Gratuity On Salary | 25000 रुपये बेसिक पगार असणाऱ्यांना सुद्धा ग्रॅच्युएटीची मोठी रक्कम मिळणार, रक्कम लक्षात ठेवा - Marathi News

Gratuity On Salary | ग्रॅच्युईटीबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. ग्रॅच्युईटी ही एक प्रकारची रक्कम असते. जी कर्मचाऱ्याला कंपनीकडून एका गिफ्टप्रमाणे मिळते. याला आपण कंपनीकडून मिळणारे रिवॉर्ड देखील म्हणू शकतो.
एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत सातत्याने कामाचे 5 किंवा 10 वर्ष योगदान दिले तर, त्याला ग्रॅच्युइटी रक्कम प्राप्त होते. ज्यावेळी कर्मचारी कंपनी सोडून निघून जातो तेव्हा त्यालाही ग्रॅच्युइटी रक्कम देण्यात येते. भारतामध्ये तरी 5 वर्षांची सीमा देण्यात आली आहे. दरम्यान एखादा कर्मचारी कोणत्यातरी कंपनीत आपल्या कामाचे 5 वर्ष योगदान देत असेल तर त्याला कंपनी सोडल्यानंतर किती रिवॉर्ड मिळतील. म्हणजेच एकूण किती ग्रॅच्युइटी रक्कम मिळेल जाणून घेऊया.
कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम द्यावी लागते
1. समजा एखाद्या साध्यातल्या साध्या कंपनीमध्ये देखील 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील तर, त्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम द्यायला हवी. यामध्ये सरकारी त्याचबरोबर प्रायव्हेट कंपन्यांचा समावेश असतो. एवढंच नाही तर किराणा स्टोअर किंवा इतरही दुकानं यामध्ये शामील आहेत. ग्रॅच्युइटीच्या स्थितीमध्ये कंपनी रजिस्टर नसेल तर, कंपनीत स्वखुशीने कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी रक्कम प्रदान करते परंतु ही रक्कम रजिस्टर कंपन्यांच्या तुलनेत फार कमी असते.
2. समजा एखाद्या व्यक्तीने कंपनीमध्ये 4 वर्ष आणि पुढच्या वर्षातील 8 महिने काम केलं असेल तर, संपूर्ण पाच वर्षांचं कॅल्क्युलेशन पकडलं जातं आणि त्यानुसार कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी रक्कम दिली जाते.
3. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाला तर, त्याच्या ग्रॅच्युईटीची संपूर्ण रक्कम त्याने केलेल्या नॉमिनीला मिळते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये काम करत असाल तर, सर्वातआधी ग्रॅच्युईटीला नॉमिनी करून घ्या.
पगारदारांना किती ग्रॅच्युईटी रक्कम मिळेल
1. ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेट करण्यासाठी एक साधा सोपा नियम तयार केला आहे. हा नियम असा आहे ( शेवटची सॅलरी × कंपनीमधील कामाचे वर्ष × 15/26 ).
2. यामध्ये एका महिन्यात एकूण चार वेळा रविवार येतो. त्यामुळे ते चार दिवस ग्राह्य धरले जात नाहीत आणि म्हणूनच एका महिन्यातील 26 दिवसांची गणना केली जाते. त्याचबरोबर एकूण पंधरा दिवसांच्या आधारावर ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेट होते.
3. समजा एखाद्या व्यक्तीने एकाच कंपनी सलग 20 वर्ष काम केलं आणि त्याची शेवटची सॅलरी 25000 रुपये आहे. तर, ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेशन करण्यासाठी नियमाचा वापर करावा. दिल्या गेलेल्या नियमानुसार 20×25000×15/26 = 2,88,461,1.54 रुपये असतील. म्हणजेच तुमची ग्रॅच्युएटीची रक्कम लाखोंच्या घरात असेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Gratuity on Salary 10 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं