Salary Calculator | बचतीचा महामंत्र, 1 लाख पगार असून सुद्धा बचत होत नाही; मग पगार हातात आल्याबरोबर ही एक गोष्ट करा

Salary Calculator | बहुतांश व्यक्तींना वारे माप पैसा खर्च करायला फार आवडते. पगारात हातात आल्याबरोबर कुठे संपतो याची खबर देखील त्यांना लागत नाही. जवळ पैसे आले की, बचत करण्याआधी खर्च होऊन जातात. परंतु ही सवय अत्यंत वाईट आहे. या सवयीमुळे तुम्ही आयुष्यात कधीही बचत करू शकणार नाही. तुम्हाला तुमची सवय बदलावीच लागेल.
बचतीची सवय अंगी लावून तुम्ही भविष्यासाठी त्याचबरोबर तुमच्या कुटुंबासाठी जमापुंजी साठवून ठेवू शकता. यासाठी तुम्ही पगार मिळताच सर्वप्रथम बचतीचा मार्ग शोधून काढला पाहिजे आणि त्यानुसार महिन्याचा बजेटही ठरवला पाहिजे. तुमच्या योग्य नियोजनामुळे तुम्ही लवकरच श्रीमंतीच्या मार्गावर वाटचाल कराल.
पगार हातात येताच करा हे एक काम :
बहुतांश व्यक्तींचा पगार महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तर, काहींचा शेवटच्या आठवड्यामध्ये होत असतो. तुम्ही पगार आल्याबरोबर घर खर्च, सिलेंडर, लाईट बिल, मुलांच्या शाळेची फी, घर भाडे या सर्व गोष्टी करण्याआधी पगारामधील 20% रक्कम बाजूला काढून ठेवा.
तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या पगारामधील 20% रक्कम बाजूला काढून ठेवली तर, फार कमी वेळात तुमच्याजवळ लाखो किंवा करोडो रुपये जमा होतील. कारण की, घराचा संपूर्ण खर्च उचलल्यानंतर बचत करण्यासाठी तुमच्याकडे फुटी कवडी सुद्धा शिल्लक राहत नाही. तुम्ही कुटुंबप्रमुख असाल तर, बचतीचे गांभीर्य तुम्हाला समजलेच पाहिजे.
इथे करा गुंतवणूक :
अनेकांना प्रश्न पडला असेल की, गुंतवणूक नेमके कुठे करायची. तर, तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्युच्युअल फंड किंवा पोस्टाच्या आणि शेअर मार्केटशी निगडित असलेल्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता. कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवण्याआधी तुम्ही सर्वप्रथम गुंतवणुकीचे सर्व नियम आणि अटींची माहिती करून घ्या.
त्याचबरोबर व्याजदरांविषयी देखील माहिती काढा. सर्वाधिक व्याजदर असलेल्या ठिकाणीच गुंतवणूक करून नफा कमवा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Salary Calculator 28 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं