महत्वाच्या बातम्या
-
Rain Updates | मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस | पुणे, सातारा, रत्नागिरीत रेड ॲलर्ट
राज्याभरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस कोसळत आहे. तळकोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. तर कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहेर केली आहे. येत्या 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, साताऱ्यासह, रत्नागिरीला रेड ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rain Alert | मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा | सर्व यंत्रणा सज्ज
मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | अर्थतज्ज्ञ राणे, GDP ते नाना पटोले | कोरोनाने माणसं मेली असतील थोडी फार | Social Viral
राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच ३ जून रोजी मराठा भाजपा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र नारायण राणेंच्या या पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल होतोय. एका लोकप्रिय मराठी मिम्स पेजने या राणेंच्या पत्रकार परिषदेमधील जीडीपीसंदर्भातील प्रश्नांचा व्हिडीओ एडीट करुन अपलोड केल्यानंतर तो व्हायरल झालाय.
4 वर्षांपूर्वी -
अजब | झोपलेल्या केंद्रीय समितीकडून तब्बल २१ दिवसानंतर कोकणात नुकसानग्रस्त भागाची पाहणी
जिल्ह्याला तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर तब्बल २१ दिवसानंतर येथील नुकसानीच्या पाहणीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय समितीने आज देवगड, मालवणला भेट दिली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात किनारपट्टी भागातून गाड्यांच्या ताफ्यातून धावत्या भेटी देऊन या समितीने पाहणी केली. पंचनाम्याचे अहवाल केंद्राकडे सादर करणार, अशी माहिती यावेळी समिती अध्यक्ष अशोक परमार यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
समाजालाही वाटलं पाहिजे ना तुम्ही राजे आहात ! राणेंचा संभाजीराजेंवर प्रहार | पण कोणाच्या सांगण्यावर?
संभाजीराजे छत्रपती हे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाची आक्रमकता देखील वाढत चालली आहे. अशातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. “ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेलो म्हणजे आरक्षणही मिळत नाही आणि कोणी पुढरीही होत नाही. समाजाला वाटलं पाहिजे ते राजे आहेत. लोकांमध्ये आस्था, आपुलकी, प्रेम निर्माण होण्यासाठी तसं कार्य करावं लागतं.
4 वर्षांपूर्वी -
संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं | मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका - निलेश राणेंचा संताप
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर तीन वाजता ते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणे पनवती | सिंधुदुर्ग भवन बनवलं आणि कोकणवासीयांना फसवून भूखंड लाटला - खा. विनायक राऊत
राज्यातील तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. नारायण राणे पनवती आहेत. म्हणूनच भाजपने त्यांना अडगळीत टाकलं आहे, असा खोचक टोला विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्यांना कोकणाने दोन-दोन वेळा नाकारलं | आरोप करणाऱ्याला गर्दीत खूप मागे उभे केले होते - उदय सामंत
शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रत्नागिरीत गुप्त बैठक झाल्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उदय सामंत हे स्वत:हून फडणवीसांच्या भेटीसाठी आले होते, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केला होता. उदय सामंत यांनी निलेश राणेंच्या या आरोपाला उत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
गौप्यस्फोट की राजकीय पुड्या? | रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत फडणवीसांना भेटायला तडफडत होते - निलेश राणे
शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान निलेश राणे लोकसभेत दोनवेळा रत्नागिरी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. मात्र याच मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मंत्री, खासदार आणि आमदारांची मजबूत पकड असल्याने केवळ राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी असं ट्विट केल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे तोडणारे कोकणात जाऊन झाडांची चिंता व्यक्त करत आहेत - आ. भाई जगताप
महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असताना राजकीय वर्तुळात अनेक विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सूरु आहेच. महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करत आहेत. जरा तपासून घ्या स्वत:ला’ अशा शब्दांत काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांनी टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी वैफल्यग्रस्त नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, मी विरोधी पक्षाप्रमाणे नव्हे जबाबदारीने बोलणार - मुख्यमंत्री
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज (२१ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात दाखल झाले आहेत. यावेळी ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं. दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचे वादळी दौरे | 4 ठिकाणी १२- १५ मिनिटांच्या बैठका | केंद्राच्या आयुष्मान आरोग्य केंद्राचे पत्रे उडाल्याचे पाहिले अन...
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता राजकीय दौरे सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यात आघाडी घेतली असून सरकार विचारात असतानाच त्यांनी बुधवारी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. अलिबागसह ६० किलोमीटर अंतरातील ३ गावांत अवघ्या अडीच तासात त्यांनी चार ठिकाणी भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी फार तर ८ ते १३ मिनिटे वेळ दिला. यामुळे फडणवीस यांचा दौरा “चक्रीवादळ पर्यटन’ ठरले आहे. विरोधी पक्षनेता येणार म्हणून चारही ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते.
4 वर्षांपूर्वी -
तौक्ते वादळ | कोकणच्या संबंधित पालकमंत्र्यांकडून कालपासून नुकसानीचे आढावा दौरे | प्रशासन कामाला
मागील तीन दिवसांपासून तौक्ते वादळाने गुजरात आणि दीवला झोडपून काढलं आहे. त्यामुळे या परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दीवमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी थोड्याच वेळात गुजरातला पोहोचत आहेत. गुजरातच्या भावनगर येथून ते हवाई पाहणी करतील.
4 वर्षांपूर्वी -
तौक्ते वादळ | मोदींचा केवळ गुजरात नुकसानीचा पाहणी दौरा | महाराष्ट्रातून टीका टाळण्यासाठी फडणवीसांचा कोकण दौरा?
तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री साडे दहा वाजता सौराष्ट्रला धडकले. त्यानंतर किनारपट्टी भागात जमीन धसण्याचे प्रकार सुरू झाले. सुमारे अडीच ते तीन तास जमीन धसण्याचे प्रकार सुरू होते. वादळामुळे सौराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील 84 तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. आता पाऊस थांबला असला तरी या वादळी पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जागोजागी मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तौते चक्रीवादळ, प्रशासन सतर्क | रायगडमध्ये 25200 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
अरबी समुद्रात निर्माण झालेले आणि गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या दिशेनं सरकत असलेले तौते चक्रीवादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. हवामान विभागाच्या ताज्या माहितीप्रमाणे तौते चक्रीवादळ मुंबईपासून १७० किमी अंतरावर आहे. हे वादळ हळूहळू पुढे सरकत असून, याचा प्रभाव मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव यासह इतरही काही जिल्ह्यात दिसून आला आहे. रविवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबाबतही कोत्या मनाचे राजकारण केले - नारायण राणे
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरु | ते २२४ गुजराती-मारवाडी रडारवर
कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरलेली असतानाच या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. तसेच रिफायनरीसाठी घेतलेल्या जमिनी परत देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी राजापूर प्रांत कार्यालयासह तलाठी कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तारळ, कुळवंडे, नाणार, साखर, सागवे, वाडापाल्ये, उपळे, विल्ये, डोंगर, कात्रादेवी या गावांमध्ये तक्रार स्विकृती कक्ष स्थापन केले जाणार आहे. या कक्षांमध्ये तक्रार स्वीकारली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पाचं आता कोणाला स्वागत करायचे असेल, तर ते करू शकतात - मुख्यमंत्री
राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये चांगलीच जुंपली. यात मनसुख हिरेन प्रकरण प्रचंड गाजले. यात क्राईम ब्रांच अधिकारी सचिन वाझे हे नाव प्रकर्षाने समोर आले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याच दरम्यान त्यांनी कोकणातील नाणार रिफायनरीचा मुद्दा पुन्हा पुढे आल्याने त्यावर देखील भाष्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणातील चाकरमान्यांसाठी | गावी जाणाऱ्या नागरिकांना कोरोना टेस्ट करावी लागणार
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने जिल्हा [प्रशासनांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मागील वर्षी कोकणच्या दौऱ्याला मुकलेला कोकणी माणूस पुन्हा नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणी लोकांना प्रिय असलेला शिमग्याच्या उत्सव यावर्षी देखील येणार नाही अशी शक्यता आहे. कारण, होळीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमन्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी नेगेटिव्ह आली तरच चाकरमन्यांना आपल्या गावात प्रवेश मिळेल.
4 वर्षांपूर्वी