महत्वाच्या बातम्या
-
एकत्र लढूनही तुमच्या ९८ जागा आल्या आणि भाजपच्या एकट्याच्याच १०५ - चंद्रकांत पाटील
संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी या मुलाखतीवर टीका केली असून महाविकासआघाडीला आव्हान देखील दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अन्यथा अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोप येणार नाही - मंत्री हसन मुश्रीफ
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार काल सातारा दौऱ्यावर होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र आता शरद पवरांवरील विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राऊत ग्रेट संपादक आहेत, उद्या ते देवालाही प्रश्न विचारतील - चंद्रकांत पाटील
गलवान खोऱ्यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न विचारले होते. यावरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांना बेड नाहीत, रुग्णवाहिका नाहीत, तरीही परिस्थिती चांगली आहे, असे सरकार कसे काय म्हणत आहे, असा सवालही त्यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद मिटला; राजू शेट्टींचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा
विधान परिषदेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधान परिषद निवडणुकीची ब्याद नकोच, अशी भूमिका घेतली होती. यावरून संघटनेमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे दिसत होते. कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व हा वाद मिटविण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानीमध्ये अंतर्गत वाद वाढल्याने राजू शेट्टींची विधानपरिषद आमदारकीतून माघार?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादीकडून विधानपरिषद आमदार होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतल्यानंतर तर या चर्चेनं अधिकच वेग पकडला आहे. मात्र अशातच आता ही आमदाराकीची चर्चा राजू शेट्टी यांच्यासाठी नवी डोकेदुखी ठरणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्वाभिमानीचे दोन मोठे नेते या मुद्द्यावरून नाराज झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकीचा प्रस्ताव
एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिनही पक्षांमध्ये या जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिर निर्माणासाठी महाविकास आघाडीचा पाठींबा – मंत्री हसन मुश्रीफ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
5 वर्षांपूर्वी -
भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्राकडे देणं अयोग्य; पवारांची नाराजी
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं राज्याकडून काढून घेणं अयोग्य आहेच, पण त्याहीपेक्षा त्यास मान्यता देणं जास्त अयोग्य आहे, अशी नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. मात्र, याबाबतचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर: हाणामाऱ्या ऐकल्या आता विरोधक नगरसेवकाने घेतला सत्ताधारी नगरसेवकाचा मुका
राज्यभरात अनेक महापालिकांमधील सर्वसाधारण सभा या हाणामारी आणि बाचाबाचीने गाजल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. परंतु, तिकडे कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणाने गाजली. महापालिकेत एका नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकाची चक्क भर सभागृहात करकचून पप्पी घेतली. महापालिकेची सभा सुरु असताना भर सभागृहात विरोधीगटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची पप्पी घेतल्याने सर्वजण अवाक् झाले.
5 वर्षांपूर्वी -
महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या हलवणकरांना उदयनराजे विनंती करणार कि ?
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर राज्यांच लक्ष वेधलं आहे. उदयनराजे भोसलेंनी राजकारणासाठी पत्रकार परिषद घेतली नसल्याचं सुरूवातीलाच स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चाबूक! म्हणत खवय्ये सुखावले, कोल्हापूरकरांच्या ताटात मटण
कोल्हापूर शहरातील कसबा बावडा या उपनगरात मटण दरवाढीचा मुद्दा उपस्थित झाला. येथेच या वादाची पहिली ठिणगी पडली. या परिसरातील मटण विक्रेत्यांनी ५६० ते ५८० रुपये किलो दराने विक्री सुरू केली. त्यानंतर येथील दुकाने बंद पडू लागली. मात्र, नदीपलिकडे मटण ४६० किलोने मिळत असताना गावात मात्र मटण विक्रेते आर्थिक लूट करत असल्याचा आक्षेप लोकांनी घेतला. हे आंदोलन इतर ठिकाणीही पसरू लागले. मटण विक्री बंद असल्याने कोल्हापूरकर ताटातील झणझणीत मटणाला वंचित झाले होते. मात्र, कृती समितीने यावर तोडगा काढल्याने अखेर आजपासून मटण विक्री सुरू होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
विश्वासघाती सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला - देवेंद्र फडणवीस
एका विवाह समारंभाच्यानिमित्ताने रविवारी फडणवीस कोल्हापुरात आले होते. त्यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. विश्वासघाती सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा एक पै चाही फायदा नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री ते म्हणाले,आज शेतकरी अडचणीत आहे. त्याला तातडीने मदत देण्याची गरज होती. सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करतो अशी घोषणा करणाऱ्यांनी ‘यु टर्न’ घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरबाबत ‘तसं’ मी झोपेतही बोलू शकत नाही : चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये युतीच्या झालेल्या पराभवानंतर पत्रकार परिषद रविवारी घेतली होती. यावेळी एका वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांना समाज माध्यमांवर ट्रोल केलं गेलं. कोल्हापूरबद्दल केलेल्या त्या विधानाची चर्चा सर्वत्र सुरू होती. आता त्यावर चंद्रकांत दादांनी एक व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकार परिषदेत मी व्हॉटसअपवर आलेले मेसेज वाचून दाखवले. जो मेसेज वाचून दाखवला त्यामध्ये शेवटचं वाक्यही होतं. त्या शेवटच्या वाक्याशी मी सहमत नाही. कोल्हापूरच्या जनतेचा अपमान होईल असं वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नााही असं त्यांनी म्हटलं.
6 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर जिल्ह्यातुन ६९ जिवंत गावठी बॉम्ब जप्त
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील माले मुडशिंगी येथे ६९ गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याबाबत दोघांना अटक करण्यात आली आहे. विलास जाधव आणि आनंदा जाधव अशी अटक केलेल्यांची नाव असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर मिळत नाही, पण नेत्यांना फिरायला मिळतं: राजू शेट्टी
राज्यावर जल-आपत्ती आली आहे. कोल्हापूर सांगली आणि सातार जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी नेते पर्यटनस्थळाला भेट दिल्या सारखे हेलीकॉप्टर आणि बोटीमधून सेल्फी काढत आहेत. त्यामुळे या असंवेदनशील सरकारवर विरोधकांनी चांगलीचं टीकेची झोड उठवली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर: फिल्मी दौरे! मंत्री गिरीश महाजन हवेतून जमिनीवर आले; तिथेही सेल्फी-हसत मजा
मुसळधार पाऊस आणि धरणांतील विसर्गामुळे प्रमुख नद्यांनी धोक्याची लक्ष्मणरेषा ओलांडल्याने कोल्हापूर आणि सांगलीत पूरपरिस्थिती गंभीर बनली असून अजूनही हजारो लोक पुरात अडकून पडले आहेत. चार दिवसांनंतरही मदत न पोहोचल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तब्बल ७०८ गावांना गेल्या काही दिवसांतील पुराचा फटका बसला असून तब्बल २ लाख ४७ हजार जणांना विविध यंत्रणांद्वारे सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. राज्यात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो गावांना पुराचा वेढा पडल्यामुळे रस्ते वाहतूक बंद आहे. कोल्हापुरातील गोकुळसह इतर दूध संघाचे संकलन बंद आहे. दूध, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा होऊ शकला नाही. पाऊस थांबल्याने पूर ओसरू लागला असला तरी आता रोगराई पसरण्याची भीती आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुरग्रस्तभागाला १०० टक्के कर्जमाफी द्या; एनसीपीच्या प्रतिनिधींकडून ५० लाखांची मदत: शरद पवार
सांगलीत आलेल्या महापूरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘शिवस्वराज्य’ यात्रा स्थगित केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुराबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेला राज ठाकरेंशी चर्चा होऊ शकते : शरद पवार
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, एनसीपीच्या आघाडीला अनुकूल वातावरण दिसत आहे. आपण अनेक लोकसभा निवडणुका पाहिल्या, यापुर्वी देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रात एक-दोन वेळा प्रचारासाठी येत होते. आता नरेंद्र मोदी यांना दर २-३ दिवसांनी महाराष्ट्रात यावे लागते, यावरून येथील राजकीय हवा बदलत असल्याचे सूचक विधान एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
6 वर्षांपूर्वी -
एनसीपी-काँग्रेसचे उमेदवार भाजपने पळवले, अन फडणवीस म्हणतात आघाडीला उमेदवार मिळेना?
भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी अंबाबाईचं एकत्रित दर्शन घेतलं. त्यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निवडणूक लढायला तयार नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. भारतीय सैन्याच्या कामगिरीवर संशय घेणाऱ्यांवरही मुख्यमंत्र्यांनी टीकेची तोफ डागली. तर शिवसेना-भाजपा युती म्हणजे फेविकॉलचा जोड आहे, तुटणार नाही अशी ग्वाहीदेखील त्यांनी राज्याच्या जनतेला दिली.
6 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरचा सभेला थेट कर्नाटकातून माणसं आणली, मराठी समजत वा बोलताही येत नव्हतं
भाजपा आणि शिवसेनेची पहिली जाहीर सभा कोल्हापुरात झाली. तेव्हा संपूर्ण मैदान भरून रस्त्यापर्यंत गर्दीचा रेकॉर्ड झाला. या तुफान सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाच्या तीन मित्रपक्षांचे नेते रामदास आठवले, विनायक मेटे आणि महादेव जानकर व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा अनेक लोकांशी व्यक्तिशः बोलून पाहिलं तेव्हा मोठ्या प्रमाणावर बसलेल्या महिलांना ना मराठी येत होतं, ना मराठी समजत होतं हे त्यांनी कॅमेरावर मान्य केलं. त्यावरूनच हे लोंढे जवळच्या सीमेवरून म्हणजे कर्नाटकातून आणल्याचं प्रसार माध्यमांच्या ध्यानात आलं आणि त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमानावर व्हायरल झाले आहेत. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी जनसागर दाखवण्यासाठी किती पैसा खर्ची केला आहे याचा प्रत्यय येत होता.
6 वर्षांपूर्वी