गरीब संजय राऊतांना अगोदर कुणीतरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या: निलेश राणे

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेतील वाद आता चिघळला आहे . लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेळेवेळी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आता राऊतांवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटवरुन जोरदार टीका केला आहे.
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असून यावरुन सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. रोज पत्रकार परिषद घेऊन भाजपावर टीका करत असल्याने संजय राऊत यांचं नाव सध्या चर्चेत आहे. दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली असून येणाऱ्या दिवसात शिवसैनिकच त्यांना चोपेल असा टोला लगावला आहे.
मला काल पासून वाटतंय येणाऱ्या काही दिवसात शिवसैनिकच संज्या राऊतला धरून मचबुत चोपेल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 11, 2019
संजय राऊत इतके गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेले. बाकीचं राहु द्या, अगोदर त्यांना कुणीतरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या, अशी टीका त्यांनी दोन दिवसांपूर्वी राऊत यांच्यावर केली होती. राणे कुटुंबाचा आणि ठाकरेंमधला वाद सर्वांना ठाऊक आहे. त्यातच आता राज्यात सत्तास्थापनेवरून संघर्ष सुरू आहे. अशातच निलेश राणेंनी संजय राऊतांना छेडलंय. त्यामुळे शिवसेनेकडून निलेश राणेंच्या टीकेला काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संज्या राऊत इतका गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेला. बाकी राहुदे त्याला अगोदर कोणी तरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या. आणि उध्दव ला cadbury चॉकलेट द्या बिचाऱ्याला वाईट वाटलं की त्याला खोटारडा म्हटलं. शाळेत असल्यासारखा वाटलं त्याला बघून.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 8, 2019
मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यात त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबच आश्वासन दिले होते, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा खोडून काढला. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी युतीबाबत चर्चा करताना आम्हाला उपमुख्यमंत्रिपद देऊ असे सांगितले होते. युतीबाबतची चर्चा एकदा फिस्कटल्यानंतर अमित शाहांचा मला फोन आला होता. त्यावेळी त्यांनी उद्धवजी तुम्हाला काय पाहिजे अशी विचारणा केली. तेव्हा मी सांगितले की मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर आणेन असे वचन दिले असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं