महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्र्यांसमोर हात झटकला, पण अजित पवारांचे थेट ड्रायव्हर झाले आ. भास्कर जाधव
शिवसेनेत नाराज असलेल्या आमदार भास्कर जाधव यांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. जाधव पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज विन्या राऊतने लोकसभेत विचारलं 'दिल्ली मे कुठे कुठे दंगल हुवा'
दिल्लीत नुकत्याच झालेल्या हिंसाचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कुठे होते? असा प्रश्न विरोधकांनी अनेकदा उपस्थित केला होता. लोकसभेतही तो विचारण्यात आला. यावर आपण या काळात संबंधित भागांना भेटी का दिल्या नाहीत, याचे स्पष्टीकरण शाह यांनी बुधवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिले.
5 वर्षांपूर्वी -
नेहमीप्रमाणे काही कारस्थानी काँग्रेसवाल्यांनीच सिंधिया यांची कोंडी केली असावी...
मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे राजीनाम्याचे पत्र समोर आले. ज्योतिरादित्य शिंदे बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोकणातील पहिले बिझनेस इंक्युबेशन सेंटर; स्टार्टअप संकल्पनाना मिळणार अर्थपुरवठा
महाराष्ट्रात पाहिलं बिझनेस इंक्युबेशन सेंटर झालं, मात्र आता दुसरं कोकणात होणार आहे. स्वतः आमदार नितेश राणे यांनी संकल्पना आणली असून ती जून महिन्यात कार्यान्वित होणार आहे. कोकणातील तरुण-तरुणींच्या स्टार्टअप संकल्पनांना सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा येथून दिल्या जाणार असून त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टार्टअप संकल्पनेला भविष्य असल्यास त्याला थेट अर्थसहाय्य देखील मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी ४५ कोटी अन राम मंदिराला फक्त १ कोटी? - निलेश राणे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६'ला डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव द्या - आ. नितेश राणे
काल ठाकरे सरकारने बजेटमध्ये अनेक घोषणा केल्या असल्या तरी विरोधकांनी त्यावर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम जोरदारपणे सुरु आहे. त्यानिमित्ताने आमदार नितेश राणे यांनी ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव मुंबई-गोवा महामार्ग क्र.६६ या महामार्गाला देण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
विनायक राऊत! तुम्हालाही चपलेने मारू', भाजप या नेत्याचा इशारा
नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणात रणकंदान सुरु आहे. दोन दिवस आधी शिवसेनेनं कात्रादेवीत शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभेतून नाणार विरोधी भूमिका घेतली. नाणार विषय संपल्याचं जाहीर करत शिवसेनेकडून नाणारचे समर्थन करणाऱ्यांना शेवटचं अल्टिमेंटम दिला होता. “नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा” असं आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून दिलं होतं. “विनायक राऊत यांच्या या धमकीला घाबरणार नाही. रिफायनरी समर्थनाच्या सभेला जाणार,” असा चंग रिफायनरीला समर्थन देणाऱ्या शिवसैनिकांनी बांधला होता.
5 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची मोठी गर्दी; कोण जाणार झोडायला पुढे? पेच वाढला
नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणात रणकंदान सुरु आहे. काल शिवसेनेनं कात्रादेवीत शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभेतून नाणार विरोधी भूमिका घेतली. नाणार विषय संपल्याचं जाहीर करत शिवसेनेकडून नाणारचे समर्थन करणाऱ्यांना शेवटचं अल्टिमेंटम दिला होता. “नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा” असं आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून दिलं होतं. “विनायक राऊत यांच्या या धमकीला घाबरणार नाही. रिफायनरी समर्थनाच्या सभेला जाणार,” असा चंग रिफायनरीला समर्थन देणाऱ्या शिवसैनिकांनी बांधला होता.
5 वर्षांपूर्वी -
तुझी उंची कळली आम्हाला खोतकर, युती असून सुद्धा तू पडलास: निलेश राणे
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. ‘वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पाचं समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांचं थोबाड फोडा; तर राणेंबद्दल काय म्हणाले राऊत?
नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणात रणकंदान सुरु आहे. शिवसेनेनं कात्रादेवीत शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभेतून नाणार विरोधी भूमिका घेतली. नाणार विषय संपल्याचं जाहीर करत शिवसेनेकडून नाणारचे समर्थन करणाऱ्यांना शेवटचं अल्टिमेंटम दिलं आहे. “नाणार विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनी झोडा” असं आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून दिलं. तसेच नाणारला समर्थन करणाऱ्या शिवसेना जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची जाहीर सभेतून हकालपट्टी करण्यात आल्याचेही राऊत म्हणाले. “विनायक राऊत यांच्या या धमकीला घाबरणार नाही. रिफायनरी समर्थनाच्या सभेला जाणार,” असा चंग रिफायनरीला समर्थन देणाऱ्या शिवसैनिकांनी बांधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
तुझी उंची किती अन तू बोलतो किती; अर्जुन खोतकरांकडून निलेश राणेंची खिल्ली
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. ‘वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! देवगड हापूस आंब्याच्या खोक्यातुन 'कर्नाटकचा हापूस आंबा' बाजारात येतोय
रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार मार्केट यार्डात सुरु असल्याचे उघडकीस आले आहेत. खरेदी केलेला आंबा रत्नागिरी आहे की कर्नाटक हे कळू नये यासाठी कर्नाटक आंब्याची रत्नागिरी, देवगड असा उल्लेख असलेल्या बॉक्समधून विक्री होत आहे. फसवणुकीच्या या प्रकाराकडे बाजार समितीचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे असले तरी त्यात त्यांचे देखील आर्थिक हितसंबंध असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
आणीबाणीत अटक टाळण्यासाठी बाळासाहेबांनी इंदिरा गांधींशी मांडवली केली होती
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. ‘वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली होती. सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत फडणवीसांनी लिहिलेल्या दोन पत्रांचं काय झालं? या पत्रांची केंद्रान दखल न घेणे हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचा अपमान आहे, अशी टीकाही सामनामधून करण्यात आली होती. याच अग्रलेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करण्यात आलं होतं. २००२ पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘तिरंगा ध्वज’ राष्ट्रध्वज का मानला नाही? असा सवाल अग्रलेखात विचारण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात? निलेश राणे
शिवसेनेनं वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीकेचे बाण सोडले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘ढाल’ करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर ‘पेच’ निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
...असं असेल तर यापुढे कोकणच्या शेतकऱ्यांनी कर्ज फेडूच नये: आ. नितेश राणे
भाजपा आमदार नितेश राणे यांनी शेतकरी कर्जमाफीवर वेगळी भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं. ‘कोकणातील शेतकरी १०० टक्के कर्ज भरतात, मग कर्ज भरणारे आणि न भरणारे यांना एक सारखाच न्याय…मग यापुढे शेतकऱ्यांनी कर्ज भरायचीच नाहीत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारसाहेब तुमच्यासारखा मोठा माणूस माहिती न घेता बोलतो याचं आश्चर्य वाटतं: निलेश राणे
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टची बुधवारी दिल्लीमध्ये पहिली बैठक पार पडली. या ट्रस्टवरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. ‘राम मंदिराच्या उभारण्यासाठी ट्रस्ट तयार करु शकता तर मशिदीसाठी का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
कोकण: नाणार'वरून शिवसेनेच्या २२ शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
कोकणातील नाणार रिफायनरीवरून शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. रिफायनरीला समर्थन करणाऱ्या विभागप्रमुखावर शिवसेनेने कारवाई केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ कोकणातील सागवेसह विभागातील तब्बल २२ शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिली आहेत. सागवे आणि इतर गावातील शिवसैनिकांच्या बैठकीत शिवसेनेच्या २२ शाखा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अध्यक्षाचा नकार तर कार्यकर्त्यांचा पुढाकार; डबलढोलकी भूमिकेमुळे कोकणी माणूस सावध? सविस्तर
मागील काही दिवसांपासून कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनात आलेल्या जाहिरातीवरून कोकणात वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून आधी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं आता भूमिका बदलल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर खुलासा केला. याआधीही नाणारला विरोध होता आणि यापुढेही असेन अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यींनी मांडली.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी: मुख्यमंत्री
राज्यात गेल्या काही दिवसांपासून एल्गार परिषदेबरोबरच कोरेगाव भीमा प्रकरण चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेसंदर्भातील तपासावर संशय व्यक्त केला होता. याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, हा याप्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं एनआयएकडे दिला. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. “कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडं दिलेला नाही. देणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री देवीसाठी वेळ देऊ शकत नाहीत तर लोकांना काय देणार: नारायण राणे
कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहिरात ‘सामना’ या शिवसेनेच्या मुख्यपत्रात प्रकाशित झाल्याने शिवसेनेवर चौफेर टीका होत आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची भर पडली आहे. खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी