Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News

Property Buying | सर्वसामान्य असो किंवा श्रीमंत व्यक्ती असो. प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात एकदा तरी मालमत्तेची खरेदी करतोच. मग त्यात फ्लॅट खरेदी करणे असो किंवा व्यवसायासाठी एखादी जागा खरेदी करणे असो. प्रॉपर्टी विषयीची संपूर्ण माहिती खरेदी करणाऱ्या व्यक्तीला माहीत असणे गरजेचे.
तसं पाहायला गेलं तर, मार्केटमध्ये दोन प्रकारच्या प्रॉपर्टी उपलब्ध असतात. एक म्हणजे रेडी टू मूव्ह आणि दुसरी म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन. रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी खरेदी करण्याचे तुम्हाला विविध फायदे अनुभवता येऊ शकतात. कारण की यामध्ये तुम्हाला घराचं पेमेंट केल्यानंतर कुटुंबीयांबरोबर थेट सामानाची शिफ्टिंग करायची असते आणि हक्काच्या घरी राहायचं असतं. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या प्रॉपर्टीमध्ये राहण्याचा विचार करत असाल किंवा थेट प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर, काही गोष्टींची खास काळजी घ्या.
1. मालकी हक्क :
जर तुम्ही रेडी टू मूवी म्हणजेच आधीपासून तयार असलेली मालमत्ता खरेदी करत असाल तर, त्या मालकीविषयी संपूर्ण माहिती जमा करा. तुम्ही खरेदी करण्याआधी ती मालवत्ता खरंच मालकी हक्काची मालमत्ता आहे की नाही हे तपासा. तपासणी करण्यासाठी तुम्हाला सर्व कागदपत्रांसह महसूल कार्यालयात जावं लागेल.
2. सुविधा :
तुम्ही जी मालमत्ता खरेदी केली आहे तिथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि सुविधेनुसार गोष्टी शोधा. म्हणजे तुमच्या प्लॉटजवळ किंवा एखाद्या दुकानाजवळ किराणा, भाजीपाला, प्लंबर, स्वीट फूड, स्ट्रीट फूड, डी मार्ट, महत्वाचे ऑफिस, बँका या सर्व गोष्टी हाकेच्या अंतरावर आहेत का नाही ते चेक करा. नाहीतर शुल्लक गोष्टींसाठी तुम्हाला गाडी खर्च करावा लागू शकतो. एकदा मालमत्ता खरेदी केल्यानंतर तुमच्याकडे त्या घरामध्ये राहण्याऐवजी कोणताही पर्याय नसेल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.
3. आरडब्ल्यूए :
काही रियल इस्टेट तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे आजच्या लोकॅलिटीमध्ये रेसिडेन्शियल सोसायटी हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. त्यामुळे एखाद्या शहरात स्थलांतरित होण्यास नवीन व्यक्तींसाठी ही एक महत्त्वाची आणि मोठी गोष्ट बनली आहे. अशावेळी आरडब्ल्यूए सोसायटीची संपूर्ण जबाबदारी घेतात. ज्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा अनुभवता येते.
4. मालमत्तेचा कालावधी :
कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना तुम्ही त्या मालमत्तेचे वय जाणून घेणे गरजेचे आहे. कारण की मालमत्ता जेवढी जुनी असते तेवढीच चालू मालमत्तेच्या तुलनेत कमी पैशांची असते. म्हणजेच जुनी मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पैसे लागू शकतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Property Buying 14 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं