महत्वाच्या बातम्या
-
काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे - अजित पवार
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. आज दुपारी १:३० वाजता पूरग्रस्ते चिपळूण आणि ४:३० वाजता महाड शहाराची ते पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत असल्याने मदत कार्यात विलंब होतो, त्यामुळे तूर्तास नेत्यांनी दौरे थांबवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. परंतु, आज काँग्रेसचे नेते राऊत आणि आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. काही दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पावसामुळे कोकणात मोठ्या प्रममाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्यापासून पूरग्रस्तांच्या खात्यावर 10 हजार रुपये जमा होणार | विजय वडेट्टीवार यांची माहिती
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. आज दुपारी १:३० वाजता पूरग्रस्ते चिपळूण आणि ४:३० वाजता महाड शहाराची ते पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत असल्याने मदत कार्यात विलंब होतो, त्यामुळे तूर्तास नेत्यांनी दौरे थांबवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. परंतु, आज काँग्रेसचे नेते राऊत आणि आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
विधानपरिषदचे विरोधीपक्ष नेते दरेकरांना नारायण राणे एकेरी शब्दात म्हणाले, थांब रे, मध्ये बोलू नको
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पहिल्यापासून आक्रमक स्वभावाचे अनुभवी नेते आहेत. त्यात प्रशासन हाताळण्याचा त्यांना मोठा अनुभव असल्याने त्यांना अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे सर्वांनी पाहिलं आहे. मात्र भाजपमध्ये आता केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याने कालपर्यंत विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आदरपूर्वक उच्चार करणारे नारायण राणे यांना त्याच दरेकरांचा एकेरी भाषेत आणि एका ओळीत शांत केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात ५ एम्ब्युलन्स, २५० डॉक्टरांची टीम पाठवणार | पवारांची माहिती
महाराष्ट्रात पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. कोल्हापूर, कोकण, सातारा, सांगली या भागात पूर आल्याने लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. लवकरच मदत जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवली आहे. यावेळी अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुढील ४८ तासांत या जिल्ह्यांत पावसांचा जोर वाढणार | या जिल्ह्यांसाठी अलर्ट
महाराष्ट्रात मागील आठवड्यात झालेल्या पावसाने पूर आला होता. अनेक जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार विरोधात बोलण्यासाठीच राणेंना केंद्राचा लाडू मिळाला - गुलाबराव पाटील
राज्य संकटात असताना राजकारण करणाऱ्यांनी थाेडा तरी विचार करायला हवा, असा सल्ला देत नारायण राणे हे मंत्री झाल्यापासून काेकणावर संकट आले. त्यामुळे तेच पांढऱ्या पायाचे असल्याचा टाेला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
चिपळूणमधील त्या महिलेच्या प्रतिक्रियेनंतर सर्व विरोधक तोंडघशी | काय म्हणाल्या आमदार भास्कर जाधवांबद्दल?
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी दौरे काढले. या दाैऱ्यात सर्वच नेत्यांनी मदतीच्या आश्वासनांचा ‘पूर’ आणला. मात्र प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांसाठी मदत किती व केव्हा मिळणार याबाबत मात्र कुणीही स्पष्टपणे सांगितले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना खासदार विनायक राऊत होते.
4 वर्षांपूर्वी -
भास्कर जाधव, कोकणी माणूस जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही - शालिनी ठाकरे
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी दौरे काढले. या दाैऱ्यात सर्वच नेत्यांनी मदतीच्या आश्वासनांचा ‘पूर’ आणला. मात्र प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांसाठी मदत किती व केव्हा मिळणार याबाबत मात्र कुणीही स्पष्टपणे सांगितले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना खासदार विनायक राऊत होते.
4 वर्षांपूर्वी -
यासाठीच राणेंना केंद्रात मंत्रिपद? | चिपळूण पाहणी दौऱ्यात सत्तेची मागणी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मुख्यमंत्र्यांचा अनादर
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी दौरे काढले. या दाैऱ्यात सर्वच नेत्यांनी मदतीच्या आश्वासनांचा ‘पूर’ आणला. मात्र प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांसाठी मदत किती व केव्हा मिळणार याबाबत मात्र कुणीही स्पष्टपणे सांगितले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना खासदार विनायक राऊत होते.
4 वर्षांपूर्वी -
तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 112 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 90 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असल्याने मुसळधार पावसाने अनेक शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मदत व बचावकार्य वेगाने सुरु असून पावसामुळे यात अडचण येत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तळीये आपत्ती | या घटनेची कुणालाही कल्पना नव्हती, असं काही घडेल असं वाटलं नव्हतं - नारायण राणे
तळीये दुर्घटनेत ज्यांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिक सांगतील तिथेच त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज केली. नारायण राणे यांनी महाडच्या तळीयेमध्ये येऊन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आदी उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
विरोधक पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर | सरकार झोपलंय म्हणणाऱ्या दरेकरांच्या झोपेत डुलक्या
महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचं रौद्र रुप बघायला मिळालं. विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. प्रचंड पाऊस झाल्यानं अनेक शहरं आणि गावं पाण्याखाली गेली. तर रायगड, सातारा जिल्ह्यासह काही ठिकाणी दरडी कोसळून मोठी जीवित हानी झाली.
4 वर्षांपूर्वी -
महाड आपत्ती | पवारांच्या सूचनेनंतर आव्हाडांची घोषणा | पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली
महाड तालुक्यातील अख्खं तळीये गाव उद्ध्वस्त झालं. गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तळिये भूस्खलन | मुख्यमंत्री दरडग्रस्त तळिये गावात दाखल | तळिये दरडग्रस्तांचे पुनर्वसन करणार - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दरडग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते सध्या महाडजवळील तळिये गावाची पाहणी करत आहे. दरम्यान, त्यांनी दरडग्रस्त तळिये गावातील गावकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गावातील लोकांनी काही काळजी करण्याचे कारण नाही. मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई दिली जाणार असून गावातील दरडग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
महाड तळिये दुर्घटना | राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पहिला टेम्पो महाडच्या दिशेने
राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरडी कोसळल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवीतहाणी झाल. दरम्यान, एनडीआरएफ पथकाकडून मदत व बचावकार्य वेगाने सुरु आहे. काल महाडजवळील तळिये गावात मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये 35 घरे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गडप झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
२०१९ मधील सांगली-कोल्हापुर महापुरावेळी फडणवीस महाजानदेश यात्रेत मग्न होते | भाजप नेत्यांना विसर - सविस्तर वृत्त
जोरदार पावसाने कोकणात हाहाकार माजवला आहे. महापुराने चिपळूण पार उद्ध्वस्त झाले. लोक अन्नपाण्यावाचून तडफडत आहेत; मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा वेळी पालकमंत्र्यांनी तिथे थांबून जनतेला मदत करायला हवी. पण पालकमंत्री एका रात्रीत मुंबईला पळ काढतात. हे पालकमंत्री नाही, हे तर पळपुटे मंत्री आहेत, या शब्दात भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना टोमणा मारला.
4 वर्षांपूर्वी -
तळीये दरड कोसळून जीवितहानी | मुख्यमंत्री आज तळीये गावात गावकऱ्यांशी संवाद साधणार
काल अतिवृष्टी झाल्याने महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळली. दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली ३५ पैकी ३२ घरं गाडली गेली. कालपासून (२३ जुलै) तळीयेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. दरम्यान, दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेल्या तळीये गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. दुपारी ते गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
निसर्गाचा प्रकोप | तळई गावाची लोकसंख्या 241 | त्यापैकी 109 व्यक्ती सुदैवाने गावाबाहेर होत्या
कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात बदललं आहे. 22 जुलैला दुपारी 4 वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या 35 घरांतील जवळपास 70-80 माणसंही ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळीये गावातील नागरिकांचे अन्य ठिकाणी असणाऱ्याने नातेवाईकांनी गावात धाव घेतली. मात्र गावाचं रुप बघून त्यांना हंबरडाच फुटला. घरं उद्ध्वस्त झालीत, पण या घरातील माणसं गाढली गेली आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Raigad landslide | ४४ मृतदेह काढले बाहेर | अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखालीच? | बचावकार्य सुरूच
आधी महाराष्ट्रावर आभाळ कोसळले अन् आता दरडी. आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात हाहाकार उडाला. रायगड, रत्नागिरी व साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांत दरडी कोसळल्या, भूस्खलन झाले तसेच इतर दुर्घटना घडल्या. गेल्या ४८ तासांत सुमारे १२९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. दुर्गम भाग व पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुसळधार पाऊस त्यात ढगफुटी | अतिवृष्टी हा शब्दही कमी पडेल इतका पाऊस होतोय | नागरिकांनी यंत्रणेला सहकार्य करावे
महाराष्ट्रात सध्या ज्याप्रकारे पाऊस पडत आहे ती परिस्थिती पाहता आपल्याला अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत. अतिवृष्टी (Rain) हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
4 वर्षांपूर्वी