महत्वाच्या बातम्या
-
दिग्गज नेते नारायण राणे व शरद पवार कोकणात राजकीय भूकंप करणार?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पट्यात राष्ट्रवादीची विशेष ताकद नसताना सुद्धा या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने आग्रह धरल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भव्य सभेत आरोप; सध्याच्या शिवसेनेने धंदेवाईक राजकारण सुरु केले आहे: नारायण राणे
कोकणात सध्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचे चित्र असून, त्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. स्वतः खासदार नारायण राणे यांनी पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. त्याच अनुषंगाने काल वैभववाडी येथे पक्षाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
शिवस्मारक पायाभरणी; मृत्यू झालेल्या सीए सिद्धेश पवारचं वर्षभरापूर्वीच लग्न झालेलं, कुटुंबावर शोककळा
शिवस्मारक पायाभरणीच्या शुभारंभासाठी समुद्रात गेलेली स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेला ३३ वर्षीय सिद्धेश पवारच वर्षभरापूर्वीच लग्न झालेलं. सिद्धेश मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गुणदे या गावातील असल्याची माहिती आहे. त्यांच्या बोटीला अपघात झाला तेव्हा, सिद्धेश पवार याचे मामा विक्रांत आंबरे सुद्धा त्याच्यासोबत बोटीवर उपस्थित होते, ते सुद्धा जखमी झाले आहेत. सिद्धेशच्या मामांवर मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार सुरु आहेत.
7 वर्षांपूर्वी -
पीडिते महिलेच्या संदर्भात आणि शिवसेना आ. उदय सामंतविरोधात पत्रकार परिषद घेणार: निलेश राणे
सध्या कोकणातील वातावरण महिलांसंबंधित गुन्ह्यांवरून तापताना दिसत आहे. काही दिवसांपूवी सावंतवाडी येथील एका हॉटेलमध्ये मुलीवर बलात्काराची घटना समोर आली होती आणि त्यात शिवसेनेच्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची नाव त्या हॉटेलच्या मालकीवरून समोर आली होती. त्यात आता कोकणातील अजून प्रकरण आमदार नितेश राणे पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असल्याचे सूतोवाच देण्यात आले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सावंतवाडी'स्थीत हॉटेल मधील बलात्कार प्रकरणामुळे केसरकर व वैभव नाईक यांच्या विरुद्ध संताप
कोकणातील वातावरण सध्या सावंतवाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर मळगाव येथील हॉटेलमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी तापताना दिसत आहे. विशेष म्हणजे स्वतः शिवसेनेचे आमदार, पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, ज्या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला ते हॉटेल शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या मालकीचे असल्याचे उघड झाले आहे. त्यात भर म्हणजे ते विवादित हॉटेल मुंबईतील शिवसेना नगरसेविकेचा दीर चालवत होता असं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाईंचा राजीनामा, केंद्रीय मंत्री अनंत गीतेंवर नाराज?
शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी तडकाफडकी आपला राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. प्रकाश देसाई केंद्रीय मंत्री अनंत गीतेंवर यांच्यावर प्रचंड नाराज असल्याची चर्चा स्थानिक शिवसैनिकांमध्ये रंगली आहे. जिल्ह्यात उद्योग असून सुद्धा स्थानिक शिवसैनिक उपेक्षित असल्याची नाराजी व्यक्त करत त्यांनी अप्रत्यक्ष केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गितेंना निवडणुकीच्या तोंडावर लक्ष केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचे ज्येष्ठ नेते व म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते व म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाणांवर यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमीष देत तब्बल १४ वर्षे एका महिलेची शारीरिक आणि मानसिक फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्यावर चिपळूण पोलीस स्थानकात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
कोकण; अतिउत्साही शिवसेना नेत्यांकडून 'बाप्पाला' बॉक्समधून लगेज'ने चिपी विमानतळावर आणून प्राणप्रतिष्ठा
आज कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळावर विमान उतरविण्यासाठी लागणा-या ६२ परवान्यांपैकी केवळ २५ टक्केच परवाने मिळाले असताना घाईघाईने एचडीएल कंपनीचे खासगी विमान उतरविण्याचा अतिउत्साहीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे गणेश चतुर्थीच्या तोंडावर गणरायाचं प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवलं, परंतु त्याच गणरायाला लगेज’मध्ये बॉक्समधून भरून आणण्यात आलं. सार्वजानिक असो वा घरगुती ‘बाप्पाची’ प्रतिष्ठापना करतांना त्याला ‘सीलबंद’ करून आणण्यात येत नाही.
7 वर्षांपूर्वी -
प्रसाद लाड म्हणतात नाणार प्रकल्प होणारच, पण कोकणी माणूस भाजपचे हे 'लाड' सहन करणार?
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी रत्नागिरी येथे भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले . दरम्यान, आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नाणार विषयावर बोलताना ‘नाणार प्रकल्प काही झाले, तरी आम्ही करणार’ असं धक्कादायक विधान केलं आणि त्यामुळे भाजप विरोधात कोकणात संतापाची लाट येण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
निसर्ग संपन्न केरळात जे शक्य झालं, ते कोकणात अनेक वर्ष का शक्य झालं नाही? राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोकणातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा मुंबईमध्ये पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी कोकणातील अनेक गंभीर विषयांना हात घातला. त्यावेळी त्यांनी कोकणच्या निसर्गाचा दाखला देताना केरळ राज्यातील पर्यटनाच उदाहरण समोर ठेवलं. जर तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढीस लागलं, मग कोकणच्या निसर्गात अशी काय कमी होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव: शरद पवार
मराठा समाजच्या आंदोलकांनी हिंसा तसेच जाळपोळीचे प्रकार थांबवून शांततेने आंदोलन करण्याला प्राधान्य द्यावे आणि मराठा व बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव हाणून पडावा असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
संख्याबळ असलेले विरोधक नव्हे, तर संख्याबळ नसलेले राज ठाकरेच आगामी निवडणुकीत भाजपला उजवे ठरतील: सविस्तर
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध पोटनिवडणुका, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल आणि भाजपाची घोडदौड पाहता, त्यांच्या समोर आमदार, खासदार असं मोठं संख्याबळ असणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष सुद्धा फिके पडताना दिसत आहेत. तर पदवीधर निवडणुकांचे निकाल हे जवळजवळ निश्चित असतात आणि त्या निवडणुकीचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीशी संबंध जोडणे अवघड आहे. परंतु पदवीधर निवडणुकीत सुद्धा भाजपने कोकणात चमत्कार केला तर नाशिकमध्ये ते गाफील राहिल्याने जागा गमवावी लागली होती.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंना फक्त पैशाची टक्केवारी कळते - नारायण राणे
उद्धव ठाकरेंना फक्त पैशाची टक्केवारी कळते – नारायण राणे
7 वर्षांपूर्वी -
त्यांना आरक्षणाबद्दल काय समजतं? उद्धव ठाकरेंना फक्त पैशाच्या टक्केवारीची गणितं समजतात
खासदार नारायण राणे काल पासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नारायण राणेंनी चिपळूणमध्ये एक सभा आयोजित केली असता त्यांनी मराठा आरक्षणावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा भूमिकेवर बोट ठेवत शिवसेना पक्ष प्रमुखांवर सडकून टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही: नारायण राणे
मराठा समाजाच्या आरक्षनांच्या विविध मागण्यांवर आज मुख्यमत्री आणि मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्याची बैठक होणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्या मध्यस्थीमुळे ही चर्चा होणार आहे. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही. असे ते म्हणाले. घटना दुरुस्ती प्रक्रियेला वेळ लागेल. यामुळे मागास अनुकल नसेल तर या प्रस्तावाला मंत्रीमंडळात मंजुरी घ्यावी, असेही राणे म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
पोलादपूर घाटात बस खोल दरीत कोसळून ३२ जणांचा मृत्यू
पोलादपूरजवळी आंबेनळी घाटात एक खासगी बस ८०० फूट खोल दरीत कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मुत्यू झालेले सर्वजण दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते.
7 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्गचे पालकमंत्री मराठाद्वेषी आहेत: आमदार नितेश राणे
आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात घडत असलेल्या विषयाला अनुसरून एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. तेव्हा त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर थेट आरोप केले आहेत. पालकमंत्री जिल्ह्यात मराठाद्वेषी राजकारण करत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाचा ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंद, तर केस व नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका: नितेश राणे
समस्त मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी म्हणजे क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्यासंबंधित मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी लातूर येथे पार पडली असता हा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचं स्मारक एका क्षणात का नाही होऊ शकत: निलेश राणे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पुण्याच्या दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारला चिमटा काढताना राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत असं भाष्य केलं होता. शिवसेना सध्या केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या राम मंदिरा विषयीच्या भाष्याला विरोधकांनी लक्ष केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
आम्ही निवडणुकीला एकत्र येणार का, हे आता सांगता येणार नाही: उद्धव ठाकरे
भाजप आणि शिवसेनेमधील भांडण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सारखे नसून, ५ वर्षांनी आम्ही पुन्हा काँग्रेस-एनसीपी’सारखे एकत्र येणार किंवा नाही, हे आता सांगता येणार नाही,’ वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्तेत आल्यापासून आम्ही केवळ भांडायचे म्हणून भांडत नाही आहोत आणि ते भांडण माझ्या वैयक्तिक किंवा पक्षाच्या स्वार्थासाठी नसून जनतेच्या हिताचे आहे अशी पुष्टी सुद्धा त्यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधताना जोडली.
7 वर्षांपूर्वी