युवासेनेकडून डोंबिवलीत केवळ १ रुपयात १ लीटर पेट्रोल | 'या' निमित्ताने केंद्रालाही चपराक

डोंबिवली, १३ जून | देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी तर डिझेलचा दर हा 23 पैशांनी वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 102.30 रुपये असून डिझेलची किंमत ही 94.39 रुपये इतकी आहे. देशातील एकूण सहा राज्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीपार झाले असून डिझेलचा प्रवासही शंभरीकडे सुरु आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून माफक दरात पेट्रोल वाटप केले जात आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांची चांगलीच चांदी झाली आहे. डोंबिवलीच्या उस्मा पेट्रोल पंपावर अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. सध्या मुंबईसह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा प्रतिलीटर दर 100 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्या आहेत.
पेट्रोल दरवाढीसाठी केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे. शिवसेनेकडून हा मुद्दा वारंवार मांडण्यात आला आहे. आज आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन शिवसेनेच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे केंद्र सरकारला चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम युवा सेनेचे पदाधिकारी योगेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे शहर प्रमुख राजेश मोरे राजेश कदम उपस्थित होते.
News Title: One liter petrol in one rupees in Dombivli on occasion of birthday on environment minister Aaditya Thackeray news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं