मुख्यमंत्री देवीसाठी वेळ देऊ शकत नाहीत तर लोकांना काय देणार: नारायण राणे

रत्नागिरी : कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाची जाहिरात ‘सामना’ या शिवसेनेच्या मुख्यपत्रात प्रकाशित झाल्याने शिवसेनेवर चौफेर टीका होत आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची भर पडली आहे. खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
मुख्यमंत्री कोकणात कोणत्या कामासाठी आले होते ते माहित नाही पण एखाद्या ठिकाणी गेल्यावर मुख्यमंत्री तिथे काही ना काही देऊन जातात, ही खरंतर महाराष्ट्राची परंपरा बनली आहे. या मुख्यमंत्र्यांनी मात्र तसे काहीच केले नाही. मुख्यमंत्री येथे आले आणि येथून न बोलताच जाणे त्यांनी पसंत केले, असे सांगत राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा मुख्यालयात फक्त दोन मंत्र्यांची मिनी कॅबिनेट घेतली. अशा कॅबिनेटमधून हे मुख्यमंत्री जिल्ह्याचा काय विकास करणार आणि जिल्ह्याला किती निधी देणार?, अशा प्रश्नांची सरबत्तीही राणे यांनी केली.
दोनच दिवसांपूर्वी (१४ फेब्रुवारी) शिवसेनेच्या सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर रत्नागिरी रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली. नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, असा मजकूर या जाहिरातीत होता. ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच’, असा उल्लेख जाहिरातीमध्ये होता.
Web Title: Story Anganewadi Bharadi Devi Yatra MP Narayan Rane slams CM Uddhav Thackeray over Sindhudurg Development issues.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं