फुटण्याच्या अवस्थेतील धरणांच्या ऑडिट'पेक्षा जलसंपदा मंत्री पक्ष फोडाफोडीत व्यस्त राहिल्यावर काय होणार?

रत्नागिरी: आजची घटना जरी चिपळूण येथील तिवरे धरणाच्या फुटाण्यासंबंधित असली तरी राज्यातील अनेक धरणाची अवस्था ही अत्यंत भयानक आहे. दरम्यान जलसंपदा खात्याकडे स्थानिकांनी अनेक तक्रारी देखील दिल्या आहेत. मात्र अशा दयनीय अवस्थेतील धरणांचे ऑडिट करण्याचे जलसंपदा मंत्री यांना कधीच मनात आले नसावे, कारण त्याच्या या मंत्रिपदाचा बराच कार्यकाळ हा स्वतःला भाजपचे संकटमोचक बनविण्यात आणि इतर पक्षातील नेतेमंडळी फोडण्यात वाया गेला आहे.
मागील काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे चिपळूणमधील तिवरे धरण फुटलं. यामुळे २४ जण वाहून गेले. सकाळी १० पर्यंत एकूण ६ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले आहेत. तर इतरांचा शोध बचाव पथकाकडून सुरू आहे. धरण फुटल्यानं परिसरातील १३ घरं वाहून गेली. यामुळे या भागात सध्या प्रचंड भीतीचं वातावरण आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणात देखील वरुणराजा जोरदार कोसळत आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं चिपळूणमधील तिवरे धरण काल रात्री ८:३० च्या सुमारास भरलं. त्यानंतर ते ओव्हरफ्लो झालं. थोड्याच वेळात धरणाला भगदाड पडलं आणि परिसरात खळबळ माजली. यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली.
जोरदार पाऊस झाल्यास धरण फुटू शकतं, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली होती. त्यांनी याबद्दलची लेखी तक्रार देखील पाटबंधारे विभागाकडेदेखील केली होती. यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली. धरणाचं ओव्हरफ्लो होणारं पाणी वशिष्ठीच्या खाडीला आणि शास्त्री नदीला जाऊन मिळत असल्यानं धरणाला धोका नसल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. स्थानिकांनी व्यक्त केलेली भीती काल रात्री खरी ठरली. धरण फुटल्यानं ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांमध्ये पाणी शिरलं. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यानं २४ जण वाहून गेले. धरण परिसरातील 13 घरंदेखील प्रवाहात वाहून गेली. यामुळे मोठी वित्तहानी झाली. सध्या एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं