Salary Account Facility | खूप कमी पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात 'या' जबरदस्त मोफत सुविधा, लक्षात ठेवा

Salary Account Facility | नोकरीपेशा असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे कंपनीकडून उघडण्यात येणारे सॅलरी अकाउंट असतेच. सॅलरी अकाउंट हे एक प्रकारचे सेविंग अकाउंटच असते. परंतु यामध्ये तुम्हाला खऱ्याखुऱ्या सेविंग अकाउंटपेक्षा जास्त सुविधांचा लाभ घेता येतो.
या सॅलरी अकाउंटमध्ये तुम्हाला सामान्य सेविंग अकाउंटप्रमाणे चेकबुक, नेटबँकिंगची सुविधा, क्रेडिट कार्ड, एटीएम यासारख्या सुविधा मिळतात. तरीसुद्धा हे अकाउंट सेविंग अकाउंटपेक्षा पूर्णतः वेगळं आहे. जे फायदे तुम्हाला सॅलरी अकाउंट देते ते सेविंग अकाउंट देत नाही. आणखीन सविस्तर माहिती जाणून घेऊया.
झिरो बॅलन्सची भन्नाट सुविधा :
तुम्हाला सर्वात पहिली मिळणारी सुविधा म्हणजे झिरो बॅलन्स सुविधा. सॅलरी अकाउंटमध्ये 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ किंवा 3 महिन्यांपर्यंत 0 पैसे म्हणजेच झिरो बॅलन्स असेल तरीसुद्धा बँकेकडून कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाहीत. परंतु सेविंग अकाउंटमध्ये तुमच्याकडून लगेचच पेनल्टी चार्जेस घेतले जातात.
फ्री एटीएम ट्रांजेक्शन :
बऱ्याच बँका सॅलरी अकाउंटवर फ्री एटीएम ट्रांजेक्शनची सुविधा प्रदान करतात. यामध्ये एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आईसीआईसीआय बँक यासारख्या बऱ्याच बँका शामील आहेत. म्हणजेच तुम्ही महिन्यातून किती वेळा बँड ट्रांजेक्शन केले आहे याच्या गडबडीत तुम्ही फसणार नाही. त्याचबरोबर वार्षिक आधारावर एटीएमचे कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुमच्याकडून घेण्यात येणार नाही.
लोन मिळण्यास सोपे :
सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला कार लोन, पर्सनल लोन किंवा इतर कोणत्याही प्रकारचे लोन घेण्यास कोणतीही अडचण येत नाही. कारण की सॅलरी अकाउंटमध्ये बँकेला पूर्णपणे तुमची खात्री असते. त्यामुळे बँक कोणत्याही प्रकारचा संकोच न करता तुम्हाला लोन देऊन टाकते.
वेल्थ सॅलरी अकाउंट :
समजा तुमच्याकडे भरपूर सारे पैसे आहेत आणि हे पैसे अकाउंटमध्ये मॅनेज करायला ताळमेळ बसत नाहीये तर, तुम्ही अशावेळी वेल्थ सॅलरी अकाउंट देखील ओपन करू शकता. या पद्धतीने बँकेकडून तुम्हाला डेडिकेटेड वेल्थ मॅनेजर देखील देण्यात येते. निवडून दिलेला मॅनेजर तुमच्या बँकेशी निगडित असलेल्या सर्व गोष्टींकडे लक्ष देतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Salary Account Facility 12 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं