खंबाटातील ४०० कोटींच्या भ्रष्टाचारात विनायक राऊतांचा हात

रत्नागिरी : बहुचर्चित तब्बल ४०० कोटींचा भ्रष्टाचार करून एका रात्रीत सर्वाधिक म्हणजे एकूण २७६३ कामगार तसेच त्यांच्या तब्बल दहा ते अकरा हजार कुटूंबियांना रस्त्यावर आणणा-या खंबाटा एव्हिएशन कंपनीतील घोटाळय़ाचा खरा सूत्रधार, या कंपनीचा निरव मोदी हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत असून बहुतांश कोकणातील कामगार असलेल्या या खंबाटातील भ्रष्टाचारातुन विनायक राऊत यांनी कोकणी माणसाचीच फसवणूक केली आहे असा धक्कादायक आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला.
तब्बल पंचेचाळीस वर्षे देशातील विविध विमानतळावर कार्यरत असलेली खंबाटा एव्हिएशन कंपनी १६ ऑगस्ट २०१७ रोजी बंद पडली. त्यामुळे मुंबई येथील युनिटमध्ये कार्यरत २७६३ कामगार एकाचवेळी रस्त्यावर आले. या कंपनीमध्ये शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेना कार्यरत होती. याचे नेतृत्व रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार विनायक राऊत करत होते. परंतु, कंपनी आणि कामगार देशीधाडीला लागत असताना आणि त्यानंतर सुद्धा विनायक राऊत यांनी कोणतीही हालचाल केली नाही.
यामध्ये मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार तसेच भ्रष्टाचार झाल्याचे याआधीच उघड झाले आहे. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील आपल्या एका जाहिर सभेतील भाषणामध्ये मातोश्रीसह शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. शिवसेनेच्या एकूण बावीस शाखा प्रमुखांना खंबाटा एव्हिएशनकडून पगार जात असे, विनायक राऊतसह मातोश्रीवरील कर्मचा-यांचे पगारही खंबाटामधून केले जात असंत. कंपनीकडून फसविल्या गेल्यानंतर या कामगारांनी अनेकवेळा मातोश्री, सेनाभवन येथे जाऊन दाद मागितली. खासदार विनायक राऊत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनी बंद पडल्यानंतर विनायक राऊत त्यांना एकदाही त्यांची भेटलेले नाहीत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं