रायगड: राष्ट्रवादीला खिंडार, आमदार अवधूत तटकरे शिवबंधन बांधणार

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्ष आणि सेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधी एनसीपी-काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. आता एनसीपीला आणखी एक धक्का बसणार आहे. एनसीपीचे आमदार अवधूत तटकरे हे सोमवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी आणि खासदार माजिद मेमन हे मेट्रो भूमिपूजनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमाला माजिद मेमन उपस्थित राहिल्याने ते देखील भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, पक्ष बदलाची चर्चा सुरू होताच माजिद मेमन यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. ‘मी पक्ष बदलणार नाही. शरद पवारांचा मी विश्वासू सहकारी त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच नाही,’ असा खुलासा माजिद मेमन यांनी केला होता. मेमन यांनी भारतीय जनता पक्ष प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे यांच्यात वाद असल्याचे बोलले जाते. सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर त्यांनी आमदारकीवर दावा केला होता. तेव्हापासून त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे समजते. त्यातच सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत तटकरे यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हा सरचिटणीस रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. विकास हवा असेल तर शिवसेना-भाजप युतीशिवाय पर्याय नसल्याचे पक्ष प्रवेशानंतर रघुवीर देशमुख म्हणाले होते. मागील विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून अवधूत तटकरे यांचा निसटता विजय मिळवला होता. या निवडणुकीत अवधूत तटकरे यांना ६१,०३८ मते मिळाली. तर शिवसेनेचे रवी मुंडे यांना ६०९६१ मते मिळाली आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं