Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल

Credit Card Alert | बहुतांश व्यक्तींना क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय लागली आहे. आज-काल बरेच ट्रांजेक्शन क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केले जातात. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड वापरणे देखील अत्यंत सोपं आहे. तुम्ही कधीही आणि कुठेही क्रेडिट कार्डचा वापर करू शकता.
क्रेडिट कार्ड वापरल्याने युजरला त्याचे रिवॉर्ड पॉईंट अनुभवायला मिळतात. या कारणामुळे अनेकांना क्रेडिट कार्ड वापरण्यास आवडते. परंतु तुम्हाला ही गोष्ट देखील लक्षात ठेवावी लागेल की, क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्ज आहे. तुम्ही क्रेडिट कार्ड घेता म्हणजेच एक प्रकारचे कर्ज घेता. तुम्हाला हे कर्ज दिलेल्या वेळेत फेडावे लागते.
क्रेडिट कार्ड वापरण्याचे भरपूर फायदे आहेत परंतु, केवळ फायदेच नाही तर क्रेडिट कार्ड वापरण्याचे तोटे देखील आहेत जे बऱ्याच व्यक्तींना ठाऊक नाहीत. काही अशा व्यक्ती आहेत ज्यांनी क्रेडिट कार्डचा वापर करणे बंद केले पाहिजे. जर या लोकांनी क्रेडिट कार्ड वापरलं तर, त्यांचा नक्कीच तोटा होऊ शकतो. आज आम्ही सांगणार आहोत की कोणत्या व्यक्तीने क्रेडिट कार्ड वापरू नये.
खर्चावर नियंत्रण नसलेल्या व्यक्ती :
बहुतांच्या व्यक्तींना पैशांची उधळपट्टी करायला आवडते. समोरची वस्तू दिसेल ती घेत सुटायची ही सवय अत्यंत वाईट आहे. ज्या व्यक्तींचा खर्चावर अजिबात नियंत्रण नाही त्यांनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये. कारण की क्रेडिट कार्डला एक लिमिट दिली असते त्या लिमिट पर्यंतच तुम्हाला क्रेडिट कार्डचा वापर करावा लागतो. परंतु तुमच्या या घाणेरड्या सवयीमुळे तुम्ही स्वतःचे आणखीन नुकसान करू शकता.
लोन फेडणाऱ्या व्यक्ती :
ज्या व्यक्तींच्या डोक्यावर आधीपासूनच एखादं कर्ज आहे त्यांनी क्रेडिट कार्ड घेण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये. नाहीतर आधीचे कर्ज त्यानंतर क्रेडिट कार्डचे कर्ज घेऊन वेळेवर न भरल्या गेल्यामुळे तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा.
वेळेवर बिले पेमेंट न भरणारे व्यक्ती :
बऱ्याच व्यक्ती क्रेडिट कार्डची बिले किंवा इतरही काही पेमेंट वेळेवर भरत नाहीत. वेळेवर बिले आणि पेमेंट भरले नाही की व्यक्तीचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब होतो. खराब सिबिल स्कोरमुळे तुम्हाला भविष्यात लोन घेता येणार नाही. त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.
कमीत कमी पगार घेणारे व्यक्ती :
प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सारखी नसते. काहीजणांचा पगार अतिशय कमी असतो. कमी पगार असलेल्या व्यक्तींनी चुकून सुद्धा क्रेडिट कार्डचा वापर करू नये. समजा तुम्ही तुमच्या कमी पगारातच क्रेडिट कार्ड घेतलं तर, तुम्ही आणखीन आर्थिक संकटात पडू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Credit Card Alert Sunday 12 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं