महत्वाच्या बातम्या
-
रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू | तळई गावात भीषण दुर्घटना
राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गावात ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत इमारत कोसळून 3 ठार | तर रायगडमध्ये दरड कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि नागपूरच्या काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी मुंबईला लागून असलेल्या गोवंडीमध्ये इमारत कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना मुंबईतील राजवाडी व शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रायगडच्या काळई गावात भूस्खलनामुळे 30 लोक बेपत्ता झाले आहेत. यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून इतर लोक अजूनही अडकलेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
चिपळूणला 48 तासांत 300 मिमी पाऊस | हजारो लोक पुरात अडकले | तर विदर्भात ३ जण पुरात वाहून गेले
मुसळधार पावसामुळे कोकण जलमय झाले आहे. कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात ४८ तासांत तब्बल ३०० मिमी तुफानी वृष्टी झाल्याने चिपळूणसह परिसरातील ७ गावे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. मदतकार्यासाठी एनडीआरएफचे २३ जणांचे पथक ५ बोटींसह पथक पाठवण्यात आले आहे. राज्यात कोकणासह नाशिक जिल्ह्यात आणि विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातही धो-धो पाऊस झाला.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात तुफान पावसाने नद्यांचं पाणी बाजारपेठेत | खेड्यापाड्यांमध्ये ५ फुटांपर्यंत पाणी
कोकणात मुसळधार पावसाने नद्या ओसंडून वाहू लागल्या असून आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरलं आहे. परिणामी जनजीवन पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्रं आहे. अगदी बाजारपेठांना देखील नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय. स्थानिक प्रशासनाला मदत कार्यात देखील प्रचंड अडचणींना तोंड द्यावं लागतंय.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर नारायण राणेंना कॅबिनेट समितीत देखील मोठी संधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कॅबिनेट विस्तार केला. यामध्ये मोठे फेरबदल करताना १२ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता आणि नव्यांना संधी देण्यात आली. आता प्रमोशन मिळालेल्या काही मंत्र्यांना अजून एक संधी मिळाली आहे. कारण आता कॅबिनेट समित्यांमध्ये देखील अनेकांना संधी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आपत्ती निवारण्यासाठी कोकणाला ३ हजार कोटींचा निधी मंजूर
राज्यातील आपत्ती निवारणासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून कोकणाला ३ हजार ६३५ कोटींचा भरीव निधी दिला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून २ हजार कोटी तर राज्य शासनाच्या इतर निधीतून १६०० कोटी देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दुरदृश्य प्रणालीद्वारे आज बैठक झाली. बैठकीत निधीला तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच दुष्काळ निवारण कार्यक्रम- पेंच प्रकल्प नागपूर हा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
4 वर्षांपूर्वी -
राणेंना पंतप्रधान केले तरी कोकणातून शिवसेनेला हटवणे कोणाच्याही आवाक्याबाहेर - विनायक राऊत
कोकणातील लोकांनी आपलं आणि शिवसेनेचं नातं अभेद्य आहे हे सिद्ध करून दाखवून दिलेले आहे. आज नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवले तरी सुद्धा कोकणातून शिवसेनेला हटविणे हे कोणाच्याही ऐपतीमध्ये नाही. कोकण आणि शिवसेना हे अभेद्य नाते तोडण्याचं काम कोणीही करू शकत नाही, असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंचं राजकीय वजन वाढलं | मंत्रीमंडळाच्या पहिल्या रांगेत आणि यादीतही पहिलचं नाव
केंद्रीय मंत्रिमंडळाची नावं अखेरीस जाहीर झाले आहेत. मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज (७ जुलै) संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे तोच म्हणजे नारायण राणे यांचा फोटो.
4 वर्षांपूर्वी -
शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री, नारायण राणेंचं केंद्रीय मंत्रीपद निश्चित | नितेश-निलेश राणे देखील दिल्लीत दाखल
शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपात स्थिरावलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे. नारायण राणे यांचा एक शाखाप्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी सायंकाळी विस्तार करण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्या नावाची मंत्री पदासाठी वर्णी लागणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडतूस माणसांबद्दल मी बोलत नाही | भास्कर जाधव यांचा भाजप आमदाराला टोला
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून आलं. यानंतर भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. यावरून तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे. या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात, अशी बोचरी टीका आमदार नितेश राणेंनी केली.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार | खा. नारायण राणेंचं नाव जवळपास निश्चित
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत भाजपचे संघटन महामंत्री बी.एल.संतोषही उपस्थित होते. मंत्रिमंडळातील विस्तारासंदर्भात ही बैठक होती, असे सांगितले जाते. विद्यमान केंद्रीय मंत्रिमंडळात ५३ मंत्री आहेत. नियमानुसार मंत्र्यांची संख्या ८१ पर्यंत वाढवता येऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारने ईडीचा कितीही वापर केला तरी महाविकास आघाडीला धोका नाही - खा. विनायक राऊत
मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली. केंद्र सरकारचं हे पाऊल चुकीचं होतं, असं सांगतानाच आता केंद्र सरकारने आता आपलं अपयश झाकण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवू नये, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल - भास्कर जाधव
मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही पेटला आहे. याच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी यांनी चांगलाच समाचार घेतलाय. आमच्या हाती सूत्र द्या, चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत नाही केलं तर राजकारणातून संन्यास घेईन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र बाकी सगळे इंद्र | फक्त आरोप आणि टीका एवढेच त्यांचे काम - भास्कर जाधव
राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला आहे. असा घणाघात शिवसेना प्रवक्ते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. ते आज खेडमधील कोरेगाव येथे कोविड सेंटरच्या उद्घाटनाला आले असताना बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
राजापूर रिफायनरीच्या बाजूने मतदान | शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरीच्या बाजूने मतदान केल्याचा ठपका ठेवत नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी केली गेली. राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवीयांनी नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांच्यावर ही कारवाई केली.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणे म्हणाले तिथे राडाबिडा काही झाला नाही | नितेश राणे म्हणाले, नाईकांना शिवप्रसाद दिला?
सिंधुदुर्गातल्या कुडाळ पेट्रोल पंपावर झालेल्या राड्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या पेट्रोल पंपावर वैभव नाईक थांबला कुठे, तो पळाला. तिथे राडाबिडा काही झाला नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं
4 वर्षांपूर्वी -
निलेश आणि नितेश राणे हे काहीही करू शकत नाही, ते नुसतेच बोलतात - चंद्रकांत खैरे
एकाबाजूला सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात पेट्रोल पंपावर राडा | शिवसेना आ. वैभव नाईक भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले
दरम्यान, आता सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची खास ऑफर | पेट्रोल मोफत मिळवा तो देखील नारायण राणेंच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर?
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात पुन्हा ठिणगी उडण्याची शक्यता आहे. शाब्दिक आरोप-प्रत्यारोप, वाद आणि राडे करुन झाल्यानंतर आता शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करुन भारतीय जनता पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचा आज 55 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हे पेट्रोल वाटप भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर होणार होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला धोबीपछाड देण्याचा कार्यक्रमच वैभव नाईक यांनी आखला होता.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण चार महिन्यांपूर्वीच फुल्ल
कोरोनाने मागील वर्षी देशात असे काही थैमान घातले होते, की सण उत्सवांवरही याचे सावट पाहायला मिळाले. हे चित्र यंदाच्या वर्षीही फारसे काही वेगळे नाही. कोकणच्या दिशेने जाणाऱ्या अनेक चाकरमान्यांना मागच्या वर्षी गावी जाणे शक्य झाले नव्हते. प्रशासनाचे नियम आणि कोरोनाचे संकट यांमुळे चाकरमान्यांचा हिरमोड झाला होता.
4 वर्षांपूर्वी