Gratuity on Salary | नोकरीची 12 वर्ष पूर्ण आणि पगार दरमहा 35,000 तर, तुम्हाला ग्रॅच्युईटीची किती रक्कम मिळेल, पहा कॅल्क्युलेशन

Gratuity on Salary | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कंपनी ग्रॅच्युइटी रक्कम देते. बऱ्याच व्यक्तींना ग्रॅच्युइटी रक्कम कशी मोजायची याबाबत फारशी माहिती नसते. समजा तुम्ही एखाद्या कंपनीत एकूण 12 वर्ष नोकरी केली आहे आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला 35000 पगार आहे तर, 12 वर्षांमध्ये तुमची किती ग्रॅच्युइटी रक्कम जमा झाली असेल. कॅल्क्युलेशन आज आपण पाहणार आहोत.
तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना हे ठाऊक असेल की, कोणत्याही नोकरदाराला कंपनीमध्ये 5 वर्षे कामाची पूर्ण झाल्यानंतर तो नोकरदार ग्रॅच्युईटीसाठी हक्कदार बनतो. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटपर्यंत ग्रॅच्युइटी रक्कम जमा होत राहते आणि इतर फंडांसोबतच ग्रॅच्युईटी रक्कम देखील दिली जाते. कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या ग्रॅज्युविटी रक्कमेमधील काही प्रमाणात भाग कर्मचाऱ्याच्या पगारातून कापला जातो आणि मोठा भाग कंपनी कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करत असते.
कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते ग्रॅच्युएटी अमाउंट :
ग्रॅच्युईटीचे कॅल्क्युलेशन कधीही तुमचा शेवटचा बेसिक पगार आणि कंपनीमध्ये तुम्ही दिलेल्या योगदानाचे वर्ष मोजून कॅल्कुलेट केली जाते. समजा एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीमध्ये कामाचे 12 वर्ष योगदान दिले आहे आणि बेसिक पगार त्याचबरोबर महागाई भत्ता मिळून त्याला 35,000 पगार आहे तर, त्याला ग्रॅच्युईटीचे 2,42,308 रुपये मिळतील.
एकूण ग्रॅच्युइटी रक्कम = (35,000) x (12/26) x (12) = 2,42,308. या फॉर्म्युलानुसार हे कॅल्क्युलेशन केले गेले आहे.
पेमेंट ग्रॅच्युईटी ॲक्ट 1972 :
पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी ॲक्ट 1972 नुसार केवळ तेच कर्मचारी ग्रॅच्युइटीचा फायदा घेऊ शकतात ज्यांच्या कंपनीमध्ये एकूण 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. तुमचा एखादा कर्मचारी नोकरी सोडत असेल किंवा रिटायर होत असेल परंतु त्याने ग्रॅच्युईटीच्या सर्व नियमांचे पालन केले असेल तर, त्याला शंभर टक्के ग्रज्युएटी देण्यात येते.
ग्रॅच्युईटीच्या नियमाप्रमाणे तुम्हाला तुमची कंपनी ग्रॅच्यूईटी कायद्याअंतर्गत येत आहे की नाही हे देखील तपासावे लागेल. ज्या कंपन्या ग्रॅच्युईटी कायद्याअंतर्गत येतात त्याच कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर ग्रॅच्युईटी रक्कम मिळते. परंतु काही कंपन्या अशा देखील आहेत ज्या ग्रॅच्युईटी कायद्याअंतर्गत येत नाहीत. अशा कंपन्या स्वतःहूनच कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी रक्कम ठरवतात. परंतु ही रक्कम इतर कंपन्यांपेक्षा थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असू शकते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Gratuity on Salary Tuesday 10 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं