ते थांबले आणि आमचं सर्व ऐकून घेतलं | मुख्यमंत्री आमच्या मागण्या पूर्ण करतील, कोल्हापुरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया

कोल्हापूर, ३० जुलै | पावसाचा जोर ओसरला असलातरी अधून मधून येणाऱ्या जोरदार सरीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढच होत चालली आहे.सर्वच धरणातून कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे नद्या अजूनही इशारा पातळीवरुनच वाहत असल्याने महापुर ओसरण्यास वेळ लागत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीवर २४ तासात अवघ्या दीड फुटाची घट झाली आहे. वारणा, दूधगंगा, चिकोत्रा धरणातून गुरुवारी विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच कोल्हापूरला जाणार होते. परंतु, हवामान विभागाने कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला.
मुख्यमंत्री पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावाची पाहणी केली. नृसिंहवाडी हे गाव आठवडाभरापासून पाण्यात आहे. पाऊस बंद झाला असला तरी पाणीपातळी अवघी दोन टक्के कमी झाली आहे. गावातील सर्व लोकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. मात्र जनावरांचा चारा, लाईट पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाणी काही प्रमाणात ओसरलं असलं तरी कमरेएव्हढ्या पाण्यातून लोक घरापर्यंत पोहोचत आहेत.
यावेळी अनेक नागरिकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे वंशज आहेत, ढाण्या वाघ आहे तो महाराष्ट्राचा. आम्ही आवाज दिल्यावर ते थांबले, त्यांनी आमचं ऐकून घेतलं. मुख्यमंत्री आमच्या मागण्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे, असं इथल्या नागरिकाने सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करुन योग्य मदत द्यावी, जाहीर केलेली तुटपुंजी दहा हजारांची मदत ही स्वच्छता आणि जेवणखाण्याला पुरेल ही मदत वाढवावी अशी मागणी पूरग्रस्तांनी केली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Chief Minister Uddhav Thackeray visited to Kolhapur flood affected area news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं