांचा समावेश होतो. हा सर्व कंपन्यांचा समूह मुख्यत्वे फार्मास्युटिकल, रासायनिक उद्योग, आणि संबंधित क्षेत्रात व्यापार करतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Patrom Exim IPO stock market live on 21 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं