लोकसभेत बिथरलेल्या भाजप नगरसेवक व ८-१० छपरी कार्यकर्त्यांचा मनसैनिकावर हल्ला, सर्वजण फरार

पनवेल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरील रागातून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने महाराष्ट्र सैनिकावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला केला आहे. जवळपास ८ ते १० गुंड कार्यकर्ते सोबत घेऊन पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसैनिक प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. मनसैनिकावरील हा संपूर्ण हल्ला सीसीटीव्हीत कैद झाल्याने भाजप नगरसेवकाचं क्रूरकृत्य उघड झालं आहे.
विजय चिपळेकर हे पनवेल महानगर पालिकेतील कामोठे भागातील नगरसेवक आहेत. २९ एप्रिलला रात्री १२ वाजल्यानंतर विजय चिपळेकर यांनी मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी चिपळेकर यांच्यासोबत आठ ते दहा गुंड कार्यकर्ते होते. या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे गुंड साथीदार फरार झाले आहेत. शिवाय गुन्हा नोंद होऊ नये यासाठी स्थानिक कामोठे पोलीस स्टेशनवर दबाव आणत आहेत.
“वैयक्तिक कारण पुढे करत मनसेवर असलेल्या रागामुळे भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मतदान संपल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला केला आहे.”, अशी प्रतिक्रिया मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आणि प्रशांत जाधव यांचे भाऊ महेश जाधव यांनी दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं