Gratuity on Salary | 5 वर्षापेक्षा कमी नोकरी करणाऱ्यांना सुद्धा मिळणार ग्रॅच्युईटीचे 20 लाख रुपये, फायद्याची अपडेट जाणून घ्या

Gratuity on Salary | खाजगी संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी ग्रॅच्युईटी संबंधित गोष्टींना घेऊन कायमच विचारात पडलेले असतात. बऱ्याच जणांना ग्रॅच्युईटी संबंधितच्या गोष्टी माहीतच नसतात. आपल्याला ग्रॅच्युएटीसी मिळणारी एकूण रक्कम किती असेल, त्याचबरोबर किती वर्षानंतर आपल्याला ग्रॅच्युईटी मिळेल यांसारखे बरेच प्रश्न डोक्यामध्ये असतात. आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं अचूकपणे देणार आहोत.
5 वर्षापेक्षा कमी काम केलं असेल तरीसुद्धा मिळेल ग्रॅच्युईटी :
तुम्ही आत्तापर्यंत हे बरेचदा ऐकलं किंवा अनुभवलं असेल की, कोणत्याही ठिकाणी एकूण 5 वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला ग्रॅच्युईटीची रक्कम मिळते. परंतु, तुमच्यापैकी फार कमी व्यक्तींना माहीत असेल की, खाजगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5 वर्षांपेक्षा कमी कालावधी झाली असेल तरीसुद्धा ते कर्मचारी ग्रॅच्युईटीसाठी पात्र असतात. यासाठी काही खात नियमांची तरतूद केली गेली आहे.
ग्रॅच्युईटी म्हणजे काय :
कर्मचाऱ्याने कंपनीला बरेच दिवस कामाचे योगदान दिले त्यामुळे त्या कर्मचाऱ्याचे आभार व्यक्त करण्यासाठी कंपनीकडून खास ग्रॅच्युईटी स्वरूपात रक्कम दिली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी असते. जीचा जास्त प्रमाणात फायदा कर्मचाऱ्याला होतो.
ग्रॅच्युईटी मिळवण्यासाठी किती वर्ष काम करावे लागते :
तसं पाहायला गेलं तर सर्वच संस्थांमध्ये त्याचबरोबर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामाचे एकूण 5 योगदान दिल्यानंतरच त्यांना ग्रॅच्युएटी रक्कम प्राप्त होते. परंतु काही संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचे सातत्य पाहून त्याला 5 वर्ष पूर्ण होण्याआधीच ग्रॅच्युइटी रक्कम देण्यात येते. ही रक्कम ग्रॅच्युएटी ॲक्ट 2A नुसार मिळते.
केव्हा मिळते ग्रॅच्युईटीची रक्कम :
ग्रॅच्युईटी ॲक्टनुसार भूमिगत खदानांमध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांना एम्प्लॉयरबरोबर एकूण चार वर्ष 190 दिवस पूर्ण झाल्यानंतर ग्रॅच्युइटी रक्कम मिळते. तसेच, इतर संघटनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चार वर्ष 240 दिवसांमध्ये काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी रक्कम प्राप्त होते. त्याचबरोबर बऱ्याच व्यक्तींना आणखीन एक प्रश्न पडलेला असतो. तो म्हणजे ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेशनसाठी नोटीस पिरियड मोजला जातो की नाही. तर, याचे उत्तर होय आहे. ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेट करताना तुमचा नोटीस पिरेड देखील मोजला जातो.
अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते ग्रॅच्युईटी :
ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेशन चा फॉर्मुला – (एकूण ग्रॅच्युएटी रक्कम = शेवटची सॅलरी × 15/26 × कंपनीत काम केल्याचे एकूण वर्ष).
उदा.: समजा तुमची शेवटची सॅलरी 35 हजार रुपये आहे आणि तुम्ही कंपनीमध्ये एकूण 7 वर्ष काम केले आहे. तर, बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेशन पाहून घेऊ.
35,000 × 15/26 × 7 = 1,41,346 रुपये. म्हणजेच कर्मचाऱ्याला 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युईटी रक्कम मिळू शकते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Gratuity on Salary 03 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं