माझ्या ट्वीटचा गैर अर्थ काढला; नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही: निलेश राणे

मुंबई : प्रसार माध्यमांनी माझ्या ट्वीटचा गैर अर्थ काढला, नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. पण ज्या दिवशी शिवसेना राणेसाहेबांची बदनामी थांबवेल, तेव्हा माझा आणि शिवसेनेचा विषय संपेल, अशी भूमिका माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी बंधू नितेश राणे यांनी दाखवली असतानाच निलेश राणे यांनी ट्विटरवरुन असहमती दर्शवली होती.
कालच्या माझ्या ट्विटचा मीडियाने गैर अर्थ काढला असून नितेशची साथ मी मरे पर्यंत सोडणार नाही. नितेशनी मला जे अधिकार दिले त्यातून मी त्याला समजवले. राहिला विषय शिवसेनेचा, ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 14, 2019
‘कालच्या माझ्या ट्विटचा मीडियाने गैर अर्थ काढला असून नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. नितेशनी मला जे अधिकार दिले त्यातून मी त्याला समजवले. राहिला विषय शिवसेनेचा, ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल.’ असं ट्वीट निलेश राणेंनी केलं आहे.
शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने नितेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने युतीधर्म मोडून येथे आपल्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभा केला आहे. मात्र असे असले तरी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं होतं. विधानसभेच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे आणि माझी भेट व्हावी. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. यावर निलेश राणेंनी नितेशच्या भूमिकेला विरोध केला होता.
निलेश राणेंनी सांगितलं होतं की, ज्या पक्षानी राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार. पण त्यानंतर ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं