मनसेचा एकमेव आमदार गळाला लावण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर? | भाजपाची योजना काय? काय म्हणतात तज्ज्ञ?

मुंबई, ०९ जुलै | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सध्या अनेक दिग्गज नेत्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर भाजपाकडून पाटील यांना गळाला लावण्याच्या हालचाली सुरू झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपामध्ये घेण्यासाठी टाकलेला दबाव:
केंद्रात २०१४पासून भाजपाची सत्ता आल्यानंतर ईडी, सीबीआय आणि एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणा जनमानसात नावारुपाला आल्या. अगदी ठरवून या संस्थांचा वापर केला जातो आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. हवे तेव्हा आणि हवे त्याच्याविरोधात ईडीचा फास आवळायचा असे एकूण चित्र सध्या तरी राज्यात दिसत आहे. राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आघाडी सरकारच्या अनेक मातबर नेत्यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी झाली होती. नुकतेच भाजपा सोडून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांची नऊ तास चौकशी चालली.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी करण्यात आली. नुकतेच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना ईडीने चौकशी बोलावले होते. तपास यंत्रणांचा हा चौकशीचा भाग असला, तरी पाटील यांना भाजपाच्या गोटात सामील करून घेण्यासाठी टाकलेला दबाव आहे, असे भाकीत राजकीय विश्लेषक अजय वैद्य वर्तवतात.
ईडीच्या चौकशीमागे भाजपाचे षडयंत्र:
मंत्रिपदी केंद्रात वर्णी लागलेले नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, कालपरवा दाखल झालेले कृपाशंकर सिंह यांच्यासह अनेक मातब्बर नेते चौकशीच्या भीतीने भाजपामध्ये सामील झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले खडसे यांना दोन दिवसापूर्वी ईडीची नोटीस देण्यात आली. त्या पाठोपाठ मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही अशाच प्रकारची नोटीस आली असून त्यांनाही चौकशीसाठी बोलावले. सरकारला खरेच भ्रष्टाचार काढायचा असेल तर पक्षभेद न ठेवता सर्वांवरच कारवाई व्हायला हवी. परंतु पश्चिम बंगालच्या निवडणुका असो किंवा आताच्या स्थितीतील घडामोडी पहिल्या असता, विशेष करून विरोधी पक्षातील नेत्यांना नोटिसा देऊन केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणायचा आणि त्यांना भाजपामध्ये प्रवेश घेण्यास भाग पाडायचे असे चित्र या चौकशी मागे दिसते, असा आरोप भारतीय जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी केला. तसेच केवळ आकसापोटी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई केली जाते. मात्र भाजपाच्या गोटात सामील झाल्यानंतर चौकशी थांबते. हा दबावतंत्रांचा भाग असून तो निषेधार्ह आहे, असे नारकर म्हणाले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका:
कल्याण डोंबिवली महानगपालिका निवडणुका तोंडावर आल्या असून भाजपाला येथे मोठी अपेक्षा आहे. परंतु शिवसेनेला येथे शह देण्यासाठी या पट्यातील आगरी-कोळी समाजाची मतं अत्यंत महत्वाची आहेत. भिवंडीचे कपिल पाटील यांना मंत्रिपद देण्यामागे ठाणे पट्ट्यात तेच गणित मांडण्यात आलं आहे. मात्र कल्याण-डोंबिवली पट्ट्यात त्याचा उपयोग होणार नाही याची भाजपाला कल्पना आहे. विशेष म्हणजे याच भागात आगरी-कोळी समाजात राजू पाटील यांची प्रतिमा उत्तम असल्याने त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ वर्तवित आहेत. भाजपने अर्थसंपन्न आणि जनाधार असलेल्या नेत्यांची यादीच बनवल्याचे वृत्त असून अशा नेत्यांचे ‘वीकपॉइंट’ शोधले जातं आहेत. त्यासाठी वर्षानु वर्षे चर्चेत देखील नसलेले मुद्दे समोर आणून एक दबाव निर्माण केला जातं आहे.
आमदार राजू पाटील यांचे बंधू देखील यापूर्वी भाजपमध्ये गेले होते. त्यात याच भागात आरएसएस समर्थक मतदारांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असल्याने हा ट्रॅप लावण्यात आल्याचं म्हटलं जातंय. प्रथम दर्शनी शुल्लक वाटणाऱ्या विषयांना भाजप केव्हा भस्मासुराचं रूप देईल याची खात्री देता येणार नाही. त्यामुळे सध्या आ. राजू पाटील यांना देखील हा किरकोळ मुद्दा वाटू शकतो, पण यापूर्वी अनेक नेत्यांसंदर्भात असेच मुद्दे समोर आले आणि नंतर त्यांना आयत्यावेळी उचल घेतल्याचा इतिहास आहे. भाजप कोणाचाच नसून त्यांना २०२४ मधील ध्येयाने पछाडले आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंशी मैत्री असूनही त्यांना सोडलं नाही तर आ. राजू पाटील यांच्याबाबतीत कशी खात्री द्यावी असा प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहेत.
आगरी, कोळी, भंडारी समाजाचे चेहरे मोठे करून शिवसेनेला संपवण्याचा घाट:
मुंबईपासून कोकण, ठाणे ते पालघर पट्ट्यात आगरी, कोळी, भंडारी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार राहिला आहे. याच मतदारांवर डोळा ठेवून भाजपाने मोठी योजना आखल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कपिल पाटील, राजू पाटील आणि असे संबंधित समाजाचे नेते भाजपला हवे आहेत. त्यावर स्वतः फडणवीसांनी केंद्रातील टीमला सांगितलं असून त्याची पूर्ण जवाबदारी भाजपने फडणवीसांनाच दिली आहे. मराठा समाजाचे चेहरे स्वतःकडे ठेवून इतर समाजाच्या चेहऱ्यांवर देखील कृती सुरु झाली आहे. त्यामुळे भविष्यत अनेकांना अशा नोटीस जाऊ शकतात ज्याची त्या नेत्यांना सुद्धा कल्पना नसावी.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Politics behind ED notice to MNS MLA Raju Patil news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं