Loan EMI Alert | पगारदारांनो, कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना या गोष्टींचे पालन करणे गरजेचे, अन्यथा पश्चातापाची वेळ येईल

Loan EMI Alert | प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये कर्ज घेण्याची वेळ येते. जो व्यक्ती नवीनच कर्ज घेत असेल त्याला कर्जाची, कर्ज परतफेडची, व्याजदराची पुरेशी माहिती नसते. माहिती नसल्याकारणाने त्याच्या हातून काही चुका देखील घडतात ज्याचा परिणाम त्याला भविष्यात भोगाव लागतो. तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. ज्याच्या माध्यमातून लोन संबंधित तुम्हाला अडचणी निर्माण होणार नाहीत.
कर्ज घेण्याची आवश्यकता आहे का :
तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, सर्वप्रथम तुम्हाला खरंच कर्ज घेण्याची आवश्यकता आहे का जर असेल तर कितीपर्यंत कर्ज घ्यावे लागेल आणि कोणत्या कारणासाठी कर्ज घ्यावे लागेल या सर्व गोष्टींची पडताळणी करा. आजारपण, शिक्षण किंवा लग्न खर्चासाठी तुम्ही कर्ज काढण्याचा विचार केला असेल तर काहीही हरकत नाही. परंतु विनाकारण खर्च करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, अजिबात कर्ज घेऊ नका.
व्याजदराची तुलना करणे गरजेचे :
लोन घेण्यापूर्वी तुम्हाला वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन तेथील व्याजदरे तपासावी लागतील. दरम्यान तुम्ही छोटे व्याजदर घेतले तर, तुम्हाला ते फेडण्यासाठी देखील सोयीचे जाईल. त्याचबरोबर यामधून तुमचे जास्त पैसे जाणार नाहीत आणि तुमची बचत होईल.
कर्जाची रक्कम आणि कालावधी निश्चित करून घ्या :
तुमच्या कर्जाची रक्कम जेवढ्या प्रमाणात कमी असेल तेवढेच ईएमआयचे हफ्ते भरण्याची रक्कम देखील कमीच असेल. त्याचबरोबर तुमच्या कर्ज भरण्याचा कालावधी जितका जास्त असेल तर, व्याज जास्तीचे द्यावे लागेल. यामध्ये EMI जरी कमी असले तरीही व्याज जास्त द्यावे लागू शकते. त्यामुळे कर्ज घेतानाच रक्कम आणि कालावधी निश्चित करून घ्या.
क्रेडिट स्कोर तपासा :
तुम्ही ज्यावेळी कर्ज घेता त्यावेळी बँका तुमचा सिबिल स्कोर तपासते. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर कधीही ढासाळणार नाही या गोष्टीकडे लक्ष द्या. नाहीतर तुम्हाला कधीच चांगल्या व्याजदराचे कर्ज उपलब्ध होणार नाही. सिबिल स्कोर चांगला असेल तर, कमीत कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध होईल.
EMI ची फेडण्याची रक्कम :
कर्ज घेतल्यानंतर ते फेडताना EMI च्या रक्कमेची देखील खास काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या पगाराचे आणि आर्थिक खर्चाचे नियोजन करून EMI चे हप्ते भरले पाहिजे. समजा तुम्ही जास्तीचे कर्ज घेतले तर, अधिक EMI भरावा लागेल त्याचा परिणाम तुम्हाला भविष्यात नकारात्मक होऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Loan EMI Alert Friday 31 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं