Rental Home | ऑनलाइन भाड्याने घर शोधत असाल तर चुका टाळा, अन्यथा खिशाला लागेल कात्री - Marathi News
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- Rental Home – Rental Agreement
- कमी भाडं आणि चांगली जागा – WellHealthOrganic Home Remedies Tag
- अशा पद्धतीने होते फसवणूक – HDFC Home Loan

Rental Home | आजच्या घडीला शहरांमध्ये नोकरी, रोजगार मिळवण्यासाठी अनेक लोक येत असतात. सोबतच गावी राहणारे व्यक्ती देखील उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरांकडे धाव घेताना दिसतात. शंभरांपैकी 90% लोकं भाड्याने राहण्याचा पर्याय निवडतात. सध्याच्या काळात घर आणि नोकरी सांभाळून राहण्यासाठी आणि कमी भाडं असणारी जागा शोधणे अत्यंत अवघड बनून बसले आहेत.
कमी भाडं आणि चांगली जागा
त्याचबरोबर अनेक व्यक्ती कमी भाडं आणि चांगली जागा असलेल्या घरांकडे पटकन आकर्षित होतात. याप्रकरणी ब्रोकर्स मंडळींनी शहरांमध्ये धूमशा घातलेला आहे. घर खरेदी किंवा विक्री करायचं असेल तर, ब्रोकर्सची मदत घ्यावी लागते. परंतु ब्रोकर समोरच्या व्यक्तीकडून जास्त पैसे देखील उकळतो. सर्वसामान्य व्यक्तींना ब्रोकर्सची मदत घेणे अजिबात परवडत नाही. यासाठी ते ऑनलाइन पद्धतीने भाड्याचं घर घेण्याचा विचार करतात.
या दरम्यानच्या अनेक ऑनलाईन वेबसाईटवर घराबाबत तपासणी करतात. परंतु या सगळ्यांमध्ये स्वतःच्या खिशाला कात्री लागत आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ऑनलाइन फेक ॲपमुळे फक्त भाडेकरूच नाही तर घर मालकही या फ्रॉडमध्ये बळी पडत आहेत.
अशा पद्धतीने होते फसवणूक
सध्या ऑनलाईन भाड्याने घर घेण्याचे आणि शोधण्याचे प्रमाण वाढले आहे. यादरम्यान अनेक भाडेकरू ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भाड्याने राहण्यासाठी चांगली जागा शोधण्याचा प्रयत्न करतात. सोबतच घर मालकही ऑनलाइन पद्धतीने घराची चांगली जाहिरात करून टाकतात. काही प्रमाणात हे बरोबर जरी असलं तरी, अनेकजण लोकांना फसवण्यासाठी देखील चांगली मसालेदार जाहिरात करून बकरा शोधण्याचा प्रयत्न करतात. ज्यामध्ये तुम्ही अडकून स्वतःचे नुकसान करून घेता.
काही बनावट जाहिराती तुम्हाला खऱ्या वाटून तुम्ही त्या वाटेला जाता आणि पूर्णपणे फसता. यामध्ये घरमालक तुमच्याकडून फक्त एका फोन कॉल वरूनच तुमची सगळी इन्फॉर्मेशन मागून घेतात. आधार कार्ड, बँक डिटेल्स ही माहिती समोरच्या व्यक्तीला दिल्यामुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. परंतु या गोष्टी करून तुम्ही स्वतःची फसवणूक होण्यापासून वाचू शकता.
1) अनोळखी वेबसाईटवर जाऊ नका :
कोणत्याही वेबसाईटवर भेट देण्याआधी ती वेबसाईट खरी आहे की नाही याची पडताळणी करा. नाहीतर स्वतःची संपूर्ण माहिती देऊन तुम्ही स्वतःचा फार मोठा नुकसान करून बसाल.
2) खोट्या जाहिरातींपासून दूर राहा :
समोरचा व्यक्ती तुम्हाला खोट्या आणि बनावट जाहिराती खऱ्या असल्याच्या भासवून विळख्यात ओढू शकतात. बनावट जाहिरातींपासून लांब राहून प्रत्यक्षपणे सर्व पडताळणी केल्याशिवाय कुठलाच पैशांचा व्यवहार करू नका.
3) ॲडव्हान्स पेमेंट करू नका :
प्रॉपर्टीला भेट दिल्याशिवाय कुठलाही अडवांस पेमेंट करू नका. कारण की फसवणूक न करणारे घरमालक आणि एजंट प्रॉपर्टी दाखव कोणताही अडवांस घेत नाहीत.
4) भाडेकरूच्या पेमेंट पद्धतीवर लक्ष द्या :
काही वेळा भाडेकरू देखील फसवे असू शकतात. पेमेंट देण्यासाठी त्यांनी दिलेल्या कोणताही लिंकवर क्लिक करू नका. त्याचबरोबर भाडं घेण्यासाठी घरमालकांनी बँक ट्रान्सफरसारख्या सुरक्षित पद्धतीनेचा वापर केला पाहिजे.
5) पिन नंबर किंवा ओटीपी शेअर करू नका :
कायदेशीर घरभाड्याच्या व्यवहारांना तुमची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाठवण्याची काहीही गरज नसते. त्यामुळे कोणी तुमच्याकडे एखादा ओटीपी किंवा पिन नंबर मागत असेल तर इथे पाणी मुरतंय असं समजा.
6) शिफ्टिंगसाठी घाई करायला सांगत असतील तर सावध रहा :
भाडेकडून किंवा घरमालक प्रॉपर्टी पाहण्याआधीच शिफ्ट होण्यास सांगत असतील तर त्या व्यक्तीशी कायमचा संपर्क तोडून टाका. कारण की ही गोष्ट तपासणी टाळण्यासाठी देखील केली जाऊ शकते.
Latest Marathi News | Rented Home Alert 14 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं