महत्वाच्या बातम्या
-
रायगड: कोकणी मतदाराने शिवसेनेच्या अनंत गितेंना नाकारलं; राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी
शिवसेनेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना यंदाची लोकसभा काहीशी अवघड असल्याचं आधीच म्हटलं जात होतं. त्यात राष्ट्रवादीने माजी मंत्री सुनील तटकरे यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्याने शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. अनंत गीतेनी या मतदारसंघाकडे काहीस दुलक्ष केल्याचा आरोप स्थानिक लोकांना अनेकवेळा केला होता आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध रोष पाहायला मिळत होता.
6 वर्षांपूर्वी -
पनवेल: मनसे कार्यकर्त्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना अटक
पनवेल मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी त्यांच्या ७ ते ८ गुंड साथीदारांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने ३ आरोपींना अटक केली आहे. मयूर चिपळेकर, किरण सोलंकर, तेजस म्हात्रे अशी त्यांची नावे आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभेत बिथरलेल्या भाजप नगरसेवक व ८-१० छपरी कार्यकर्त्यांचा मनसैनिकावर हल्ला, सर्वजण फरार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरील रागातून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने महाराष्ट्र सैनिकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला आहे. जवळपास ८ ते १० गुंड कार्यकर्ते सोबत घेऊन पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसैनिक प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. मनसैनिकावरील हा संपूर्ण हल्ला सीसीटीव्हीत कैद झाल्याने भाजप नगरसेवकाचं क्रूरकृत्य उघड झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: स्वर्गीय. बाळासाहेबांनंतर शिवसेनेवर सभेसाठी भाडोत्री गर्दी जमविण्याची वेळ
शिवसेनेच्या कणकवलीतील सभेला मुंबईवरून भाडोत्री अमराठी माणसे आणल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या संबंधित त्यांनी पुरावा म्हणून एक व्हिडिओ देखील ट्विटर अकाऊंटवर प्रसिद्ध केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्तेत असून सेनेने भाजपाला साथ दिली नाही, मग जनतेला कशी देतील? आ. नितेश राणे
युतीच्या सत्तेत असताना भारतीय जनता पक्षासोबत राहू शकली नाही ती शिवसेना जनतेच्या हितासाठी कशी राहील? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी नेरूर येथील जाहीर सभेत उपस्थित करून शिवसेनेच्या थापांना मतदारांनो आता तुम्ही बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
6 वर्षांपूर्वी -
५ वर्षांत अच्छे दिन आले का? नारायण राणेंचा सवाल
मागील ५ वर्षात महागाई कमी झाली का? अच्छे दिन आले का? असं म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी सरकारसह शिवसेना, उद्धव ठाकरे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर प्रचारसभेत तुफान टीका केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी जाकादेवी येथे जाहीर सभा झाली, यावेळी ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची धाकधुक वाढली! अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत येऊन जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळे खंबाटा ऐअरलाईन्स मुद्द्यावरून कोकणातील राजकारण प्रचंड तापण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
विनायक राऊतांची वैभववाडीतील ही विराट प्रचार सभा त्यांचा निकाल सांगत आहे?
मागील ५ वर्षे मुंबईत राहून सिंधुदुर्ग-रत्नागिरीच राजकारण पाहणारे खासदार विनायक राऊत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात दिसू लागल्याने आधीच त्यांचा मार्ग कठीण असल्याचं प्राथमिक निष्कर्षात समोर आलं होतं. विकासाचा मुद्दा घेऊन निवडून आले आणि ५ वर्ष दिसेनासे झालेले विनायक राऊत शेवटच्या क्षणी नारळ फोडण्याची स्टंटबाजी करताना कोकणवासीयांना दिसले. मात्र त्याच कोकणवासीयांना आणि स्थानिक शिवसैनिकांनी देखील चांगलाच हिसका दाखवला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत तब्बल २८ कंपन्यांमध्ये भागीदारी - नारायण राणे
कोकणात देखील लोकसभेची धामधूम सुरु झाली आहे असंच म्हणावं लागेल. मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, १९६०-६६ दरम्यान मुंबईत मराठी माणूस साठ टक्के होता, पण आज मराठी माणूस केवळ १८ टक्के शिल्लक आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली, उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. २८ कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
खंबाटातील ४०० कोटींच्या भ्रष्टाचारात विनायक राऊतांचा हात
बहुचर्चित तब्बल ४०० कोटींचा भ्रष्टाचार करून एका रात्रीत सर्वाधिक म्हणजे एकूण २७६३ कामगार तसेच त्यांच्या तब्बल दहा ते अकरा हजार कुटूंबियांना रस्त्यावर आणणा-या खंबाटा एव्हिएशन कंपनीतील घोटाळय़ाचा खरा सूत्रधार, या कंपनीचा निरव मोदी हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत असून बहुतांश कोकणातील कामगार असलेल्या या खंबाटातील भ्रष्टाचारातुन विनायक राऊत यांनी कोकणी माणसाचीच फसवणूक केली आहे असा धक्कादायक आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला.
6 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा: सनातन समर्थकाच्या उमेदवारामुळे धर्मनिरपेक्ष काँग्रेस अडचणीत
काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष आणि कट्टर हिंदुत्ववादविरोधी पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- लोकसभा मतदारसंघातून सनातन समर्थक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
निलेश राणेंच्या उमेदवारीवरून नारायण राणेंवर भाजपचा दबाव?
खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून जोरदार मोर्चेबांधणी करत पुत्र निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवतील, असे जाहीर केले. परंतु आता निलेश राणे यांनी लोकसभा निवडणूक लढवू नये आणि युतीधर्म पाळावा म्हणून भाजपच्या नेतृत्वाने नारायण राणेंवर थेट दिल्लीतून दबाव आणला आहे. यामुळे खासदार नारायण राणे कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे प्रचारात, तर मुंबई पूल दुर्घटनेतील जखमींची आमदार नितेश राणेंकडून विचारपूस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला जोडणारा पूल कोसळून ६ जण ठार तर ३४ हून अधिकजण जखमी झाल्याची दुर्घटना गुरुवारी घडली होती. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी आमदार नितेश राणे यांनी स्वतः जखमींची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
6 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा; माजी खासदार निलेश राणे राष्ट्रवादीकडून लढणार?
सिंधुदुर्ग-रत्नागिरीची जागा काँग्रेसने एनसीपीला द्यावी आणि एनसीपीकडून निलेश राणे यांनी निवडणूक लढवावी, असा नवीन प्रस्ताव समोर आला आहे. सदर जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडली तर जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला द्यावी, असा देखील प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नाणारवासियांच्या व विरोधकांच्या लढ्याला यश, रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द
विरोधी पक्ष आणि स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून जोरदार विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची आज अधिकृत घोषणा केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राणे फडणवीस भेट! नारायण राणे शिवसेने विरोधात ५ जागांवर तगडे उमेदवार देणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या अनुषंगाने नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील जोरदार पणे कामाला लागला आहे. भाजप-शिवसेना युती झाली तरी देखील खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष राज्यातील ५ मतदारसंघांमध्ये तगडे उमेदवार उभे करणार आहेत. हे पाचही महत्वाचे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. सध्या शिवसेनेत अनेक वरिष्ठ पदाधिकारी युती केल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे कदाचित अशांनाच आर्थिक रसद पुरवून शिवसेनेविरुद्ध तगडं आवाहन उभं केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
संजय राऊत व उद्धव ठाकरेंनी फक्त बाता मारून मराठी माणसाला फसवलं
स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काही लुख्खे सांगत होते की निलेश राणेला रायगडात येऊ देणार नाही, मी तर आलो
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते तसेच माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा शिवसेनेवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, ‘सगळेच शिवसैनिक वाईट नाहीत, पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना थेट आदेशच दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील सुद्धा: निलेश राणे
भारतातील निवडणूक रणनीतीकार आणि जेडीयू’चे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट काल मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठी माणसाच्या हक्कांसाठी जन्मलेली शिवसेना आज मराठी माणसाच्या विरोधात
राज्यात बाळासाहेबांच्या नैत्रुत्वात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेली शिवसेना आज केवळ मराठी माणसाच्याच विरोधात काम करत आहे. त्यात व्यवसाय करण्यासाठी पुढे येणा-या मराठी तरूणांच्या आड येण्याचे कारनामे सुद्धा सध्या शिवसेनेवाले करत आहेत. मग अशावेळी मराठी माणसांनी मूग गिळून गप्प बसायचे का? अशावेळी मराठी तरूण-तरुणींनी रोजगार कोणाकडे मागायचा? यापुढे आम्ही असे अजिबात होऊ देणार नाही असे माजी खासदार निलेश राणे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी