My EPF Money | पगारदारांनो! आता नोकरी बदलताच ऑटोमॅटिकली EPF बॅलेन्स फंड ट्रान्सफर करता येणार - Marathi News

My EPF Money | EPFO च्या माध्यमातून पगारदारांना वेगवेगळ्या स्कीमचा लाभ घेता येतो. पूर्वी व्यक्तीने नोकरी बदलली की, त्याचं पीएफ अकाउंट बॅलेन्स ट्रान्सफर करण्यासाठी व्यत्यय येत होते. परंतु आता ‘कर्मचारी भविष्य निधी संघठन’ ईपीएफओने ऑटोमॅटिक फंड ट्रान्सफर करता येणारी सुविधा अमलात आणली आहे.
ईपीएफ अकाउंट असणाऱ्या नोकरदारांना नोकरी बदलल्यानंतर मॅन्युअल पद्धतीने अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी काही नियम पाळावे लागायचे. परंतु चालू वर्ष 2024-25 मध्ये पीएफ अकाउंट असलेल्या व्यक्तींना ऑटोमॅटिक फंड ट्रान्सफर करता येणार आहे.
बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी (युएएन) नंबर आहे महत्त्वाचा
युनिव्हर्सल अकाउंट नंबर अकाउंट बॅलन्स ट्रान्सफर करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत गरजेचा आहे. हा नंबर एका व्यक्तीला अनेक ईपीएफ खाते एकत्र जोडण्यासाठी सुविधा देण्याचे काम करतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या नियुक्तांमार्फत एकाच व्यक्तीला दिल्या गेलेल्या अनेक मेंबर आयडीसाठी सेंट्रलाइज प्लॅटफॉर्मप्रमाणे कार्य करतो.
पगारातून 12% योगदान:
ईपीएफओमध्ये कर्मचाऱ्यांना 12% अमाऊंट ठेवावी लागते. सोबतच कंपनी देखील कर्मचाऱ्याकडून ईपीएफ खात्यामध्ये पैसे जमा करतो.
या सुविधा देखील मिळतात:
युनिव्हर्सल अकाउंट नंबर तुम्हाला आणखीन सुविधा प्रदान करतात. त्यामध्ये सर्व ट्रान्सफर इन-डिटेल, युएएन कार्ड, एक अपडेटेड पासबुक या सर्व सुविधा तुम्हाला मिळतात.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर ठेवली जाते नजर:
ईपीएफओमार्फत नियम न पाळणाऱ्या कंपन्या आणि संस्थांवर कडक नजर ठेवली जात आहे. अशा कंपन्यांना लगेचच नोटीस पाठवली जाते. एवढंच नाही तर, येणाऱ्या काही दिवसांमध्ये अशा कंपन्यांविरुद्ध एक अभियान देखील सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती माध्यमांकडून समजतेय.
Latest Marathi News | My EPF Money 10 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं