Rental Agreement | जागो घरमालक जागो, तुमची एका चुकीने भाडेकरू बनेल मालक, रेंटल प्रॉपर्टीविषयी ही गोष्ट लक्षात ठेवा

Rental Agreement | जमीन, घरे, मोठमोठे बंगले, दुकान त्या सर्व स्थावर मालमत्ता असतात. ज्या कोणीही चोरण्याचा प्रयत्न करू शकत नाही. परंतु तुम्ही या जागा भाड्याने वापरण्यासाठी दिल्या तर, मात्र तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो.
तुमच्या स्थावर मालमत्तेवर कोणी दुसऱ्या व्यक्तीने कायमचा जम बसवला किंवा तुमची मालमत्तेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुमची दमछाट होऊ शकते. बऱ्याच व्यक्तींना भाडेकरारच्या या गोष्टी ठाऊक नाहीयेत परंतु जनजागृतीमुळे आजचा नागरिक पूर्णपणे साक्षरतेनेच वागतो. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल तर लगेचच माहिती जाणून घ्या. नाहीतर तुमच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ येईल.
प्रतिकूल ताबा कायदा :
‘प्रतिकूल ताबा कायदा’ हा एक प्रकारचा न्यायालयीन कायदा आहे. समजा तुमच्या मालमत्तेवर भाडेकरू तब्बल 12 वर्षांपासून स्वतःचा हक्क सांगत असेल तर, न्यायालय त्याची बाजू घेण्यास सक्षम राहते. त्यामुळे घरमालकांनो तुम्हाला सावध राहून घर भाड्याने देण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल.
प्रतिकूल मालमत्ता ताबा म्हणजे काय जाणून घ्या :
प्रतिकूल मालमत्ता ताबा यामध्ये जो व्यक्ती 12 वर्षांपासून एकाच मालमत्तेवर स्थिर झाला असेल तो अगदी भाडेकरू जरी असला तरीही 12 वर्षानंतर तो घरमालकाच्या घरावर स्वतःचा हक्क बजाऊ शकतो. एवढंच नाही तर प्रतिकूल ताब्याअंतर्गत तो दुसऱ्याच्या मालमत्तेला स्वतःची मालमत्ता बनवून इतर व्यक्तीला विकू देखील शकतो.
आतापर्यंत घरमालकांच्या छोट्याशा चुकीमुळे किंवा निष्काळशीपणामुळे हातातून घर, जमिनी आणि भाड्याने दिलेली दुकाने बळकवल्याच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर वायरल झाल्या आहेत आणि अशी प्रकरणे देखील झाली आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, प्रतिकूल ताबा कायदा केवळ वैयक्तिक मालमत्तेलाच लागू होतो. सरकारी मालमत्तेशी या कायद्याचा काहीही संबंध नाही.
मालमत्ता भाड्याने देत असाल तर, ही चूक टाळा :
1. या फसवा फसवीच्या युगात प्रत्येक घरमालकाने त्याची जमीन, घर किंवा एखादं दुकान भाड्याने देण्याआधी रितसर भाडेकरार करून घ्यावा.
2. भाडेकरारत 11 महिन्यांचे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट त्याच्यानंतर 11 महिने पूर्ण झाल्यानंतर रिन्यू करण्याची खात्री देखील करून घ्या. तुमचा हाच पुरावा तुम्ही तुमची मालमत्ता भाड्याने दिली आहे हे वेळोवेळी दर्शवेल.
3. त्याचबरोबर भाडेकरारात घरासंबंधी इतरही माहिती नमूद करा आणि ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ती म्हणजे भाडेकरार केव्हाही 11 महिन्यांचाच केला जातो. त्यामुळे रिन्यू करायला विसरू नका. जेणेकरून बारा महिन्यानंतर किंवा वर्षानुवर्षांचा रेकॉर्ड तुम्ही तुमची मालमत्ता भाड्याने दिली आहे हे दर्शवत राहील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Rental Agreement Friday 03 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं