Pension Money | नोकरदारांसाठी खुशखबर! 7 रुपयांची बचत करून महिना रु.5000 पेन्शन मिळेल; अधिक जाणून घ्या - Marathi News

Pension Money | नोकरदारांसाठी सरकारने आतापर्यंत अनेक योजना राबविल्या आहेत. केंद्र सरकारने नुकतीच कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेचं नाव युनिफाईड पेन्शन स्कीम असं असून कर्मचाऱ्यांना आता दोन ऑप्शन मिळाले आहेत. ज्यामध्ये नॅशनल पेन्शन स्कीमचा देखील समावेश आहे.
परंतु नोकरी व्यवसायानंतर रोजगार म्हणून असंघठीत क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना आहेत? या कर्मचाऱ्यांसाठी एमपीएस आणि अटल पेन्शन योजना फायद्याची ठरू शकते. या योजना EPS-95 च्या अंतर्गत सुरू असतात. दरम्यान आज आपण या लेखातून अटल पेन्शन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.
ही योजना कोणासाठी?
जे व्यक्ती असंघठीत किंवा प्रायव्हेट क्षेत्रांमध्ये काम करतात त्यांना नोकरीनंतर किंवा वयाच्या साठीनंतर कसलाच आधार उरत नाही. अशा प्रायव्हेट क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान ही योजना 2015 सालापासून केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर ही पेन्शन योजना (PFRDA) म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी चालवते.
18 वर्षापासूनच करा गुंतवणूक :
या योजनेतून तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन हवी असेल तर, अठरा वर्षापासूनच तुम्हाला पैशांची गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला 1000 की, पाच हजार रुपये पेन्शन मिळणार? ही गोष्ट तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर डिपेंड आहे. उदाहरणार्थ तुम्हाला 1000 रुपये दरमहा पेन्शन हवी असेल तर अठरा वर्षापासूनच फक्त 42 रुपये महिन्याला गुंतवणूक करावी लागेल.
APY योजनेसाठी गुंतवणूकदाराची वयोमर्यादा :
18 ते 40 या वयोगटातील आणि असंघठीत क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे. यामध्ये 60 वर्षानंतर गुंतवणूकदाराला त्याने केलेल्या गुंतवणुकीच्या हिशोबाने दरमहा एक ते पाच हजार रुपये पेन्शन देण्यात येते. दरम्यान या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती मृत्युमुखी पडला की, पेन्शन त्याच्या पत्नीला मिळू लागते.
या योजनेची सुरुवात तुम्ही फक्त ₹7 वाचून करू शकता. तुम्ही दिवसाला सात रुपये वाचवले तर महिन्यालाही अमाऊंट 210 रुपये एवढी होते. योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 210 रुपयांची गुंतवणूक कराल तर रिटायरमेंट म्हणजेच 60 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये टेन्शन मिळेल. म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला 210 रुपये इन्व्हेस्ट करून वर्षाची 60000 रुपये एवढी रक्कम जमा करता येईल.
Latest Marathi News | Pension Money 09 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं