Property Knowledge | अनेकांना माहित नाही, प्रॉपर्टी मिळूनही आई-वडिलांची जवाबदारी घेतली नाही तर प्रॉपर्टीही हातची जाणार

Property Knowledge | बरेच वृद्ध आई-वडील आपल्या मुला मुलींच्या नावे स्वतःची संपत्ती करतात. किंवा वाढदिवसानिमित्त एखादी भेटवस्तू म्हणून आपल्या घराचा वारसदार मुलीला किंवा मुलाला करण्यासाठी त्यांना मालमत्ता स्वरूपी भेटवस्तू देतात. तुम्ही बऱ्याचदा प्रॉपर्टी संबंधीत वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये वाद होताना पाहिले असेल. आत्ताची स्ट्रेट अँड फॉरवर्ड मुलं आपल्या वृद्ध आई-वडिलांना मालमत्ता ताब्यात झाल्यानंतर हाकलून देतात.
अशावेळी वृद्ध आई-वडील निराधार होतात. त्यांच्याजवळ रस्त्यावर राहण्याची वेळ येते. वृद्ध आई-वडिलांना अशा पद्धतीने त्रास देणाऱ्या मुलांना सर्वोच्च न्यायालयाने भला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आई-वडिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश :
1. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये राहत असाल. किंवा आई-वडिलांनी त्यांची प्रॉपर्टी भेटवस्तू म्हणून तुमच्या नावे केली असेल तर, तुम्हाला आई-वडिलांना मरेपर्यंत सांभाळणे गरजेचे आहे. ते तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही जर असं केलं नाही म्हणजेच तुम्ही तुमच्या आई-वडिलांना त्रास दिला तर, भेटलेली संपूर्ण मालमत्ता रीतसर आई-वडिलांना परत द्यावी लागेल.
2. तुम्ही सुद्धा वृद्धा आई-वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये राहत असाल आणि प्रॉपर्टी बळकावून आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून देणार असाल तर, आत्ताच सावध व्हा. कारण की सर्वोच्च न्यायालयाने बजावलेला हा निर्णय ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तुमच्या आई-वडिलांचे घर तुमच्या चुकीमुळे गमवावे लागेल.
सर्वोच्च न्यायालयाने काय काय सांगितले :
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे मुलं मुली आपल्या आई-वडिलांची व्यवस्थित पद्धतीने देखभाल करू शकले नाही तर त्यांना त्यांची मालमत्ता परत करावी लागू शकते. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्याप्रमाणे संबंधित मालमत्ता वृद्ध नागरिकांचं पालन पोषण त्याचबरोबर कल्याण कायद्याअंतर्गत रद्द देखील करता येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे ज्येष्ठवर्ग सुखावला आहे. त्यांना एक सुरक्षित भावना मिळाली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Property Knowledge Monday 06 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं