महत्वाच्या बातम्या
-
अंबाबाई देवी आणि श्री हनुमान आशीर्वाद महाविकास आघाडीच्या उमेदवाराला | भाजपच्या धार्मिक प्रचाराला कोल्हापुरात धक्का
कोल्हापूर उत्तरेच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपच्या उमेदवाराला निकालामध्ये धोबीपछाड दिल्याचं आकडेवारीतून सिद्ध झालं आहे. भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा महाविकास आघाडीने दणदणीत पराभव घडवून आणताना भाजपच्या धार्मिक प्रचाराला मोठा धक्का दिला आहे. इथल्या मतदाराने मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या उमेदवारावरील विश्वास मतपेटीतून व्यक्त केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Central Team in Kolhapur | मोदी सरकारचं केंद्रीय पथक पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी २ महिन्यांनी प्रकटले
कोल्हापूर आणि सांगली मधील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकारी कोल्हापूर (Central Team in Kolhapur) जिल्ह्यामध्ये आज दाखल झाले आहे. पन्हाळगड, नरसोबावाडी आणि शिरोळ या भागामध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान झाले होते. या भागाची पाहणी करण्यासाठी हे अधिकारी कोल्हापूरमध्ये येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी ऑफिसमधून मिळाली होती.
4 वर्षांपूर्वी -
ऑर्डर निघाल्यावर कंपनीला १ पैसा अदा केलेला नाही | मग १५०० कोटी घोटाळ्याचा जावईशोध कुठून? - मुश्रीफ
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज कोहापूरला जात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर तिसरा मोठा आरोप केलाय. मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने तब्बल १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. सोमय्या यांच्या या आरोपानंतर आता हसन मुश्रीफांनीही पत्रकार परिषद घेत सोमय्यांना जोरदार (Minister Hasan Mushrif reply to Kirit Somaiya) प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर आरोप पर्यटन दौरा | भेटीतील मूळ काम सोडून मीडियाला बाईट देण्यावर सोमय्यांचा अधिक भर?
मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारवर सातत्याने टीका आणि गैरव्यवहाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर आरोप पर्यटन दौरा | कोणीही रोखत नसताना सोमैयांच्या 'मला रोखून दाखवा, मला रोखून दाखवा चिथावण्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत. त्यापूर्वी त्यांना मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरुनच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच मी नोटीस दिली की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंना एकप्रकारे चॅलेंज केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोमय्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुबंई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा - राजू शेट्टी
नुकताच किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते आणि ईडी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर अनिल परब यांनादेखील ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात सोमय्या यांनी ट्वीट देखील केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून ते म्हणतात की, “किरीट सोमय्या यांच्या मध्ये जर हिंमत असेल तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचारही त्यांनी बाहेर काढावा” असे त्यांनी आव्हान दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कार्यकर्त्यांनी शांत राहावं | सोमय्यांनीही संयमाने दौरा करावा, चुकीचं वक्तव्य करु नये - हसन मुश्रीफ
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जाणार असताना त्यांना पोलिसांकडून अडणवण्यात आलं होतं. त्यावरुन भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याची घोषणा केली आहे. मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर असतील. त्यावेळी सोमय्या यांनी कोल्हापूरला येऊ द्या. त्यांची कुठल्याही प्रकारे अडवणूक करु नका, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
विनाकारण मुश्रीफ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडू | आम्ही मुश्रीफ यांच्या पाठीशी - मंत्री सतेज पाटील
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपाचे नेते किरीट सोमैया यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी किरीट सोमैयांना इशारा दिला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खुलासा दिल्यानंतर सोमैयांनी कोल्हापुरात येण्याची गरज काय? विनाकारण मुश्रीफ यांना टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं सांगत ‘मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील होती’, असा गौप्यस्फोट मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.
4 वर्षांपूर्वी -
किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध | कोल्हापुरात नो एन्ट्री | घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. तर दुसरीकडे सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नोटिशीनंतर माझ्या दौऱ्यामध्ये ठाकरे सरकारकडून खोडा घातला जातोय, असा आरोप खुद्द सोमय्या यांनी केला आहे. मला गणेश विसर्जनासाठी जाऊ दिले जात नाहीये. माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवण्यात आले आहेत, असं सोमय्या यांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
एखाद्याविरुद्ध तक्रार करायची, मग तिथे जाऊन पर्यटन आणि प्रसिद्धी मिळवायची ही सोमैयांची सवयच आहे - हसन मुश्रीफ
सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. माझी तब्येत उत्तम आहे व काळजीचे काहीही कारण नाही, असे स्पष्टीकरण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ यांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी एक पत्रक काढून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी थंडी वाजून ताप आला होता. बैठक सुरू असताना ताप वाढतच असल्याचे माझ्या निदर्शनास आल्यामुळे मी तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालो.
4 वर्षांपूर्वी -
हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळा प्रकरण | चंद्रकांत पाटलांविरोधात लाचलुचपत विभागाकडे FIR दाखल करणार - हसन मुश्रीफ
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या या आरोपांवर पलटवार केला आहे. सोमय्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केल्याचा दावा करतानाच रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.
4 वर्षांपूर्वी -
सोमय्यांना काही माहिती नसावी | चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगेंच्या सांगण्यावर केलं असेल - हसन मुश्रीफ
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करणं सुरूच ठेवलं आहे. यापूर्वी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ती कागदपत्र IOC वेबसाईटवर उपलब्ध | सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार - हसन मुश्रीफ
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करणं सुरूच ठेवलं आहे. यापूर्वी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर आंबेओहोळ प्रकल्प | चंद्रकांत पाटलांना लाज वाटली पाहिजे | हसन मुश्रीफ यांची टीका
आंबेओहोळ प्रकल्पाचे काम गेली दहा वर्ष रखडले होते. मी मंत्री असताना हा प्रकल्प मंजूर केला. मात्र, आज याचे कोणीतरी श्रेय घेत असल्याचे मी पाहिले. जे श्रेय घेत आहेत, तेच लोक घळ भरणीच्या वेळी न्यायालयात गेले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
ED, CBI मार्फत दिलेला त्रास भाजपला भोगावा लागेल | मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
राज्यातील अनेक नेत्यांना ईडी आणि सीबीआय मागे लावून भारतीय जनता पार्टीने उद्योग सुरू केला. तुरुंगवासाच्या भीतीने अनेक जण भारतीय जनता पार्टीत गेले. परंतु, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे त्याला अपवाद ठरले. आरोप करणाऱ्यांनी यातून धडा घेतला पाहिजे. मात्र, भारतीय जनता पार्टीने दिलेला त्रास हा भाजपाला सहन करावा लागेल, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. न्यायालयाने छगन भुजबळ यांना क्लीनचिट दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया कोल्हापुरात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या मुसक्या आवळा | स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना पत्र
दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील तांबवे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकिरण माने यांना त्यांच्या घरी जात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह साथीदारांनी मारहाण व शिविगाळ केली. यामुळे स्वाभिमानी आणि खोत यांच्यात वाद उफाळला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल | मुख्यमंत्र्यांकडून राजू शेट्टींना बैठकीचे निमंत्रण
राजू शेट्टींच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजू शेट्टी यांना उद्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. राजू शेट्टी नृसिं यांना नृसिंहवाडीत प्रांताधिकाऱ्यांनी प्रस्तावाचं पत्र दिले आहे. दरम्यान, या वारंवार येणाऱ्या पुरावर कायमस्वरुपी उपाययोजना करने गरजेची असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम घेतला होता, तेव्हा पवारांबद्दल कळलं नाही का? - हसन मुश्रीफ
राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद वाढला, असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्याचा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला आहे. शरद पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम घेतला होता. तेव्हा तुम्हाला पवारांबद्दल कळलं नाही का?, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट | नावांसहित 'त्या' भाजप नेत्यांची पोलखोल
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यानी विधानपरिषदेच्या बारा सदस्यांच्या नियुक्त्या भाजप नेत्यांनी जाणिवपूर्वक रखडविण्याचा कट केल्याचा गौप्यस्फोट नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना केला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
4 वर्षांपूर्वी