पंढरपूरला जाणाऱ्या गाडीला अपघात; ५ वारकऱ्यांचा मृत्यू

बेळगाव: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला असून यात ५ जण जागीच ठार झाले आहेत. शुक्रवारी पहाटे चार वाजता सांगोल्या जवळील मांजरी येथे हा अपघात घडला आहे. या घटनेत दोघे जण गंभीर असून इतर जखमींवर सांगोला व पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत. अपघातात ठार झालेले सर्व वारकरी बेळगाव जिल्ह्यातील आहेत.
अपघातग्रस्त टेम्पो बेळगावहून पंढरपूरकडे निघाला होता. या टेम्पोनं विटांनी भरलेल्या एका ट्रॅक्टरला मागून धडक दिली. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींचा नेमका आकडा कळू शकलेला नाही. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. अपघाताचे वृत्त कळताच मंडोळी आणि हंगरगा गावावर शोककळा पसरली आहे. मंडोळी ग्रामस्थ तात्काळ सांगोल्याला रवाना झाले आहेत.
मृतांत हंगरगा येथील एक तर मंडोळी येथील चौघांचा समावेश आहे. सध्या पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेनंतर बेळगावातील मंडोळी गावावर शोककळा पसरली आहे. मंडोळी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष गावकरी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं