शिवसेनेची धाकधुक वाढली! अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत

रत्नागिरी : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खंबाटा कामगारांसह आज रत्नागिरीत येऊन जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेत. यामुळे खंबाटा ऐअरलाईन्स मुद्द्यावरून कोकणातील राजकारण प्रचंड तापण्याची शक्यता आहे.
भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी सुमारे २,५०० कामगारांना देशोधडीला लावले असा आरोप स्वाभिमानचे लोकसभा उमेदवार डॉक्टर तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. खंबाटा बंद झाल्याने त्या रोजगारावर अवलंबून असलेले तब्बल ११ ते १२ हजार लोकांना राऊत यांनी एका रात्रीत रस्त्यावर आणले आहे.
ही कंपनी २०१६ साली बंद झाली त्या मागील खरे सूत्रधार विनायक राऊत आहेत, असा आरोप यापूर्वीच खंबाटातील कामगारांनी केला होता. आज दुपारी २ वाजता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया खंबाटा कामगारांबरोबर रत्नागिरीमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेणार असून, नेमके काय आरोप करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अंजली दमानिया यांच्या रत्नागिरीत येण्यामुळे शिवसेनेनेत खळबळ उडाली असून बदनामीमुळे शिवसेना घाबरली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं