सिंधुदुर्गात गडगडाटासह पावसाची हजेरी! वीज, टेलिफोन सेवा खंडित

सिंधुदुर्ग : कोकणाची आज पहाट झाली ती जोरदार पावसाने. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या हजेरीने सुखावलेल्या बळीराजाने पेरणीची कामेदेखील सुरू केली आहेत. परंतु पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणची वीज आणि टेलिफोन सेवा खंडित झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल, विदर्भ-मराठवाड्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
तसेच केरळात ८ जून रोजी मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होत्या. त्यानुसार येत्या २ दिवसांत केरळात मान्सूनचे आगम होण्याची शक्यता असून त्यानंतर कोकणात दाखल होणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं