Rent Agreement | भाडेकरूची चूक आणि घर मालकाला पश्चाताप; वेळीच सावध व्हा, नाहीतर मोठे नुकसान होईल

Rent Agreement | तुम्ही आतापर्यंत बऱ्याच भाडेकरूंना तुमच्या हक्काची खोली भाड्याने राहण्यासाठी दिली असेल. यामध्ये तुम्ही भाडेकरार देखील केला असेल. परंतु असं कधी झालं आहे का की, भाडेकरूच्या काही गोष्टींमुळे चक्क घर मालकाला आर्थिक नुकसान त्याचबरोबर मानहानी आणि पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली आहे. आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत ज्यामधून तुम्ही घर भाड्याने देताना आवर्जून ती गोष्ट करायला.
भाड्याने घर देताना घर मालकात आणि भाडेकरूमध्ये कायदेशीररित्या करार झालाच पाहिजे. अधिकृतपणे सर्व गोष्टी केल्यानंतर भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. तुम्ही सुद्धा भाड्याने घर देण्याचा विचार करत असाल तर ही गोष्ट आवर्जून करा.
घर भाड्याने देण्याआधी पोलीस पडताळणी नक्की करा :
तुम्ही घर मालक असाल आणि भाड्याने एखाद्या व्यक्तीला रूम देत असाल तर, त्या भाडेकरूची पोलीस पडताळणी नक्की करून घ्या. समजा भाडेकरूवर कोणतेतरी गुन्हे दाखल असतील तर, ही गोष्ट तुमच्या अंगाशी येऊ शकते. समजा भाडेकरूने तुमच्या घरामध्ये काही अनधिकृत गोष्टी केल्या तर, भाडेकरू नाही तर घरमालकावरच कायदेशीररित्या कारवाई केली जाईल.
भाड्याने घर देताना बऱ्याच व्यक्ती भाडेकरार आवर्जून करतात परंतु, पोलीस पडताळणी करण्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. हाच दुर्लक्षपणा त्यांना भविष्यात चांगलाच भोवतो. त्यामुळे घर, जमीन किंवा एखादी प्रॉपर्टी भाड्याने देण्याआधी त्या व्यक्तीची पोलीस पडताळणी नक्कीच करून घ्या.
भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलिसांना द्या :
देशभरातील बऱ्याच प्रमुख जिल्ह्यांमध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी भाडेकरू व्यक्तींची पोलीस पडताळणी करणे ऐच्छिक नाही तर अनिवार्य केले आहे. त्यामुळे भाडेकरूची पोलीस पडताळणी करताना हय गय करू नका. सध्या बहुतांश घरमालक आपल्या भाडेकरूची पोलीस पडताळणी आवर्जून करतात. तुम्ही सुद्धा तुमच्या भाडेकरू बद्दलची संपूर्ण माहिती त्याच्या व्यवसायाची माहिती, नोकरीची माहिती, त्याचा स्वभाव, त्याचा पगार त्याचबरोबर भाडेकर संबंधित संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनमध्ये द्या. जेणेकरून तुम्हाला भविष्यात होणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
भाडेकरूची चूक घरमालकाला पश्चाताप :
समजा तुमचा भाडेकरू कोणत्याही प्रकारचा गुन्हा करून बसला असेल तर, घरमालकाकडून रीतसर दंड वसूलण्यात येतो. त्याचबरोबर घडलेल्या गुन्ह्याप्रमाणे घरमालकावर योग्य ती कारवाई देखील केली जाते. यामध्ये घरमालकाकडून 2000 रुपयांचा दंड देखील वसुलला जाऊ शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Rent Agreement Thursday 19 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं