महत्वाच्या बातम्या
-
रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा १० दिवसांचा लॉकडाउन
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूच्या वाढच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी म्हणून रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा ल़ॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
चाकरमानी कोकणात ज्या ठिकाणावरून येणार, त्याच ठिकाणी स्वस्त दरात कोविड चाचणी करावी
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. कोरोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात होता. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर काल मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातल्यास आंदोलन करु - खा. नारायण राणे
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. कोरोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर मिळाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवात कोकणात जाताय? पण जिल्हाधिकाऱ्यांकडून बंधनं
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. करोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर मिळाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
खळबळ वगैरे काही नाही ही फक्त त्यांची वळवळ - निलेश राणे
शरद पवारांना यावं मातोश्रीवर लागलं अशी परिस्थिती नाही,अधूनमधून ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत. जशी बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे ना,तशी काही लोक बातम्यांची रिपरिप करत असतात. पवार साहेब भेटले पण इतर विषयांसाठी भेटले, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या थोरातांची चिंता, पण ग्रामीण भागतल्या जुन्या शिवसेनेच्या नेत्यांना विचारत नाही
सामना संपादकीयमधून भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आज टीका करण्यात आली आहे. पूर्वी थोरातांची कमळा चित्रपट गाजला होता. आता विखे पाटलांची कमळा अशा एक चित्रपट आला आणि पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची टूक अॅण्ड ट्रॅव्हल कंपनी बंद पडली आहे. मात्र त्यांची टुरटूर सुरु आहे अशा शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सामना संपादकीयमधून यांना टोला लगावण्यात आला आहे. यावेळी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इशारा देत टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसैनिक म्हणजे तुम्ही किंवा मुलगा पंतप्रधान बनणार आणि जॅकेट शिवायला टाकली खासदारांनी
शिवसेनेचा काल ५४वा वर्धापन दिन पार पडला. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन काल कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
वादळग्रस्त कोकणी माणसाचे प्रश्न घेऊन फडणवीस मुख्यमंत्र्यांना भेटले
नुकसानग्रस्तांना तातडीने रोख रक्कम म्हणून मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार देखील उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
कोकणाला मागच्या ९ दिवसांत कोणतीही मदत मिळालेली नाही - फडणवीस
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले की, एनडीआरएफसोबतच राज्यानेही नुकसानग्रस्तांना मदत करणं गरजेचं आहे. एनडीआरएफ प्रत्येक आपत्तीत मदत करतं. मात्र यावेळेस राज्यानेही मदत करायला हवी. केंद्र सरकारकडून नंतर मदत होईलच, पण आता राज्याने मदत करायला हवी, असं ते म्हणाले. तसेच, राज्याने केलेला खर्च केंद्र सरकारच देतं, असंही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मी अनेकदा बारामतीत गेलो, मला तिथेही समुद्र दिसला नाही – फडणवीस
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजपासून दोन दिवस कोकणचा दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील.
5 वर्षांपूर्वी -
...त्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल', शरद पवारांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकणात आले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फडणवीसांच्या या प्रस्तावित कोकण दौऱ्यावर पवारांनी निशाणा साधला.
5 वर्षांपूर्वी -
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकण दौऱ्यावर
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मंगळवारपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
होम कोरंटाईनच्या संपर्कात आल्याने सेनेचे सिब्बल अनिल परब यांनी काळजी घ्यावी - आ. नितेश राणे
राज्यातील कोकणात देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यात कोकणासाठी कोरोना टेस्टसाठी देखील विशेष सोय नाही आणि त्यामुळे अडचणी वाढत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकांना होम कोरंटाईन करण्यात आलं आहे. मात्र आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक फोटो ट्विट करताना धक्कादायक माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील नुकसानाची पाहणी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही - निलेश राणे
बुधवारी महाराष्ट्राला बसलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळा’च्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
5 वर्षांपूर्वी -
रायगडसाठी १०० कोटीचा तातडीचा निधी; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
बुधवारी महाराष्ट्राला बसलेल्या ‘निसर्ग चक्रीवादळा’च्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर तातडीची मदत म्हणून रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अलिबागचा दौरा करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वादळग्रस्त रायगडच्या दौऱ्यावर
कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील जिल्ह्यांसाठी सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाली आहे. दापोली, मंडणगड, श्रीवर्धन, अलिबाग या भागांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! कोरोनाचा संसर्ग झालेल्या नर्सकडून चाईल्ड वॉर्डमधील मुलांवर उपचार
नितेश राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिल्हा रुग्णालयातील या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत. नितेश राणे म्हणाले की, संबंधित परिचारिकेला स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत क्वारेंटाइन करणे आवश्यक होते. मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच संबंधित नर्सला चाईल्ड वॉर्डमध्ये ड्युटी देऊन तेथील लहान मुलांचे आरोग्य सिव्हील सर्जननी धोक्यात घातले आहे.
5 वर्षांपूर्वी -
देवगड: महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ८ दिवसांनी कोरोना पॉसिटीव्ह रिपोर्ट आला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर मुंबई, पुण्यातील नागरिकांनी गावची वाट धरली. मिळेल त्या वाहनाने तसेच शेकडो किमी पायपीट करत नागरिक गावागावात पोहोचले. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ४५ हजारहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. तर काहींना प्रवासात प्राण गमवावे लागले. जिल्ह्यात एकूण १७ करोनाबाधित रुग्णांपैकी ७ रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त झाले असून सध्या १० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कणकवलीत रोज १५० लोकांसाठी मोफत कमळ थाळीला सुरुवात
राज्यात दर दिवशी जवळपास ७००-८०० च्या घरात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता उद्या संपणारा केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढविण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली आहे. राज्यात मुंबई-पुणे सर्वाधिक बाधित असले तरीही उपराजधानी नागपूरमध्येही रुग्णांचा आकडा ४९ वर गेलेला आहे. यामुळे राज्यात उद्यापासून पुढील दोन आठवडे म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान या लॉकडाउन’मध्ये गरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर जेवणाचे हाल झाले आहेत. त्यानिमित्त महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन योजना मोठ्याप्रमाणावर कार्यान्वित केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंटेनर थिएटर; तर आ. नितेश राणेंची संकल्पना ठरू शकते मराठी चित्रपट श्रुष्टीसाठी संजीवनी
मागील अनेक वर्षे हिंदी चित्रपट वेळीच मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची वेळ येते, त्यावेळी मराठी चित्रपटांवर कसा अन्याय होतो हे सांगणारे लोक, निर्माते, काही राजकीय पक्ष पुढे येत सिनेमागृह तोडण्याची भाषा करतात. पण दुस-यांची सिनेमागृह फोडण्यापेक्षा स्वत:चे सिनेमागृह उभे करून वेगळा आदर्श समाजासमोर ठेवण्याची किमया आ.नितेश राणे करताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी