चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटणार | राणे आणि शिवसेनेकडून पुन्हा इशारे सुरु

मुंबई, ०७ सप्टेंबर | कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत घोषणा केली आहे. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा राणे यांनी आज केलीय. दरम्यान, शिवसेनेकडून 7 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटणार, राणे आणि शिवसेनेकडून पुन्हा इशारे सुरु – Chipi Airport to be inaugurated on 9 October 2021 announcement by union minister Narayan Rane :
9 ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळावरुन विमान वाहतूक सुरु होईल. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजता सिंधुदुर्गात हा कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी आपण स्वत: आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित असतील, अशी माहिती राणे यांनी दिलीय. सात वर्षापासून विमानतळ बांधून तयार होतं. आज सकाळी ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलो. त्यांची वेळ घेतली. त्यानंतर मी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करत असल्याचं राणे म्हणाले. सिंधुदुर्ग, मुंबई आणि अन्य ठिकाणी विमान वाहतूक सुरु होईल असंही राणे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेकडून 7 ऑक्टोबर रोजी विमानतळाचं उद्घाटन होईल असं सांगण्यात आलंय. या बाबत विचारलं असता क्रेडीट घेण्याचा प्रश्न नाही. 2014 पासून विमानतळ आम्ही बांधलं. आम्ही स्थानिक नाहीत का? त्यामुळे आम्ही विमानतळाचं उद्घाटन करणार असं राणे यांनी सांगितलं आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Chipi Airport to be inaugurated on 9 October 2021 announcement by union minister Narayan Rane.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं